Jawa 42 FJ: Royal Enfield टक्कर देण्यासाठी, Jawa ने केली जबरदस्त लुक सह न्यू बाइक

Jawa 42 FJ Price

Jawa 42 FJ Price: लोकप्रिय टू-व्हीलर कंपनी Jawa Yezdi ने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन बाइक लॉन्च केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यातच देशांतर्गत बाजारात Jawa 42 ला अपडेट केले होते. त्यानंतर आता Jawa 42 FJ विक्रीसाठी लॉन्च करण्यात आली आहे. आकर्षक लिक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या बाइकची सुरुवातीची किंमत 1.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्यांच्या टॉप मॉडेलची किंमत 2.20 लाख रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) असेल. ही नवीन बाइक Jawa 42 च्या तुलनेत 26,000 रुपयांनी महाग आहे. कंपनीने बाईकचे प्री- बुकिंग सुरू केले असून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वरून फक्त 942 रुपयांमध्ये बुकिंग करता येईल. नियमित Jawa 42 च्या तुलनेत ही बाइक 26 हजारांनी महाग असेल. कंपनी या बाइकची प्री बुकिंग सुरू केली आहे.

Jawa 42 FJ Price
Jawa 42 FJ Price

Jawa 42 FJ साठी बुकिंग आता उघडले आहे, डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहेत. क्लासिक स्टायलिंग, आधुनिक वैशिष्ट्ये आणि दमदार कामगिरीच्या संयोजनासह जावा 42 एफजे स्टायलिश आणि सक्षम मोटरसायकलच्या शोधात असलेल्या उत्साही लोकांना आकर्षित करण्याचा दावा करते. भारतीय बाजारपेठेत ही मोटरसायकल अरोरा ग्रीन मॅट, कॉस्मो ब्लु मॅट, मिस्टीक कॉपर, डिप ब्लॅक रेड ब्लॅक आणि डिप ब्लॅक ब्लॅक कॅड या पाच वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Jawa 42 FJ कशी आहे?

बाईकच्या डिझाइन बद्दल बोलायचं झाल्यास तिला मॉडर्न रेट्रो लुक देण्यात आला आहे. यात टीयर ड्रॉपच्या आकाराची इंधन टाकी देण्यात आली आहे. साइड पॅनल जावा 42 प्रमाणेच आहे, जे ब्रॅंडचा इतिहास घेत खासप्रकारे डिझाइन करण्यात आलं आहे. जावा 42 एफजे मध्ये मल्टी अलॉय व्हील, ब्लॅक आउट इंजिन आणि अपस्वेप्ट एक्झॉस्ट पाइप सारखे एलिमेंट्स आहेत. कंपनीने ही बाइक एकुन पाच रंगांमध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये अरोरा ग्रीन मॅट, कॉस्मो ब्लु मॅट, मिस्टीक कॉपर, डिप ब्लॅक रेड ब्लॅक आणि डिप ब्लॅक ब्लॅक कॅड यांचा समावेश आहे. या सर्व कलर व्हेरीएंटची किंमतही वेगळी आहे.

Jawa 42 FJ Price
Jawa 42 FJ Price

Jawa 42 FJ Price: प्राइस आणि फीचर्स

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास बाइकमध्ये एलईडी लाइट्स, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि सिंगल पॉंड, डिजिटल इन्स्टूमेंट क्लस्टर आहे. बाइकमध्ये स्टील चेसिसचा वापर करण्यात आला आहे. जॉ 41 मिमी टेलिस्कोपीक फोर्क आणि ट्विन शॉक शोषक यांसारख्या सस्पेशन्सने सुसज्ज आहे. ब्रेकिंगसाठी समोर 320 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील डिस्क ब्रेक वापरण्यात आला आहे.

VariantColourPrice (EX Showroom
Delhi)
Dual Channel ABS, AlloyDeep Black Matte Red Clad Rs. 2,20,142
Dual Channel ABS, AlloyDeep Black Matte Black Clad Rs. 2,20,142
Dual Channel ABS, AlloyCosmo Blue Matte Rs. 2,15,142
Dual Channel ABS, AlloyMystique CopperRs. 2,15,142
Dual Channel ABS, AlloyAurora Green MatteRs. 2,10,142
Dual Channel ABS, SpokeAurora Green Matte SpokeRs. 1,99,142
Jawa 42 FJ Price
Jawa 42 FJ Price

स्पेसिफिकेशन्स

  • यात टीयर ड्रॉपच्या आकाराची इंधन टाकी देण्यात आली आहे. साइड पॅनल जावा 42 प्रमाणेच आहे, जे ब्रॅंडचा इतिहास घेत खासप्रकारे डिझाइन करण्यात आलं आहे. हीच ब्रॅंडची ओळख असल्यामुळे यात कुठलाही बदल केलेला नाही. बाईकचा टेल लाइट्स मागील फेंडरमधून बाहेरच्या दिशेने दिले आहेत.
  • Jawa 42 FJ मध्ये स्पोक अलॉय व्हील, ब्लॅक आउट इंजिन आणि अपस्वेप्ट एक्झॉस्ट पाईप मिळतात. यामुळे या बाईकला थोडा स्पोर्टी लुक देखील मिळतो. त्याच्या बेस मॉडेलमध्ये वायर स्पोक व्हील देण्यात आले आहेत. कंपनीने ही बाइक एकुन पाच रंगांमध्ये लॉन्च केली आहे. अरोरा ग्रीन मॅट, कॉस्मो ब्लु मॅट, मिस्टीक कॉपर, डिप ब्लॅक रेड ब्लॅक आणि डिप ब्लॅक ब्लॅक कॅड हे रंग मिळतात. या सर्व कलर व्हेरीएंटची किंमतही वेगळी आहे.
  • कंपनीने या बाइकमध्ये 334 सिसी क्षमतेचे लिक्विड कुल्ड सिंगल सिलेंडर इंजिन वापरले आहे. हे इंजिन 29.1 hp पॉवर आणि 29.6 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन स्लिप आणि असिस्ट क्लच तंत्रज्ञानासह 6 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. हे इंजिन नेहमीच्या Jawa 42 पेक्षा सुमारे 2 hp अधिक पॉवर जनरेट करेल. एकूणच कंपनीच्या डाव्यानुसार लुक, डिझाइन आणि परफॉर्मन्सच्या आधारावर ही बाइक चांगला पर्याय ठरू शकते.
  • बाइकमध्ये एलईडी लाइट्स, यूएसबी चार्जिंग पोर्ट, सिंगल पॉंड, डिजिटल इन्स्टूमेंट क्लस्टर आहे. बाइकमध्ये स्टील चेसिसचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 41 मिमी टेलिस्कोपीक फोर्क आणि ट्विन शॉक यांसारखे सस्पेन्शन मिळतात. ब्रेकिंगसाठी समोर 320 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूसह डिस्क ब्रेक वापरण्यात आला आहे.
  • एकूण 184 किलो Jawa 42 FJ च्या सीटची ऊंची 790 मिमी आहे. याचा अर्थ असा की ही बाइक सरासरी ऊंचीच्या लोकांसाठी देखील चांगली असेल. त्याचे ग्राऊंड क्लियरन्स 178 मिमी आहे. ही बाइक नेहमीच्या Jawa 42 पेक्षा जवळपास 2 किलो वजनाने जास्त आहे. या बाइकमध्ये डयूअल चॅनल अँटी- लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) चा माणक म्हणून समावेश करण्यात आला आहे.

Jawa 42 FJ Price: पॉवर आणि परफॉर्मन्स

या मोटरसायकलमध्ये कंपनीने 334 सिसी क्षमतेचे लिक्विड कुल्ड सिंगल सिलेंडर इंजिन वापरले आहे. हे इंजिन 29.1 hp पॉवर आणि 29.6 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन स्लिप आणि असिस्ट क्लच तंत्रज्ञानासह 6 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. हे इंजिन नेहमीच्या Jawa 42 पेक्षा सुमारे 2 hp अधिक पॉवर जनरेट करेल. एकूणच कंपनीच्या डाव्यानुसार लुक, डिझाइन आणि परफॉर्मन्सच्या आधारावर ही बाइक चांगला पर्याय ठरू शकते.

Jawa 42 FJ Price
Jawa 42 FJ Price

Jawa 42 FJ Price: या गाड्यांशी स्पर्धा

Jawa 42 FJ बाइक 350 cc सेगमेंट मधील बाईक्सशी स्पर्धा करेल. रॉयल एनफील्ड क्लासिक 350, टिव्हीएस रोनिन आणि रॉयल एनफील्ड हंटर 350 मॉडेलशी तिची स्पर्धा असेल. नुकतीच Royal Enfield ने नवीन Classic 350 लॉन्च केली आहे. ज्याची सुरुवातीची किंमत 1,99,500 रुपये आणि टॉप मॉडेल 2,30,000 रुपये (एक्स शोरूम चेन्नई) करण्यात आली आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!