Ladaki Bahin Yojana
Ladaki Bahin Yojana: अरे वेड्यांनो, भाऊबीज कधीही परत घेतली जात नाही; देवेंद्र फडणविसांचा महेश शिंदे, रवी राणांना टोला? लाडकी बहीण योजनेवरून (Ladaki Bahin Yojana) काहीजण म्हणाले की पैसे परत घेतले जातील, अरे वेड्यांनो भाऊबीज दिली तर ती परत घेतली जात नाही असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी दिलं. कुणाचा बाप ही लाडकी बहीण योजना बंद करू शकणार नाही असंही ते म्हणाले. जळगाव मधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजने वरुण विरोधकांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. ही योजना फक्त निवडणुकीपूर्ती असल्याची टीकाही केली.
त्यातच महायुतीमधील आमदार रवी राणा आणि शिंदेचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्या वरुण वाद निर्माण झाला होता. त्यावर देवेंद्र फडणविसांनी स्पष्टीकरण देत, या योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत असं सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत मतरूपी आशीर्वाद न् दिल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढून घेईन, असं विधान आमदार रवी राणा यांनी सोमवारी अमरावती एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. या विधानावरून विरोधकांकडून त्याच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान, यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार राणा यांचं नाव न घेता त्यांना सुनावलं आहे. जळगावात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. अशात आता महायुतीच्या नेत्याकडूनच लाडकी बहीण योजने बाबत अशी काही वक्तव्य आली आहेत, ज्यामुळे महायुतीच्याच अडचणी वाढणार आहेत. आधी आमदार रवी राणा यांनी वक्तव्य केले. त्यावरून वाद मिटत नाही तोच शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी लाडकी बहीण योजने बाबत वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
Ladaki Bahin Yojana: रवी राणाही बोलून गेले?
आमदार शिंदे यांच्या आधी महायुतीचे रवी राणा यांनीही यंसेच काहीसे वक्तव्य करत आपल्याच सरकारला अडचणीत आणले आहे. आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांची रक्कम 3 हजार रुपये करू. त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. जयणी मला आशीर्वाद दिला नाही, त्यांच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार, असा दम रवी राणा यांनी उपस्थित महिलांना दिला. ज्यांचं खाल्ल त्यांच जागलं पाहिजे. सरकार डेट राहते पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असं रवी राणा म्हणाले. त्यांच्या हे वक्तव्य सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे.
Ladaki Bahin Yojana: शिंदेचे आमदार काय म्हणाले?
लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती महायुतीने आखली आहे. असे असताना साताऱ्यातील कोरेगाव आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. महेश शिंदे हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याची पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. लाडकी बहीण योजनेवरून बोलताना त्यांनी मतदारसंघातल्या विरोधकांना थेट दमच दिलाय. निवडणुकीनंतर छाननी केली जाणार आहे. छाननी समितीची बैठक आहे. त्या बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेतून तुमची नावं डिलिट करण्यात येतील असं वक्तव्य आमदार महेश शिंदे केलय. त्यामुळे विरोधकांच्या हातात शिंदेंनी आयतेच कोलीत दिले आहे.
Ladaki Bahin Yojana: भाऊबीज परत घेतली जाऊ शकत नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण निर्णय घेतला तर कुणाच्या पोटात दुखायला लागलं. कुणी म्हणालं मत खरेदी करताय. अरे नालायकांनो, कुणीही बहिणीचे प्रेम विकत घेऊ शकत नाही. प्रसंगी त्या उपाशी राहतील मात्र भावाला जेऊ घालतील. कुणी म्हणाल की 1500 रुपये माघारी घेऊ. अरे वेड्यांनो दिलेली भाऊबीज परत घेत नाहीत. कुणाचा बापही ही योजना नाद करू शकत नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिलांना सक्षम करण्याचा निर्णय आम्ही घेतला. येत्या काळात महिला सक्षम झाल्यानंतर महाराष्ट्र कधीच मागे पडणार नाही. मुख्यमंत्री आपण योग्य निर्णय घेतला, कारण आमच्या महिला बचत गटाचा एक एक पैसा पैसा परत करतात. 25 तारखेला याच मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत.
31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलेल्या महिलांना जुलै, ऑगस्ट महिन्यांचे पैसे आम्ही देऊ असं देवेंद्र फडणविसांनी सांगितले. ते म्हणाले की, महिलांच्या हाटी पैसे पडले की ते योग्य ठिकाणी करणी लागतात. मात्र पुरुषांच्या हातात पैसे पडले तर ते कुठे जातील हे सांगता येत नाही. मतं जर दिले नाही तर पैसे परत घेतले जातील असं महायुतीमध्ये असलेले आमदार रवी राणा यांनी गंमतीने म्हंटलं होतं. तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी डिसेंबर नंतर या योजनेतून विरोधकांची नावं काढून टाकली जातील असं वक्तव्य केलं होतं. त्यावर आता देवेंद्र फडणविसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Ladaki Bahin Yojana: जयंत पाटलांची टीका
आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंगळच समाचार घेतला आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं ही योजना आपल्याचं जयंत पाटील म्हणाले. निवडणुकीनंतर 10 लाखांचे अर्ज लाखांवर आणण्याचा यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. राणा आणि शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध खासदार सुप्रिया सुले यांनीही केला आहे.
Ladaki Bahin Yojana: निवडणुकीनंतर अर्ज बाद करणार
महेश शिंदे हे एका सभेमध्ये बोलताना म्हणाले की, एका व्हॉटसॲपच्या ग्रुपवर पडलं होत की मुख्यमंत्रीसाहेब, तुमची लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आम्हाला नकोत. आम्हाला आरक्षण द्या. त्या वर मी त्याला फोन करून विचारलं की, तुला आरक्षण दिलं आहे. अजून काय पाहिजे? तुझ्या घरच्यांनी अर्ज केलाय का? त्यावर तो बोलला की अर्ज केलाय, त्यानंतर मी म्हणालो, तो अर्ज मी बाद करतो. निवडणूक झाल्यानंतर छाननी होईल आणि कोण पात्र आणि कोण अपात्र हे ठरेल. शिंदे पढे म्हणाले की, तुमच्या आमदाराला तुम्ही ओळखता. कोपऱ्या-कोपऱ्यात कोण राहतंय हे माहीत आहे. या इलेक्शनमध्ये पुढे पुढे करणाऱ्यांची नावं काढा. आपण त्याचा करेक्ट कार्यक्रम डिसेंबरमध्ये करणार, त्याच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!