Amit Shah Visit Mumbai
Amit Shah Visit Mumbai: भारताचे भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन (Amit Shah Visit Mumbai) दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. ते रविवारी मुंबई दाखल झाले. आज अमित शाह लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी दाखल झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन अमित शाह यांनी बप्पाचे दर्शन घेतले आहे. दरम्यान अमित शाह रविवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी मातृभाषे बाबत महत्वाचं भाष्य केलं. घरात मातृभाषे मधून बोललं पाहिजे असं आवाहन करत बॉम्बे नको तर मुंबई नाव हवं अशी मागणी करण्यामध्ये मी देखील होतो, असंही अमित शाह यांनी म्हंटलं आहे.
शाह यांच्या या दौऱ्याची राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा झाली याचं विमानतळावर स्वागत करण्यापासून ते विविध गणपतीचं दर्शन घेण्यापर्यंत त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. मात्र अजित पवार हे मुंबईत असूनही शाह यांच्या भेटीसाठी न गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
Amit Shah Visit Mumbai: अमित शाह मातृभाषेबद्दल काय म्हणाले?
माझ्या घरातही दोन माझे नातवंड आहेत. त्यांनी संस्कृत किंवा गुजराती भाषा शिकावी, यासाठी मी त्यांना वेळ देतो. तसेच त्यांच्या शाळेत जाऊनही चर्चा करत असतो. त्यांच्या शाळेचे शिक्षक भाषा आणि भाषेचं व्याकरण व्यवस्थित शिकवतात की नाही हे देखील पाहत असतो. मी आपल्या सर्वाना एक आवाहन करू इच्छितो की, कमीत कमी आपल्या घरात तरी आपल्या मातृभाषेतून बोला. त्यामुळे आपल्या मातृभाषेला आपली मुळे पुढे घेऊन जातील. अन्यथा एक दिवस असा येईल की देशात आपल्याला मोठ्या संख्येने वृद्धाश्रम काढण्याची वेळ येईल. याचं कारण म्हणजे घरामध्ये नातू मातृभाषेत बोलले नाही तर नातवाचं आणि आजोबांच नातं कसं जोडणार? त्यामुळे मातृभाषा बोलणं गरजेचं आहे”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
“बॉम्बेचं मुंबई करण्यात माझं योगदान आहे” म्हणणाऱ्या अमित शाहांना: संजय राऊत यांच प्रत्युत्तर
बॉम्बेची मुंबई करण्यामध्ये माझे योगदान आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले. याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून आम्ही काय गोट्या खेळत होतो का? असा सवाल केला. हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बॉम्बेचे मुंबई व्हायलाच पाहिजे, पाट्या मराठीत व्हायलाच पाहिजे म्हणून 50 वर्ष आंदोलन केले. आमच्या इतर काही पक्षातील सहकाऱ्यांनी हा विषय कोर्टात नेला. अनेक जण या लढाईत होते. आता तुम्ही मुंबईला येतं आणि बॉम्बेचे मुंबई मी केले सांगतात. लोकं काय विश्वास ठेवणार, असेही राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई निर्माण झाली. ते हुतात्मे देण्याची क्षमता महाराष्ट्रात आणि असली शिवसेनेमध्ये आहे. तुमच्या बगलेतल्या ढोंगी शिवसेनेमध्ये नाही. ते लाचार आहेत.
आमच्या शिवसेनेमध्ये अजूनही मुंबई आणि मराठी माणसांसाठी बलिदान देण्याची तयारी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही राऊत यांनी दिला. लालबागचा राजाही गुजरातला नेईल या विधानवरून गदारोळ करणाऱ्या भाजपलाही संजय राऊत यांनी फटकारले. माझं विधान काय होते. आम्हाला भीती वाटते. गुजरातचे व्यापारी मंडळ, भाजप महाराष्ट्राच्या राजधानीवर सातत्याने हल्ले करतेय. मुंबई ओरबाडन्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईतल्या सगळ्या उत्तम आणि चांगल्या गोष्टी गुजराती व्यापार मंडळाच्या फायद्यासाठी गुजरातला न्यायचा प्रयत्न सुरू आहे. मग उद्योग, व्यापार किंवा आंतराष्ट्रीय वित्तीय केंद्र असो. यासाठीच त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसही तोंडली. त्यामुळे आम्हाला भीती वाटते की जे वैभवाचे प्रतीष्ठेचे आहे ते सगळे ओरबाडून तर नेणार नाही ना, असे राऊत म्हणाले.
काल देशाचे गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले तेव्हा आम्हाला भीती वाटली की पुढच्या वर्षी लालबागच्या राजाला अहमदाबादला तर घेऊन जाणार नाही ना. याआधीही अमित शहा अनेकदा मुंबईत आले पण तेव्हा आम्ही प्रश्न निर्माण केला नव्हता. पण आता भय वाढले आहे. कारण सत्तेच्या बळावर ते काहीही उचलून नेऊ शकतात. आम्ही लालबागकया राजाचे भक्त आहोत. आमची श्रद्धा आहे. या श्रद्धेसंदर्भात आमच्या मनात शंका आल्या ही सगळी जी झुंड आलेली आहे ती लालबागच्या राजा संदर्भात वेगळा निर्णय तर घेणार नाही ना. लालबागचा राजा मुंबईची शान आणि प्रतिष्ठा आहे. लाखों श्रद्धाळू तिकडे येतात. हे भाग्य मुंबईतल्या दैवतांना मिळते. त्यामुळे कुणाच्या पोटात दुखत असेल. त्याच्यामुळे देवच पळवण्यासारखे काहीही होऊ शकते, असेही राऊत म्हणाले.
Amit Shah Visit Mumbai: अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात नेमकं काय घडलं?
अमित शहा यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शाह यांचे स्वागत केले. त्यानंतर शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते अमित शाह यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना शासन आपल्या दारी पुस्तकांची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. त्यानंतर शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. तसेच लालबागच्या राजाचेही दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे, फडणवीस, विनोद तावडे, केसरकर, बानकुळे, रावसाहेब दानवे, आदी होते. मात्र अजित पवार कुठेच नव्हते. यावरून राजकीय वर्तुळाच चर्चा झाली होती.
Amit Shah Visit Mumbai: मातृभाषा सक्तीची करणार
आता यापुढे जे नवीन शैक्षणिक धोरण येईल, त्यामध्ये आम्ही मातृभाषा सक्तीची करणार आहोत. मग या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध देखील होऊ शकतो. हे देखील आम्हाला माहिती आहे. मात्र, तरीही आम्ही हा निर्णय घेणार आहोत, असंही गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मुंबईसाठी ज्या लोकांनी आंदोलन केलं, मुंबई हेच नव हवं अशी मागणी ज्या लोकांनी केली होती, त्यामुळे मी देखील होतो. तेव्हा बॉम्बे नको तर मुंबई नाव हवं, अशी मागणी मी देखील केली होती, असं यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!