श्रीकृष्ण जन्माष्टमी: दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडवा? शास्त्रानुसार

Shri Krishna Janmashtami 2024

Shri Krishna Janmashtami 2024: हिंदू धर्मात जन्माष्टमीला अधिक महत्व आहे. या दिवशी श्रीकृष्णाचा बाळ लिलेची पूजा केली जाते. कृष्ण जन्माष्टमी हा सण हिंदूधर्मात अधिक खास मानला जातो. दरवर्षी हा सण श्रावण महिन्यातील करूहण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा करण्यात येतो. यंदा हा सण 26 ऑगस्टला सोमवारी अजर केला जाणार आहे. या दिवशी विधिवत पद्धतीने श्रीकृष्णाच्या बाळ लिलेची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद प्राप्त होतात.

श्रीकृष्णाला पूर्णावतार मानले जाते. महाभारतातील श्रीकृष्णाची भूमिका ही अगदी भिन्न होती. महाभारताच्या युद्धामध्ये श्रीकृष्णाने धर्माला साथ दिली होती. श्रीकृष्णाने हातात शस्त्र न घेता महाभारत युद्धात पांडवांना विजय मिळून दिला. अर्जुनाची द्विधा मन: स्थिति झाली, तेव्हा श्रीकृष्णाच्या मुखातून काळातील ज्ञान बाहेर पडले, ते म्हणजे भगवद्रीता. एकूण महाभारत काळात श्रीकृष्ण नीती ही अद्भुत ठरली. बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्रीता मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमीच स्मरण केले जाते. आज ही अनेक अभ्यासक श्रीकृष्णाचे आचार, विचार, तत्वज्ञान, नितीवर अभ्यासक संशोधक करत आहेत. श्रीकृष्णाने मुसद्दी पणाने घेतलेले काही निर्णय कलाटणी देणारे ठरले, असे सांगितले जाते.

श्रीकृष्णाचा जन्माष्टमी उत्सव (Shri Krishna Janmashtami 2024) भारतभर साजरा केला जातो. श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आदि विविध नावांनी देशाच्या विविध भागात अनेकविध पद्धतीने साजरी केली जाते. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी अ ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. महाराष्ट्रात विशेषत: मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही, दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते. यानंतर विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात.

Shri Krishna Janmashtami 2024
Shri Krishna Janmashtami 2024

श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास केला जातो. हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे. याच दिवशी श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवारीही उपवास केला जातो. अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो. परंतु श्रावणी सोमवारचा उपवास सोडला, तर जन्माष्टमीचा उपवास भंग होईल. त्यामुळे अनेकांना मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की, जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा असेल, तर मग श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडायचा? या दिवशी केल्या जाणाऱ्या उपवासाबाबत आणि तो सोडण्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असल्याचे म्हंटले जात आहे. कोणता उपास कधी आणि कशा प्रकारे सोडवा, हे जाणून घेऊया.

Shri Krishna Janmashtami 2024: जन्माष्टमीला रोहिणी नक्षत्राचा शुभ योग कधी?

यंदाच्या वर्षी जन्माष्टमी, अष्टमी तिथी एकाच दिवशी असल्याने सर्व संत-महंत, तपस्वी आणि गृहस्थ एकाच सिवशी श्रीकृष्णाची पूजा करू शकतील. सोमवार, 26 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी अष्टमी तिथी सुरू असून, 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2 वाजून 20 मिनिटांनी अष्टमी समाप्त होईल. जन्माष्टमीच्या दिवशी रोहणी नक्षत्र दुपारी 03 वाजून 55 मिनिटांपासून सुरू होईल. आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 03 वाजून 38 मिनिटांपर्यंत राहील. जयंती योगात जन्माष्टमीचे व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते. आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते. अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

Shri Krishna Janmashtami 2024: जन्माष्टमीला पूजनाचा शुभ मुहूर्त

अमृत चौघडिया मुहूर्त पहाटे 05 वाजून 56 मिनिटांपासून ते 07 वाजून 37 मिनिटांपर्यंत.

निशीथकाळ शुभ मुहूर्त रात्री 12 वाजून 01 मिनिटांपासून ते 12 वाजून 45 मिनिटांपर्यंत.

(टीप: वरील सर्व बाबी MH टाइम्स 24 केवळ माहिती म्हणून वाचक- प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MH टाइम्स 24 कोणताही दावा करत नाही.)

जन्माष्टमीच्या दिवशी श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडवा?

काही शास्त्रानुसार, श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हीचे उपवास धरले असतील, तर श्रावणी सोमवार सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजे अवघ्राण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल. परंतु, ही पद्धत योग्य नाही. कारण ही पद्धत अवलंबली, तर जन्माष्टमीचा उपवासही सुटू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितित नेमके काय करावे, याची योजना शास्त्रात केलेली आढळून येते. एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल. तर पाण्याने पारणे करावे, असे सांगितले जाते. कारण एका वेदमंत्रात याबाबत संदर्भ येतो. ‘आपो वा अशीतं अनाशितं च।’, कारण पाणी जे असते, ते उपवासाला चालते आणि पारण्यालाही चालते, असा वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे, त्यांनी सायंकाळी पाणी हेऊं उपास सोडवा.

म्हणजेच ताक्ष भावना मनात करायची असते. पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की, मी सोमवारचा उपवास सोडतो. म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमी पवास अहोरात्र कायम सुरू राहील, अस सांगितले जात आहे.

Shri Krishna Janmashtami 2024

Shri Krishna Janmashtami 2024: जयंती योगाचा शुभ संयोग

या दिवशी चंद्र वृषभ राशीत असणार आहे. भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळीही असाच योगायोग होता. अष्टमी तिथी मध्यरात्री येते त्या रात्री जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी वृषभ राशीत रोहिणी नक्षत्र आणि चंद्राची उपस्थिती खूप शुभ ठरू शकणारी आहे. जन्माष्टमी सोमवारी किंवा बुधवारी आली तर तो अत्यंत दुर्मिळ योगायोग निर्माण करतो. बुधवारी आणि सोमवारी जन्माष्टमी येते तेव्हा जयंती योगाचा शुभ संयोग तयार होतो. ज्याला जयंती योग असेही म्हणतात.

Shri Krishna Janmashtami 2024: या चुका अवश्य टाळा
  1. तुळशीला स्पर्श करू नका: जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी तुळशीची पूजा केली असल्यास लक्षात ठेवा संध्याकाळी तुळशीच्या रोपाला अजिबात स्पर्श करू नका. देवी लक्ष्मी स्वत: तुळशीमध्ये वास करते आणि संध्याकाळी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होतो.
  2. मोकळे केस सोडू नका: तुळशीची पूजा करताना किंवा कोणया देवी-दैवतांची पूजा करताना महिलांनी केस कधीही मोकळे सोडू नका. तुळशी पूजेच्या वेळी केस बांधून ठेवा.
  3. तुळशीची पणे ओरबाडून तोडू नका: भगवान श्रीकृष्णाला तुळशीची याने अर्पण करायची असतील तर ती ओरबाडून तोडू नयेत. सर्वात धि तुळशीला नमस्कार करावा. यानंतर त्याची पणे हलक्या हाताने तोडून घ्यावीत.
  4. परिक्रमा: तुळशीची पूजा केल्यानंतर किंवा तुळशीला जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करण्यास विसरू नका. तुळशी पूजनंतर किमान तीन वेळा प्रदक्षिणा करा.
  5. तुळशीचे वस्त्र बदला: काही लोक तुळशीचे वस्त्र झाकल्यानंतर ते बदलत नाहीत, तर इतर देवतांप्रमाणे तुळशी वस्त्रेही बदलली पाहिजेत. तुळशीला नवीन वस्त्र अर्पणकर्णींसाठी जन्माष्टमी हा खूप शुभ मानला जातो.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!