Telegram Ban in India: खरच भारतात टेलिग्राम बॅन होणार का? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Telegram Ban in India

Telegram Ban in India: टेलिग्राम चा वापर करणाऱ्या यूजर्स साठी काही चांगली बातमी नाही. दिवसेंदिवस लोकप्रिय असलेल्या इन्स्टंट मेसेजिंग ॲप टेलिग्रामवर भारत सरकार बंदी घालू शकतं. कारण सध्या सरकारद्वारे टेलिग्रामची चौकशी सुरू आहे. सरकारला शंका आहे की या ॲपचा वापर खंडणी आणि जुगार सारख्या बेकायदेशीर हालचालीसाठी केला जात आहे. जर एखादं ॲप अश्या कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कामांसाठी वापरलं जात असेल तर भारतात त्यावर बंदी घातली जाऊ शकते.

ॲपवर सुरू असलेल्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका टेलिग्रामच्या सीईओना फ्रान्समध्ये अटक करण्यात आली होती. या पाश्वभूमीवर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय सायबर क्राइम कॉर्डीनेशन सेंटर आणि इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाचे अधिकारी टेलिग्राम वरील दैनदीन व्यवहरांचा अभ्यास करीत आहेत. टेलिग्रामचे भारतात 50 लाखांहून अधिक यूजर्स आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर ही अकाऊंट ब्लॉक करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, टेलिग्राम ॲपवर (Telegram Ban in India 2024)अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या पेपर लिकमध्येही टेलिग्राम ॲपचं नाव समोर आलं आहे. टेलिग्राम वर खंडणी आणि जुगार यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे, दरम्यान पेपरफूटी प्रकरणी सरकारला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. करण विरोधकांनी पेपरफुटीचा मुद्दा बनवून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. अशा परिस्थितीत पेपरफूटी प्रकरण आणि टेलिग्रामचं कनेक्शन समोर आलं आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनं टेलिग्रामची चौकशी सुरू केली आहे.

Telegram Ban in India
Telegram Ban in India

काही दिवसांपूर्वी यूजीसी नीट वादाला सरकारला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले. या मेडिकल प्रवेश परीक्षेचा पेपर लिक झाल्याच्या प्रकरणात सरकारने टेलिग्रामच्या सहभागाचा तपास सुरू केला आहे. असा आरोप केला जात आहे की टेलिग्राम ॲपमधून पेपर 5,000 रुपये ते 10,000 रुपयांच्या किंमतीला विकला गेला होता. इतकेच नाही तर टेलिग्राम वर खोट्या बातम्या पसरवल्याचा देखील आरोप झाला आहे. या मिडिया रिपोर्टनुसार केंद्रीय गृहमंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कडून या प्रकरणाचा वेगाने तपास केला जात आहे. याआधी देखील टेलिग्रामला सरकारकडून नोटिस पाठवण्यात आली होती. यामध्ये ॲपमधून बालगुन्हेगारी संबंधीचा मजकूर काढून टाकण्यास सांगितले होते. त्यावेळी टेलिग्राम म्हंटले होते की ते पूर्णपणे भारताच्या कायद्याचे पालन करते.

Telegram Ban in India: टेलिग्रामचे संस्थापक अटकेत

फ्रान्सच्या पॅरिस एयर पोर्टवरून टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल ड्युरोव यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मनी लॉंडरिंग आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी टेलिग्रामचा वापर केल्याचा आरोप आहे. मिडिया रिपोर्टनुसार, फ्रान्स आणि रशियाचे दुहेरी नागरिकत्व असलेल्या 39 वर्षीय ड्युरोव शनिवार 24 ऑगस्ट अझरबायजानहून मेसेजिंग सर्व्हिस- टेलिग्राम उतरल्यानंतर पॅरिस- ले बॉर्जेट विमानतळावर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. भारतातही इन्स्टंट मसेजिंग सर्व्हिस- टेलिग्रामचे नाव अनेक गुन्हेगारी प्रकरणामध्ये समोर आलं आहे.

Telegram Ban in India: अनेक गुन्ह्यात आढळला टेलिग्रामचा सहभाग

टेलिग्राम हे भारतातील लोकप्रिय मसेजिंग प्लॅटफ्रॉम आहे टेलिग्रामचे भारतात सुमारे 50 लाखांहून अधिक युजर आहेत. मात्र टेलिग्राम ॲपवर अनेक प्रकारचे गंभीर आरोप यापूर्वी करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या पेपर लिकमध्येही टेलिग्राम ॲपचं नाव समोर आलं होतं. याशिवाय टेलिग्रामवर खंडणी आणि जुगार यांसारख्या गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनं टेलिग्रामची चौकशी सुरू केली आहे. त्यातच फ्रान्सच्या पॅरिस एअरपोर्ट वरुण टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पावेल ड्युरोव यांना अटक करण्यात आल्यानंतर भारतात हे ॲप बॅन होण्याची चर्चा सुरू झाली.

Telegram Ban in India

पावेल यांच्यावर मनी लॉंड्रिंग आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी टेलिग्राम वापर केल्याचा आरोप आहे. दरम्यान टेलिग्रामचे प्रमुख पावेल दुरावे यांना अटक केल्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं (आयटी) गृह मंत्रालयाकडून माहिती मागवली आहे. यामध्ये त्यांनी भारतातही ॲपद्वारे कोणतेही उल्लंघन केलं आहे का, असा सवाल केला आहे. आयटी मंत्रालयानं याबाबत कोणतंही उत्तर दिलेलं नाही.

Telegram Ban in India: टेलिग्रामवर भारतात झालेले आरोप

  1. भारतात 3 मे 2023 रोजी अनेक NEET-UG अर्जदारांना परीक्षेच्या एक दिवस आधी वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरच्या काही प्रती मिळाल्या यानंतर देशभरात वाद निर्माण झाला होता. या प्रती पाच हजार ते 10 हजारांना विकल्याचा आरोप झाला होता. दरम्यान आयटी मंत्रालयानं एमएचए कडून अहवाल मागवला आहे. त्यात हे पेपर टेलिग्राम बारून पाठविण्यात आल्याचा आरोप होता.
  2. त्यानंतर 19 जून 2023 रोजी होणारी UGC-NET परीक्षा टेलिग्रामवर पेपर लिक झाल्याच्या एका दिवसानंतर रद्द करण्यात आली. या समस्येवर लक्ष वेधताना केंद्रीय शिक्षक मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, आम्ही मूळ UGC-NET प्रश्न टेलिग्राम वरील प्रश्नांशी जुळवून पहिले आणि ते अगदी तंतोतंत जुळले आहेत.
  3. 3 मे भोपाळमधील दोघांना स्थानिक डॉक्टरांची 38 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यामध्येही या लोकांनी टेलिग्रामचा वापर केला होता.
  4. 24 जुलै रोजी, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) नं टेलिग्राम माध्यमातून चलवलेलं स्टॉक प्राइस रिगिंग रॅकेट उघडकीस आणलं होतं.
Telegram Ban in India

दरम्यान टेलिग्रामचे प्रमुख पावेल दुरोव यांना फ्रान्समध्ये अटक केल्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं (आयटी) गृह मंत्रालयाकडून माहिती मागवली आहे. यामध्ये त्यांनी भारतातही ॲपद्वारे कोणतेही उल्लंघन केलं आहे का, असा सवाल केला आहे. आयटी मंत्रालयानं याबाबत कोणतही उत्तर दिलेलं नाही.

Telegram Ban in India: भारतात टेलीग्राम वर बंद होणार का?

मिडिया रिपोर्टनुसार भारत सरकार मेसेजिंग ॲपटेलिग्राम ची चौकशी करत आहे. कारण सरकारला शंका आहे की या ॲपचा वापर खंडणी आणि जुगार सारख्या बेकायदेशीर कामांसाठी केला जात आहे. या चौकशीच्या आधारावर या ॲपवर बंदी घातली जाऊ शतके. ही चुकशी गृह मंत्रालय (MHA) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत भारतीय सायबर क्राइम को ऑर्डिनेशन सेंटर करत आहे. रिपोर्टनुसार भारत सरकार Peer- To- Peer (P2P) कम्युनिकेशन केंद्रस्थानी ठेऊन चौकशी करणार आहे. या तपासात बेकायदेशीर कामाची चौकशी होईल. यांच्या रिपोर्टनंतर निर्णय घेतला जाईल.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!