Ind vs Nz 1st Test
Ind vs Nz 1st Test:बंगळुरू कसोटी सामन्यातील पहिला दिवस पावसाने वाया गेला. दुसऱ्या दिवशी भारत न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमध्ये 3 कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरूतिल एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांग्लादेश विरुद्ध शेर असणारे भारतीय खेळाडू न्यूझीलंड समोर 46 धावांत ढेर झाले. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीत भारतीय क्रिकेट संघ सरेंडरच्या मूडमध्ये असल्याचे दिसून आले. पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर चाहत्यांना टीम इंडियाकडून दमदार फलंदाजी अपेक्षा होती, पाम दुसऱ्या दिवशी पहिल्या दोन सत्रात जे काही घडले.
ज्यामुळे बंगळुरू कसोटीत टीम (Ind vs Nz 1st Test) इंडियाने घरच्या मैदानावर सर्वात कमी धावसंख्या उभारली. टीम इंडियाने पहिल्या डावात केवळ 46 धावा केल्या होत्या. बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो एकदम चुकीचा असल्याचे सिद्ध झाले. न्यूझीलंडच्या धोकादायक गोलंदाजी समोर टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोलमडताना दिसली. टीम इंडियाची परिस्थिति इतकी खराब होती की दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले, तर अर्धा संघ खातेही उघडू शकले नाही. संघाकडून सर्वात जास्त ऋषभ पंतने 20 धावा केल्या. तर प्रथम फलंदाजी करताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा स्वत: 2 धावा करून बाद झाला तर यशस्वी जयस्वाल 13 धावा करून बाद झाला. न्यूझीलंडच्या गोलंदाजाच्या भेदक मारासमोर टीम इंडिया मैदानावर जास्त टिकू शकली नाही.
पाच फलंदाज तर खाते न उघडताच प्वेहेलियनकडे चालते झाले. विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, रवीचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा हे पाचही फलंदाज शून्यावर बाद झाले. भारताकडून फलंदाजीत सर्वाधिक धावा या ऋषभ पंतने 20 केल्या. न्यूझीलंड कडून मॅट हॅन्त्री याने पंजा मारला. 13.2 षटकात त्याने 3 निर्धार षटकांसह 15 धावा खरच करत 5 विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय विल्यम ओ रुर्के याने आपल्या खात्यात 4 विकेट्स जमा केल्या. साउदीला रोहित शर्माच्या रूपात एक विकेट मिळाली.
Ind vs Nz 1st Test: पहिल्या तासाभरात भारतीय संघाने गमावल्या 3 विकेट्स
पहिल्या दिवस पावसामुळे वाया गेला. परिणामि पहिल्या कसोटी सामन्यातील नाणेफेक ही दुसऱ्या दिवशी झाली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चांगला फसला. यशस्वी जैस्वाल सोबत रोहित शर्माने भारताच्या डावाला सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 9 धावा असताना रोहितच्या रूपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. या धक्क्यातून टीम इंडिया सावरलीच नाही. विराट अन् सर्फराजही ठराविक अंतराने माघारी फिरले. अन् टीम इंडिया अडचणीत आली.
Ind vs Nz 1st Test: बांग्लादेश विरुद्ध शेर, न्यूझीलंड समोर ढेर
ज्या चिन्नास्वामीच्या मैदानावर षटकार आणि चौकरांचा पाऊस पडतो त्याच मैदानावर टीम इंडियाला धावा करणे कठीण झाले. खेळाच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी खेल संपवला. रोहित शर्माला अवघ्या 2 धावांवर बोल्ड करणाऱ्या टीम इंडियाला टीम साऊदीने पहिला धक्का दिला. यानंतर विराट कोहली क्रीजवर आला आणि हा खेळाडू खाते न उघडताच बाद झाला. यानंतर सर्फराज खानसोबतही असेच झाले. न्यूझीलंड कडून मॅट हेन्त्रीने सर्वाधिक पाच विकेट काढल्या तर विल्यम रुर्केच्या नावावर चार विकेट.
विकेट पडण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू राहिली
ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल डाव सांभाळतिल असे वाटत होते पण न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांचे नियोजन वेगळे होते. विल्याम ओरुर्केनेही यशस्वी जयस्वालला बाद केले. केएल राहुललाही खाते उघडता आले नाही आणि टीम इंडियाने 33 धावांत निम्मा संघ गमावला. यानंतर जणू काही दोन विकेट पडायच्या रांगेत आहेत. जडेजा आणि आश्विनही शून्यावर स्थिरावले आणि काही वेळातच टीम इंडियाची लाजिरवाणी धावसंख्या झाली. जी त्याची देशांतर्गत कसोटी सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या आहे.
Ind vs Nz 1st Test: टीम इंडियाची सर्वात लहान धावसंख्या
ज्या चिन्नास्वामी मैदानावर षटकार आणि चौकरांचा पाऊस पडतो. त्याच मैदानावर टीम इंडियाला धावा करणे कठीण झाले. 46 धावा ही टीम इंडियाची मायदेशातील सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 1979 मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध 75 धावांत गारद झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इन्डियला 36 धावांत गुंडाळले होते. ही टीम स्वत:च्या घरी 50 धावांपर्यंत पोहोचू शकली नाही.
अर्धा संघ शून्यावर बाद
बऱ्याच वर्षानी म्हणजेच 2016 नंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कोहलीला खातेही उघडता आले नाही. बांग्लादेश विरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने जिंकल्यानंतर भारतासमोर आता न्यूझीलंड कडवे आव्हान आहे. बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी किवी गोलंदाजांची धोकादायक गोलंदाजी पाहायला मिळाली. विराट कोहली, सर्फराज खान, केएल राहुल, रवीचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा हे पाचही फलंदाज शून्यावर बाद झाले.उपहारानंतर फलंदाजीला आलेला आर आश्विनही जास्त वेल क्रीजवर राहू शकला नाही आणि खातेही न उघडता बाद झाला.
Ind vs Nz 1st Test: या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारत: रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान, विराट कोहली, रिषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जाडेजा, आर आश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बूमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड: डेवोन कॉनव्हे, टॉम लेथम, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरेल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, मॅट हेनरी, टीम साउदी, एजाज पटेल, विलियम ओ रुर्के.
Ind vs Nz 1st Test: भारतीय संघात कोणाला मिळाले स्थान?
या सामन्यात भारतीय संघ 3 फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ 3 वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. मात्र यावेळी भारतीय संघाने आकास दीपला संघाबाहेर करून कुलदीप यादवला प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं आहे. यश फलंदाजी क्रमातही मोठा बदल केला आहे. शुभमन गिलच्या या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग 11 समावेश करण्यात आलेला नाही. त्याच्या जागी सर्फराज खानला संधी दिली गेली आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!