RSS Mohan Bhagvat
RSS Mohan Bhagvat: लोकसंख्या नितीमध्ये लोकसंख्या वृद्धीदर 2.1 पेक्षा कमी होऊ नये असे सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंच्या घटत्या जन्मदराबाबत केलेल्या वक्तव्यावर पंढरपूर राज्यभरातून आलेल्या विठ्ठल भक्तांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या. तर किमान 2 ते 3 अपत्ये असावे, असा सल्ला दिला. दुसऱ्या बाजूला महागाई वाढत असताना एक किंवा दोन मुलांना सांभाळणेच अवघड होत चालल्याचे विठ्ठल भक्त म्हणाले, या परिस्थितीत मुलांची संख्या वाढल्यास त्यांच्यासाठी होणारा खर्च कसा करायचा असा प्रश्नही त्यांनी विचारला.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या वारकरी मंडळींनी मोहन भागवतांच्या (RSS Mohan Bhagvat) वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ग्रामीण भागातून आता हिंदुच नाही तर मुस्लिमांचाही जन्मदर वाढत्या महागाईमुळे घटत चालला असून भागवत यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याचा दावा काही जणांनी केला. तर महिला भाविकांच्या मते आपल्या परिस्थिति नुसार मुलांची संख्या वाढली तरी हरकत नाही. मात्र या मुलांना व्यवस्थित वेळ देणे आणि त्यांचे करिअर अवघड असल्याने या पिढीतल्या महिलांना दोनच मुले योग्य वाटतात. दुसऱ्या बाजूला हिंदूंनी ही मुलांची संख्या वाढवणे गरजेचे असून ही सांगायची वेळ वेळ आज आलेली आहे हे दुर्दैव असल्याचे एका महिला भाविकांनी सांगितले. खरे तर ज्या पद्धतीने हिंदूंचा जन्मदर घटत चालल्याचे मुस्लिमांनी लोकसंख्या वाढत चालली आहे आणि यातूनच उद्या अनेक धोके येऊ शकतात अशी भीती त्या महिला भाविकांनी व्यक्त केली.
या महागाईत जर त्यांना मुलांची संख्या वाढवून जगणे शक्य होत असेल तर हिंदूंनी मुलांना जन्माला घालू नये असा सवाल तरुण भाविक करीत आहेत. तर रीतीने हिंदूंचा जन्मदर घटत चालला तर 1047 मध्ये भारतात आपण अल्पसंख्याक बनवून अशी भीती तुळजापूर च्या एका तरुण भाविकाने केली. भागवत हे म्हणाले की ‘अलीकडे जगभरात कट्टरता यामुळे भांडणे होत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या संस्कृतीचा प्रसार जगभर करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृति जाती, भाषा किंवा क्षेत्रापुरती मर्यादित नाही. आपल्याकडे मूल्यांना प्रथम स्थान आहे.’
RSS Mohan Bhagvat: वाढत्या लोकसंख्येमुळे भारतासमोर ही महत्वाची 6 गंभीर आव्हान
लोकसंख्येमध्ये भारताने चीनला मागे टाकत पहिल्या स्थानी उडी मारली आहे. 2023 च्या मध्यापर्यंत भारताची लोकसंख्या 142 कोटी 86 लाखांवर जाईल. तर चीनची लोकसंख्या ही 142 कोटी 57 लाख असू शकते. 2011 नंतर भारतात जनगणना झालेली नाही. त्यामुळे भारताची लोकसंख्या नेमकी कीती आहे याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. पण नॅशनल कमिशन ऑन पॉप्युलेशन नुसार 2011 ते 2036 पर्यंत या 25 वर्षामध्ये भारताची लोकसंख्या वाढून 152 कोटी 20 लाखांपर्यंत जाईल.
- संसाधनांवर ताण: सातत्याने वाढत असलेल्या लोकसंख्यामुळे निर्माण होणार सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे नैसर्गिक संसाधनावर वाढता ताण. या नैसर्गिक संसाधनांमध्ये जामीन, पाणी, जंगल आणि खनिज यांचा समावेश आहे. लोकसंख्या वाढीमुळे या संसाधनाचा प्रमाणापेक्षा जास्त वापर होतो.
- पायाभूत सुविधांवरील ताण:वाढत्या लोकसंख्येमुळे रहिवासी, परिवहन, आरोग्य आणि शिक्षण सुविधांचा विस्तार करण्याची गरज भासते. मोठ्या लोकसंख्येच्या आवश्यकता पूर्ण करणं हे अवघड बनतं. लोकसंख्येचा एक मोठा भाग बिकट परिस्थितीत जगण्यास भाग पडतं.
- बेरोजगारी: आता सध्या वाढती बेरोजगारी ही एक समस्या आहे. त्याच बरोबर इतक्या मोठ्या लोकसंख्येला कामात सामावून घेण्याचा प्रश्नही निर्माण होतो. यामुळे मोठ्या संख्येने लोकांना रोजगार (RSS Mohan Bhagvat) मिळण्यात आव्हानात्मक बनतं. सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे ही समस्या विक्रार रूप घेऊ शकते.
- शिक्षण कौशल्ये विकास: मोठ्या लोकसंख्येच्या देशात शिक्षण आणि कौशल्ये विकास हा मुद्दा आव्हानात्मक ठरु शकते. कारण लोकांना सुशिक्षित करणे, कुशल बनवणे यासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक संस्थांची संख्या त्या प्रमाणात असावी लागते. त्याचा थेट परिणाम म्हणजे अनेकांचा चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळू शकत नाही.
- दारीद्र्य आणि विषमता: वाढत्या लोकसंख्येमुळे दारीद्र्य रेषेखालील लोकांची संख्या वधू शकते. लोकांच्या उत्पन्नामध्येही फरक दिसण्याचा धोका आहे. गरीबी कमी करण्याचे प्रयत्न अशा स्थितीत जास्त करावे लागतील. एकूणच लोकांच्या जीवनशैलीचा स्तर, आरोग्य आणि शिक्षण यांची सांगड घालण्यात विषमता दिसू शकते.
- पर्यावरणाशी संबंधित आव्हाने: वाढत्या लोकसंख्येमुळे त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर दिसून येईल. जंगलतोड, वायु प्रदूषण या समस्यांमुळे पर्यावरणाचं संरक्षण आव्हानात्मक विषय ठरु शकतो. भारतात लोकसंख्या वाढीचा दर कमी असला ट्री धोरणात्मक नक्कीच प्रश्न उपस्थिती होतील.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!