IPL 2025: आयपीएल 2025 चा महालीलाव लवकरच! जाणून घ्या, कुठे आणि कशावर लाइव्ह पाहता येईल?

IPL 2025 Mega Auction Schedule

IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल 2025 चा महोत्सव हा जोरदार होणार आहे. प्रत्येक टीम ही बेस्ट मधले बेस्ट खेळाडू घेणार आहे. तर महालीलावात कोणत्या खेळाडूंवर मोठी बोली लागणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत. येत्या 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे मेगा लिलाव होणार आहे. या महिन्यातील 24 आणि 25 तारखेला मेगा लिलाव होणार आहे. एकूण 574 खेळाडू लिलावात बोली प्रक्रियेतून जातील. या यादीत 366 भारतीय खेळाडू आहेत, तर 208 परदेशी खेळाडू आहेत. यामध्ये असोसिएट देशांच्या 3 खेळाडूंचा समावेश आहे. बोली लावणाऱ्यांच्या अंतिम यादीत 318 भारतीय आणि 12 अनकॅप्ट परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2025 Mega Auction Schedule) उतरलेल्या 81 खेळांडूची ब्रेस प्राइस ही 2 कोटी रुपये आहे. तर 27 खेळाडूंची बेस प्राइस ही 1.50 कोटी आहे. 18 खेळाडूंनी त्यांची बेस प्राइस ही 1.25 कोटी ठेवली आहे. रिटेन्शन यादी जाहीर केल्यानंतर फक्त 204 स्लॉट शिल्लक आहेत. पंजाब किंग्जकडे सर्वाधिक 110.50 कोटी रुपये आहेत. तर राजस्थान रॉयल्सकडे सर्वात कमी 41 कोटी रुपये आहेत. आयपीएल लिलाव कीती वाजता आणि कुठे लाइव्ह पाहता येणार, जाणून घेऊया.

आयपीएल लिलाव सलग दुसऱ्यांदा भारताबाहेर होणार आहे. यावेळी खेळाडूंच्या मूळ किंमती 30 लाख रुपयांपासून सुरू होईल, जी गेल्या वेळेपेक्षा 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. इतर मूळ किंमती 40 लाख, 50 लाख, 75 लाख, 1 कोटी, 1.25 कोटी, 1.50 कोटी आणि 2 कोटी रुपये आहेत. मार्की प्लेअर्सची दोन वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यातआली आहे. प्रत्येक सेटमध्ये सहा सहा खेळाडू असतील. हे खेळाडू लिलावपूर्वीच चर्चेत असतात. पहिल्या सेटमध्ये जोस बटलर, श्रेयश अय्यर, ऋषभ पंत, कागीसो रबाडा, अर्शदीप सिंग आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश आहे. दुसऱ्या सेटमध्ये युझवेंद्र चहल, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मिलर, केएल राहुल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज असेल. म्हणजेच सुरुवातीलाच दिग्गज खेळाडूंवर बोली लागेल.

IPL 2025 Mega Auction Schedule
IPL 2025 Mega Auction Schedule

सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आयपीएल 2025 चा लिलाव कीती वाजता सुरू होईल? जेद्दाहमधील स्थानिक वेळेनुसार, दुपारी 12.30 वाजता आयपीएल मेगा लिलाव सुरू होईल. भारत आणि सौदी अरेबिया मध्ये 2 तास 30 मिनिटांचा फरक आहे. म्हणजे भारतात हा आयपीएल लिलाव दुपारी 3 वाजतासुरू होईल. बोर्ड गावस्कर टॉफीचा पहिला सामना सकाळी 7.50 वाजता सुरू होणार आहे. आयपीएल लिलाव सुरू होईपर्यंत भारत ऑस्ट्रेलिया कसोटीच्या दिवसाचा खेळ संपलेला असू शकतो.

IPL 2025 Mega Auction Schedule: खेळाडूंचे 2 संच

सर्व संघांसाठी एकूण 204 जागा रिक्त आहेत. यामध्ये 70 विदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. तर सर्वोच्च राखीव kinmat कोटी रुपये आहे. 2 कोटीच्या ब्रॅकेटमध्ये 81 खेळाडूंचा समावेश आहे. मार्की प्लेअर्सची दोन वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यातआली आहे. प्रत्येक सेटमध्ये सहा सहा खेळाडू असतील. हे खेळाडू लिलावपूर्वीच चर्चेत असतात. पहिल्या सेटमध्ये जोस बटलर, श्रेयश अय्यर, ऋषभ पंत, कागीसो रबाडा, अर्शदीप सिंग आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश आहे. दुसऱ्या सेटमध्ये युझवेंद्र चहल, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मिलर, केएल राहुल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज असेल. म्हणजेच सुरुवातीलाच दिग्गज खेळाडूंवर बोली लागेल.

संघांनी अनेक खेळाडूंना कायम ठेवले

अलीकडे, जेव्हा रिटेन्शन विंडो बंद झाली तेव्हा 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले होते. फ्रँचायझिंनी या रिटेन्शनसाठी एकूण 558.5कोटी रुपये खर्च केले होते. यापैकी, गतविजेते कोलकत्ता आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ होते. यांनी संपूर्ण रिटेन्शन कोटा पूर्ण केला आणि प्रत्येकी सहा खेळाडू कायम ठेवले. तर चेन्नईसुपर किंग्ज, गुजरात टायटन्स, लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्रत्येकी पाच खेळाडूंना कायम ठेवले होते. या सगळ्यात दिल्ली कॅपिटल्स, आरसीबी आणि पंजाब किंग्जने अनुक्रमे चार, तीन आणि दोन खेळाडू कायम ठेवले होते.

या महिन्याच्या सुरुवातीला 204 ठिकाणच्या लिलावासाठी एकूण 1574 खेळाडूंनी नोंदणी केली होती. भारतातील संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि भारतातून 1,165 खेळाडूंनी नोंदणी केली होती, तर 409 खेळाडू परदेशी होते. पण बीसीसीआयने अंतिम यादीतून अर्ध्याहून अधिक खेळाडूंना वगळून अंतिम यादी तयार केली आणि शुक्रवारी ती जाहीर केली.

IPL 2025 Mega Auction Schedule

IPL 2025 Mega Auction Schedule: आयपीएल 2025 महालीलाव लाइव्ह कुठे पाहता येईल?

आयपीएल लिलावामध्ये भारताचे सर्वाधिक 366 खेळाडू आहेत. ज्यामध्ये 48 कॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे. तर 208 विदेशी खेळाडू आहेत. त्यामध्ये 193 कॅप्ड खेळाडू आणि 12 सहयोगी देशाचे खेळाडू आहेत. हा आयपीएल लिलाव टीव्ही चॅनलवर स्पोर्टस् 18 वर आणि मोबाईवर जिओ सिनेमा ॲपवर लाइव्ह पाहता येणार आहे.

जेद्दाहमधील स्थानिक वेळेनुसार, दुपारी 12.30 वाजता आयपीएल मेगा लिलाव सुरू होईल. भारत आणि सौदी अरेबिया मध्ये 2 तास 30 मिनिटांचा फरक आहे. म्हणजे भारतात हा आयपीएल लिलाव दुपारी 3 वाजतासुरू होईल. बोर्ड गावस्कर टॉफीचा पहिला सामना सकाळी 7.50 वाजता सुरू होणार आहे.

IPL 2025 Mega Auction Schedule: हे दिग्गज खेळाडू मेगा ऑक्शनच्या थेट बाहेर

आयपीएलने शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली तेव्हा सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंच्या यादीतून अनेक दिग्गज क्रिकेटपटूंची नावे गायब होती. जगभरातील अनेक परदेशी खेळाडू जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट फ्रँचायझि लीगमध्ये सहभागी होतात आयपीएल 2025 मेगा लिलावात 208 परदेशी खेळाडूंची बोली लावली जाणार आहे यामध्ये 3 सहयोगी राष्ट्रातील खेळाडूंचाही समावेश आहे. पण वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे नाव या यादीत नाही. आर्चर आयपीएल 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी आला, परंतु कोपऱ्याच्या दुखापतीमुळे तो केवळ 4 सामने खेळून इंग्लंडला परतला. त्यामुळे मुबाई इंडियन्सचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

IPL 2025 Mega Auction Schedule

इंग्लंड झंझावती वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला आयपीएल 2025 च्या मेगा लिलावासाठी निवडण्यात आलेले नाही. ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीनही शॉर्ट लिस्टमध्ये नाही. त्याचप्रमाणे भारताचा अमित मिश्रा, इंग्लंडचा जेसन रॉय आणि ख्रिस वोक्स आणि युएसएचा सौरभ नेत्रावलकर यांना मेगा लिलावासाठी निवडण्यात आलेले नाही.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!