Vaibhav Suryavanshi IPL 2025 Auction
Vaibhav Suryavanshi IPL 2025 Auction: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 साठी मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी 83 खेळाडूंचे ऑक्शन पार पडले. या पार पडलेल्या ऑक्शनमध्ये एकूण 577 खेळाडू शॉर्टलिस्ट झाले आहेत. तसेच आज 25 नोव्हेंबर 2025 रोजी अनेक दिग्गज तसंच नवोदित खेळाडूंचा लिलाव होणार आहे. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये ऋषभ पंत, श्रेयश अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांच्यावर सर्वात जास्त म्हणजेच 20 कोटींपेक्षा अधिक अधिक बोली लागलेली आहे. तर युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी 18 कोटी रुपयांची बोली लागलेली आहे. आज दूसरा दिवस खेळाडूंना मोठा भाव मिळाला आहे.
या ऑक्शन मधील सर्वात युवा खेळाडू बिहारचा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi IPL 2025 Auction) आहे. तो अवघ्या 13 वर्षी आयपीएल 2025 च्या लिलावात भाग घेतला आणि आणि त्याची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. तर वैभवला आपल्या टीम मध्ये घेण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही टीम मध्ये चुरशीची लढत पाहण्यात मिळाली, पण शेवटी राजस्थानने बाजी मारली आणि त्याला 1 कोटी 10 लाख रुपयांना विकत घेतले. त्यासोबतच ह्या मेगा लिलावात ‘लाल ऑफ बिहार’ मुकेश कुमार आणि आकाश दिपवर पैशांचा पाऊस पडला. लखनऊ ने आकाश दीपला 8 कोटी मोजले आहे आणि आपल्या संघात सामील करून घेतले आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने आरटिएम द्वारे 8 कोटी रुपये देऊन मुकेश कुमारला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. सीएसकेने मुकेशला विकत घेण्यासाठी पहिली बोली लावली.
पण पंजाब किंग्सनेही बोली लावायला सुरुवात केली. मुकेशला आपल्या टीम मध्ये घेण्यासाठी सीएसके आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये चढाओढ पहिला मिळाली. जेव्हा बोली ही 6.50 कोटींवर पोहचली तेव्हा चेन्नईने माघार घेतली. यानंतर दिल्ली कपिटल्सचा संघ हा मैदानात उतरला आणि दिल्लीने मुकेशसाठी आरटीएमचा वापर केला. ज्या अंतर्गत पंजाब किंग्जने मुकेशसाठी तब्बल 8 कोटी रुपये निश्चित केले, जे दिल्लीने स्वीकारले आणि आरटिएम अंतर्गत दिल्लीने मुकेशला आपल्या टीम मध्ये सामील केले.
Vaibhav Suryavanshi IPL 2025 Auction: 13 वर्षीय वैभव हा राजस्थान रॉयल्स संघाचा भाग
वैभव हा वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्याला आयपीएल मध्ये खेळण्याचा चान्स मिळाला. तर त्याच्यावर राजस्थान रॉयल्स या संघाने तब्बल 1.10 कोटी रुपयांची बोली लावून त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. आणि तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात युवा करोडपती बनला. वैभव बद्दल सांगायचे झाले तर तो बिहारचा रहिवासी आहे आणि तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये बिहार संघाचे प्रतिनिधित्व करतो.
या सीजन मध्ये वैभवला बिहार कडून पहिला रणजी सामना खेळायला मिळाला आणि आत्तापर्यंत त्याने 5 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 100 धावा केल्या आहेत आणि त्याने आत्तापर्यंत एकही शतक किंवा अर्धशतक झळकावलेले नाही. वैभवने आत्तापर्यंत एक टि-20 सामना खेळला असून त्यात त्याने 13 धावा केल्या आहेत.
वैभव सूर्यवंशी हा केवळ 13 वर्षीय युवा खेळाडू (Vaibhav Suryavanshi IPL 2025 Auction) असला तरी त्याच्या फलंदाजीत जी ताकद आहे. ती अलीकडेच वैभव भारताच्या अंडर – 19 संघात खेळला, जिथे त्याने ऑस्ट्रेलिया – ए विरुद्ध एक जबरदस्त असे शानदार शतक झलकावले. वैभव सूर्यवंशी ने अवघ्या 62 बॉल मध्ये 104 धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्या बॅटमधून 14 चौकार आणि 4 षटकार आले. वैभव सूर्यवंशी हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. वैभव सूर्यवंशी हा बिहार राज्यात ताजपुर येथे राहतो. वैभव हा अवघ्या 7 वर्षापासून क्रिकेट खेळत असून टु आठवड्यातून चार वेळा पाटण्याला 3 तास ट्रेनचा प्रवास करून जात असे.
सीएसकेच्या स्टार बॉलरची मुंबई इंडियन्समध्ये एंट्री
दीपक चाहर जो चेन्नई सुपर किंग्ज या संघासाठी मागील काही हंगामात पावरप्लेमध्ये धमाका करत होता. तर तो आता आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. पाच वेळेच्या चॅम्पियन संघाने 9.25 कोटी रुपयांची बोली लावून मेगा लिलावात दीपक चाहरला आपल्या ताफ्यात सामील केले आहे.
दीपक चाहर हा बराच काळ चेन्नई सुपर किंग्ज या संघाचा भाग होता. त्यामुळे असा विश्वास होता की संघ लिलावात त्याच्या नावावर मोठी बोली लावू शकेल. मात्र तसे होऊ शकले नाही. पण त्या उलट दीपक किंग्ज साठी पंजाबने मुंबईशी झुंज दिली. पंजाबने 8 कोटींची बोली लावल्यावर हात मागे घेतले. चेन्नई सुपर किंग्जने दिपकच्या नावावर फक्त एकच बोली लावली, पण मुंबई इंडियन्स 9.25 कोटींची बोली लावून दिपकला आपल्या संघात सामील केले.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!