8 दिवसांवर होत लग्नं! पण महाराष्ट्र केसरी चा जीम मध्ये मृत्यू, तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण का वाढतंय?

Wrestler Vikarm Parkhi Death

Wrestler Vikarm Parkhi Death: राष्ट्रीय खेळाडू आणि महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान विक्रम पारखी (Wrestler Vikarm Parkhi Death) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पुण्यामधील मुळशी तालुक्यातील माण येथे ही घटना घडली. या राष्ट्रीय खेळाडू पैलवान विक्रम पारखी यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने माणगावसह मुळशी तालुक्यावर आणि कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. पैलवान विक्रम पारखी यांचे येत्या 12 डिसेंबर लग्न होणार होते, मात्र काळाने त्याआधीच झडप घालून विक्रम ह्याला हिरावल्याने पारखी कुटुंबावर आनंदा ऐवजी दु:खाचा डोंगर कोसळलाय. पारखी कुटुंबावर कोसळलेल्या दु:खामुळे मुळशी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. विक्रम याने अनेक राष्ट्रीय पदक आणि किताब मिळवले आहेत.

a man with a beard
Wrestler Vikarm Parkhi Death

विक्रमने आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. मुळाशीतल्या माणगावचा भूमिपुत्र असलेल्या विक्रम पारखी याने कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपलं नाव कोरून मानाची गदा मिळवली होती. 28 नोव्हेंबर 2014 ला वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2014 झाली होती. त्यात विक्रम याने अजिंक्यपद मिळवले. पिंपरी चिंचवड मधल्या एका खासगी रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं. पण उपचाराआधीच डॉक्टरांनी ते मृत असल्याचं घोषित केलं. पोस्टमार्टमचे रिपोर्ट अजून यायचे असले तरी हृदय विकाराचा झटका आल्यानेच त्याचा मृत्यू झाला असं म्हटलं जात आहे.

पाठीमागच्या वर्षी सुद्धा मार्च महिन्यात कुस्तीपट्टू स्वप्नील पाडळे यांचाही अशाच पद्धतीने कुस्तीचा सराव करत असताना हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. तेही मुळशीचेच रहिवासी होते. अशा पद्धतीने व्यायाम करणाऱ्या, जीममध्ये नियमित जाणाऱ्या किंवा मैदानी खेल खेळणाऱ्या तरुणांना हृदयाचा त्रास होऊन जागीच मृत्यू ओढावल्याचा घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अनेकदा अगदी चालताना किंवा नाचताही एखादा तरुण अशा पद्धतीने अचानक खाली कोसळल्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर अनेकदा दिसतात. अशा पद्धतीने तरुण पद्धतीने तरुण वयात हृदय विकाराचा झटका येण्यामागचं करण काय असू शकेल आणि ते टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, ते आपण समजून घेणार आहोत.

Wrestler Vikarm Parkhi Death: याला हृदयविकाराचा झटका म्हणत नाही?

आपण सर्व जण मुळातच, हृदय विकाराच्या झटक्याने (हार्ट अटॅकने) मृत्यू होतो असं आपण म्हणतो ते चुकीचं आहे, असे डॉक्टर वैद्य सांगतात. ते हृदयरोगतज्ञ हे सांगतात की हृदयाचा त्रास हिऊं माणूस अचानक अशा पद्धतीने खाली कोसळतो तेव्हा त्याला हृदय अचानक अशा पद्धतीने खाली कोसळतो तेव्हा त्याला हृदय अचानक बंद पडणे (सडन कार्डीॲक डेथ) असं म्हणतात. ही संज्ञा वैद्यकीय क्षेत्रातही नवीन असल्याने याआधी फारसं त्याबद्दल सांगितले आणि बोलले जातं नव्हतं. हृदयातील रक्तवाहिनी अरुंद बनत जाते आणि बंद पडते किंवा आतल्या आत फुटते तेव्हा हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो किंवा बंद पडतो. रक्तपुरवठा होत नाही तो भाग मृत होत जातो आणि हृदयावरचा ताण वाढल्याने हृदयविकाराचा झटका येतो.

Wrestler Vikarm Parkhi Death

ही एक लांब प्रक्रिया असते. ती एका क्षणात, काही तासात किंवा दिवसांत होत नाही. त्यामुळे ती सहसा तरुणांमध्ये दिसण्याची शक्यता कमी असते. या वरती डॉक्टर सांगतात की प्रक्रिया घडण्यासाठी घात घटक कारणीभूत ठरतात. वाढलेला रक्तदाब, रक्तातली वाढलेलं साखरेचं प्रमाण, वाढलेली चरबी किंवा वाढलेलं वजन यासोबतच तंबाखू, धूम्रपान, खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताणतणाव अशा गोष्टींचा घात घटकांमध्ये समावेश होतो.

महत्वाचे म्हणजे व्यायाम करणाऱ्या लोकांना असा त्रास असेल तर त्यामागे हृदयाचा झटका नाही तर कार्डीॲक अरेस्ट म्हणजे अचानक हृदयक्रिया बंद पडणं हे कारण असतं.

Wrestler Vikarm Parkhi Death: ही काळजी घ्यायला पाहिजे

हृदयाच्या आजारांमुळे होणारे बहुतेक मृत्यू टाळता येऊ शकतात, असं ते म्हणतात. एका चांगल्या दर्जाच्या टुडीएको या तपासणीनेही या आजाराचं प्राथमिक निदान करता येऊ शकतं. सुरुवातीलाच आईच्या गर्भातल्या बाळाच्या हृदयाचं आरोग्य तपासण्यासाठी फिटल म्हणजे भ्रूण इको नावाची तपासणी असते. ती केली तर जन्मत चं हृदयात काही व्यंग नाही ना, हे समजतं. त्यानंतर जन्मानंतर ही एक इको तपासणी करून घ्यायला हवी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यापुढचा इको 12 ते 18 या वयात व्हायला हवा. नंतर 18 वर्ष वयानंतर पुढे दर पाच वर्षानी एक इको करून घेणं महत्वाचं आहे. या तपासणीत काही आढळलं तर त्याचं निदान करण्यासाठी पुढे सिटी स्कॅन एमआरआय करावा लागू शकतो. त्यानंतर प्रतिबंध औषध घेऊन मृत्यू टाळता येतात.

महत्वाची गोष्ट म्हणजेच व्यायाम करणारे, खेळाडू, क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेणारे या लोकांनी आपलं करिअर सुरू करण्याआधी एक उत्तम 2 डी इको करून घेतला पाहिजे इतकंच नाही तर त्याने स्ट्रेस स्टेस्ट, कार्डीओग्राम अशा तपासण्याही करायला हव्यात असे डॉक्टर सांगतात.

Wrestler Vikarm Parkhi Death

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम

बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाणही वाढलं आहे, असं तज्ञ सांगतात. काही वर्षापूर्वी उच्च रक्तदाब, ह्रदयविकाराचा झटका हे आजार 60 वर्ष वय असणाऱ्यांमध्ये जास्त दिसत होते. नंतर हे प्रमाण 50 वर्ष वयाच्या रुग्णांमध्येही दिसून आलं. पुढच्या 10 वर्षात चाळीशीतल्या रुग्णांनाच त्रास होऊ लागला. आता हा त्रास चक्क तिशीतल्या तरूणांनाही होत आहे.

गेल्या दोन तीन वर्षात डॉक्टरांकडे जाणाऱ्या 26 ते 30 वयोगटातल्या अनेक रुग्णांना खरोखर हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची तातडीने अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करावी लागली. पण हे सगळं शोधण्याची बरीचशी साधनं आता आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यामुळे या आजारांचा प्रतिबंध करता येणंही शक्य आहे. यासाठी वेळोवेळी तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. काही त्रास होत नाही तोपर्यंत डॉक्टरांकडे न् जाण्याची सवय अशावेळी घटक ठरु शकते.

तरूणांप्रमाणे तरुणींना धोका नाही?

हृदय विकाराच्या त्रासाने मृत्यू (Wrestler Vikarm Parkhi Death) झाल्याच्या बातम्यांमध्ये बहुतेक तरुण मुलेच दिसतात. कोणत्याही व्हिडिओमध्ये, बातमीत आजवर एकाही तरुणीचा हृदयविकाराने किंवा सडन कार्डीॲक डेथने मृत्यू झाल्याचं समोर आलेलं नाही. याचं कारण म्हणजे मुळातच धूम्रपान, तंबाखू, अशा व्यसनांना स्त्रीयांच्या तुलनेत पुरुष जास्त बळी पडतात. शिवाय, सिक्स ॲब्स, जीम, व्यायाम याबाबतचा ओढाही तरुण पुरुषांमध्ये जास्त दिसून येतो. या शिवाय मासिक पाळी व्यवस्थित सुरू असेल तर इस्ट्रोजेन या संप्रेरकामुळे महिलांना हृदयविकारापासून नैसर्गिक संरक्षण मिळत असतं. तरुण पुरुषांच्या तुलनेत पाळी येत असलेल्या तरुण स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण कमी असतं. असं तज्ञ सांगतात.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!