2025 Honda SP 125
2025 Honda SP 125: होंडाने देशात अनेक उत्तम बाइक लॉन्च केल्या आहेत. कंपनीकडून अनेक बाईक्सची किंमत अगदी मापक ठेवण्यात आली आहे. देशात अनेक बाईक्स् लॉन्च होताना दिसत आहे. त्यातही अनेक दुचाकी उत्पादक कंपनी ग्राहकांच्या मागणीनुसार बजेट फ्रेंडली बाईक्स् मार्केटमध्ये लॉन्च करत आहे. भारतात अनेक उत्तम दुचाकी उत्पादक कंपनी आहेत ज्या स्वस्तात मस्त बाईक्स् लॉन्च करत असतात. त्यातील एक म्हणजे होंडा कंपनी. कंपनीच्या अनेक बाईक्स् मार्केटमध्ये लोकप्रिय आहेत. त्यातलंच एक म्हणजे होंडा एसपी 125. आता कंपनीने या बाइकचे नवीन मॉडेल्स बाजारात लॉन्च केले आहे.

Honda SP 125 ही होंडाने भारतीय मार्केटमध्ये ऑफर केलेल्या एंट्री लेव्हल 125 cc कम्युटर बॉईक्सपैकी एक आहे. 2025 Honda SP 125 भारतीय मार्केटमध्ये 91,771 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. Honda SP 125आता आगामी OBD2B नियमांचे पालन करण्यासाठी अपडेट केली गेली आहे. या टु व्हीलर मध्ये नवीन डिझाइन आणि नव्याने आधुनिक फीचर्स देखील समाविष्ट आहेत. जे प्रतिस्पर्ध्यासह स्पर्धेत मजबूत राहण्यास मदत करते. चला या बाईक्स्मधील फीचर्स जाणून घेऊया. मुख्य म्हणजे या बाईकचे इंजेण अधिक ॲडव्हान्स बनवले आहे. तसेच ही बाइक डॉ व्हेरीएंट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
2025 Honda SP 125: किंमत आणि उपलब्धता
एंट्री स्पेक ड्र्म ब्रेक प्रकारासाठी Honda SP 125 ची किंमत 91,771 रुपये (एक्स शोरूम दिल्ली) आहे. टॉप स्पेक डिस्क ब्रेक व्हेरीएंटची किंमत 1,00,284 रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. ही संपूर्ण भारतात होंडा मोटरसायकल आणि स्कूटर डीलरशिपवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

2025 Honda SP 125: फीचर्स
याबईकमध्ये नवीन एलईडी हेडलॅम्प, तसेच आक्रमक टॅंक श्रॉईस, मफलर कव्हर आणि सुधारित ग्राफिक्स आहेत. ही फीचर्स बाईकला अधिक लक्षवेधक बनवतात. नवीन SP 125 मध्ये आता 4.2 इंच टीएफटी डिस्प्लेसह कनेक्टिव्हिटी आणि होंडा रोडसिंक ॲप आहे. ज्यामुळे स्मार्ट राईडसाठी सुलभ नेव्हीगेशन व वॉइस असिस्ट मिळते. तसेच यात युएसबी टाइप सी चार्जिंग पॉइंट आधुनिक काळातील राईडसच्या गरजांची पूर्तता करते.
स्पेसिफिकेशन
- इंजिन आणि पॉवर: या बाइकमध्ये 124 cc, सिंगल इंजेक्टेड इंजिन मिळते, जे 10.7 bhp पॉवर आणि 10.9 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. या वाहनांची इंधन कार्यक्षमता वाढवण्यासाठी आयडलिंग स्टॉप सिस्टम देखील आहे. ज्यामुळे पेट्रोलची बचत होण्यास मदत होते. कर्ण आयडलिंग स्टॉप सिस्टिमच्या मदतीने इंजिन ट्रॅफिक सिग्नलवर थांबते आणि शॉर्ट ब्रेक्स होते. या बाइकमध्ये बसवलेले इंजिन पूर्वीपेक्षा अधिक ॲडव्हान्स आणि चांगले आहे.
- स्मार्ट कनेक्टिव्हिटी: अपडेटेड 2025 Honda SP 125 मध्ये आता नवीन टेक्निकसह फीचर्स समाविष्ट आहेत. आता ही बाइक पूर्वीपेक्षा अधिक ॲडव्हान्स झाली आहे. रायडर्ससाठी, 4.2 इंचाचा TFT डिस्प्ले आहे, जो ब्लुटुथ कनेक्टिव्हिटी आणि Honda Road Sync ॲपसह येतो. यात नेव्हीगेशन आणि व्हॉईस असिस्टचीही सुविधा आहे. एवढेच नाही तर बाइकमध्ये USB Type C चार्जिंग पोर्ट देखील जोडण्यात आले आहे. ज्याद्वारे रायडर त्यांचे डिव्हाईस चार्ज करू शकतात.
- रिफ्रेश डिझाइन: या बाइकमध्ये पूर्णपणे LED हेडलॅम्प आणि टेल लॅम्प दिसत आहेत. त्यासोबतच ॲग्रेसिव्ह टॅंक, क्रोम मफलर कव्हर आणि नवीन ग्राफिक्स यात दिसत आहेत. ही बाइक 5 कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ज्यात पर्ल इग्नीयस ब्लॅक, मॅट ॲक्सिस् ग्रे मेटॅलिक, पर्ल सायरन ब्लु, इम्पीरियर रेड मेटॅलिक आणि मॅट मार्वल ब्लु मेटॅलिकयांचा समावेश आहे.

2025 Honda SP 125: या बाइक सोबत करणार स्पर्धा
या बाइकच्या इंजिन बद्दल बोलायचे झाले त्र्, यामध्ये 124.8 cc एअर आणि ऑइल कुल्ड 3V इंजिन आहे जे 11.38 PS चा पॉवर देते. यामध्ये अनेक राइड मोड उपलब्ध आहेत. बाइकची व्हील्स 17 इंची आहेत. या बाइकमध्ये 5 ॲडजस्टेबल मोनो शॉक सस्पेन्शन आहे. नवीन TVS Raider iGO ची किंमत 98,389 रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की ही बाइक आता 10% जास्त मायलेज देते.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!