Pushpa 2 Star Allu Arjun Arrest
Pushpa 2 Star Allu Arjun Arrest: तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेलं आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा-2 सिनेमा प्रदर्शित झालाय. सध्या सगळीकडे या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. पहिल्या सिनेमाच्या यशानंतर त्यांच्या सिक्वलची प्रतीक्षा चाहत्यांना होती. संपूर्ण देशभरात या सिनेमाची असलेली क्रेझ, त्यासाठी करण्यात आलेली प्रमोशन्स आणि सिनेमाच्या प्रीमियरच्या वेळी झालेली चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर तिचा लहान मुलाला गंभीर दुखापत झाली होती. याच प्रकरणी चौकशीसाठी अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे.
त्यापूर्वी गुरुवारी (5 डिसेंबर) रात्री आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये रात्री खास शो आयोजित करण्यात आला होते. तेलंगणाच्या दिलसुखनगर मध्येही अशा शोचं आयोजन करण्यात आलं होतं. हा शो सुरू असताना अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षेतिल 30-40 जण थिएटरमध्ये आले. त्यावेळी एकच गदारोळ उडाला आणि चंगराचेंगरी सदृष्य स्थिती निर्माण झाली. यामुळे त्या महिलाचा मृत्यू आणि मुलाला गंभीर दुखापत झाली. यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन विरोधात गुन्हा (Pushpa 2 Star Allu Arjun Arrest)दाखल केला आहे. त्याचबरोबर थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुन ची सुरक्षा सांभाळणाऱ्यांना विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रचंड चर्चा होती. शुक्रवारी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनचे सगळे विक्रम मोडले आहेत. ज्यावेळी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली त्या वेळेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. ज्या वेळेस अल्लू अर्जुनला अटक करण्यात आले त्यावेळी त्यावेळी तो घराखाली अनवाणी पायांनी फिरत होता. त्यानंतर तो तसाच पोलिसांसोबत घरी गेला. त्यानं आपले कपडे बदलले, कॉफीचा कप घेऊन घराखाली आला. अल्लू अर्जुननं कॉफी घेतली. त्यावेळी त्याची बायको त्याच्या सोबत होती. आजूबाजूला पोलिसही उपस्थित होते. अल्लू अर्जुननं शांतपणे कॉफी संपवली, बायकोच्या कपाळावर कीस केलं आणि पोलिसांसोबत निघाला.
Pushpa 2 Star Allu Arjun Arrest: FIR मध्ये काय म्हटलंय?
या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये कलम 105 (जीवघेणे कृत्य ) आणि कलम 118 (जाणून बुजून इतरांना इजा पोहचवणे) या कलमांची नोंद एफआयआर मध्ये करण्यात आली आहे. चिक्कपडल्ली पोलिस स्टेशन मध्ये मृत महिलेच्या नातेवाइकांनी या सर्व प्रकाराबाबत तक्रार दाखल केली होती. त्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुष्पा 2 च्या प्रीमियर वेळी अल्लू अर्जुन आणि त्याची टीम तिथे आल्यामुळे प्रचंड गोंधळाची स्थिति निर्माण झाली. त्यातून एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर काही जखमी झाले आहेत. या सर्व प्रकारांसाठी कारणीभूत असणाऱ्या व्यक्तिविरोधात कायद्यात विहित कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती हैदराबाद पोलिसांचे सेंट्रल झोनचे पोलिस उपायुक्त अक्षांश यादव यांनी माहिती दिली.
Pushpa 2 Star Allu Arjun Arrest: थिएटर मालक सुद्धा अटक
दरम्यान हैदराबाद मधील ज्या थिएटरमध्ये ही चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली, त्या संध्या थिएटर मालकाला आणि दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी या प्रकरणी आधीच अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीमियरच्या वेळी होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी थिएटर व्यवस्थपणा कडून कोणतीही अतिरिक्त व्यवस्था करण्यात आलेली नव्हती, शिवाय अल्लू अर्जुनला येण्यासाठी किंवा परत बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती.
Pushpa 2 Star Allu Arjun Arrest: काय घडलं त्या दिवशी?
गुरुवारी (5 डिसेंबर) रात्री आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये रात्री खास शो आयोजित करण्यात आला होते. तेलंगणाच्या दिलसुखनगर मध्येही अशा शोचं आयोजन करण्यात आलं होतं. हा शो सुरू असताना अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षेतिल 30-40 जण थिएटरमध्ये आले. त्यावेळी एकच गदारोळ उडाला आणि चंगराचेंगरी सदृष्य स्थिती निर्माण झाली.खासगी सुरक्षा रक्षकांनी जमावाला दूर लोटण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. यानंतर उसळलेल्या चेंगराचेंगरीमध्ये 39 वर्षी एम. रेवती नावाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेवती यांचा मुलगा अल्लू अर्जुनचा मोठा चाहता असल्यामुळे ते सहकुटुंब पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियरसाठी आले होते. पण त्याचवेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये रेवती यांना जीव गमवावा लागला असून त्यांच्या मुळची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे.
Pushpa 2 Star Allu Arjun Arrest: अल्लू अर्जुनची अभिनयात सुरुवात
- कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहते अल्लू अर्जुनला प्रमाणे बनी म्हणतात. अल्लू अर्जुनची अभिनयाची सुरवात ही 80 च्या दशकात दोन सिनेमांमध्ये बाल कलाकार म्हणून लहान पणात सुरुवात केली.
- त्यानंतर 2003 साली अल्लू अर्जुनचा पहिला चित्रपट ‘गंगोत्री’ या सिनेमाद्वारे नायक म्हणून पदार्पण केलं. ज्येष्ठ दिग्दर्शक के राघवेंद्र राव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होत. गेल्या 20 वर्षात त्याने केलेल्या विविध भूमिका आणि अभिनेता म्हणून त्यांच्यात झालेला बदल प्रेक्षकांनी वाखणले आणि अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली.
- अल्लू अर्जुनने तेलगू प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांमध्ये अल्लू अर्जुनचा समावेश होतो. ‘पुष्पा’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी प्रेक्षकांनाही तितकंच प्रभावित केल्याचं स्पष्ट झालं.
- पहिल्या चित्रपटामध्ये अभिनय करत असताना अल्लू अर्जुनला त्याचे वडील आणि आघाडीचे निर्माते अल्लू अरविंद यांचा आणि त्याचे मामा अभिनेते चिरंजीवी यांचा मोठा आधार लाभला होता. परंतु त्यानंतरचं यश मात्र त्याने स्वत: च्या कष्टाने मिळवलेलं आहे.
- गंगोत्री मधील आजाण सिंहाद्री हे पात्र आणि ‘पुष्पा’ मधील पुष्पाराज हा सराईत तस्कर यामध्ये बऱ्याच फरक आहे. ‘गंगोत्री’ प्रदर्शित झाला तेव्हा अल्लू अर्जुन केवळ 21 वर्षाचा होता. नवोदित कलाकार म्हणून त्याचा स्वत: चा आजाणपणा आणि अवघडले पणा चित्रपतील पात्राच्याही स्वभावाशी जुळणारा होता.
- पहिल्या चित्रपटातील त्याच्या कामावर बरीच टीका झाली. पं पुढच्याच वर्षी आलेल्या ‘आर्या’ या चित्रपटात मात्र त्याने स्वत: च्या अभिनयाने टिकाकारांना आपलंसं केलं.
- अल्लू अर्जुनने पडद्यावर रंगवलेली बहुतांश पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे. आर्या, आर्या-2, हॅपी, जुलाई या चित्रपटांमध्ये त्याने लोकांच्या चेहऱ्यावर स्मित फुलवणाऱ्या उत्साही भूमिका केल्या तर परुगू, वेदम, वरुडू, या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका लोकांच्या डोळ्यांमधून अश्रु काढणाऱ्या होत्या. अल्लू अर्जुन प्रत्येक पत्रावर स्वत:चा ठसा उमटवण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्याचा चित्रपट भरपूर कमी करणारा ठरला, तरी तो आत्यंनंदी होत नाही किंवा एखाद्या चित्रपटाने खराब कामगिरी केली ट्री निराश होत नाही.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!