ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनचा व्हिडिओ पाहिलात का? खरच घेणार का घटस्फोट त्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Aishwarya Abhishek Divorce Viral Video

Aishwarya Abhishek Divorce Viral Video: ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या व्हायरल होत असताना आता अभिषेकचा एक व्हिडिओ (Aishwarya Abhishek Divorce Viral Video) व्हायरल होत आहे. बॉलीवूड मधील सर्वाधिक चर्चित जोड्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून हे कापल चर्चेत आहे. ऐश्वर्या राय अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या गेल्या काही महिन्यांपासून अमोर येत आहेत. या दोघांच्या घटस्फोट होणार असल्याचंही बोललं जात आहे. दोघांनीही यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या दोघांच्या नात्याला सर्वकाही आलबेल नसल्याचं वारंवार मिडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहेत.

अनंत अंबानीचं लग्न आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील फोटो समोर आल्यानंतर दोघांमध्ये ‘ऑल इज वेल’ नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या संध्या सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याची अनेकांची समजूत आहे. त्याचवेळी एका व्हायरल व्हिडिओनं सर्वांना धक्का बसलाय. या व्हिडिओमध्ये अभिषेक कथितपणे आपण ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेत आहे असं सांगत आहे.

Aishwarya Abhishek Divorce Viral Video
Aishwarya Abhishek Divorce Viral Video

दोघांनी ग्रे डिव्हॉर्स घेतला आहे, ते दोघेही वेगळे राहतात पण मुलीचा सांभाळ एकत्र करतात. अशा अनेक बातम्या आतापर्यंत आल्या. अनंत अंबानी व राधिका मार्चट यांच्या लग्नाला ऐश्वर्या राय मुलीबरोबर आली होती. तर अभिषेक आई-वडिलांबरोबर आला होता. त्यानंतर त्यांच्या नात्यातील दुराव्याबद्दल खूप बोललं गेलं. अशातच आता या जोडप्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबाबत विविध प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. दोघेही एकत्र दिसत नाहीत. ऐश्वर्या मुलीबरोबर, तर अभिषेक कुटुंबाबरोबर असतो. पण आता त्या दोघांचा जो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होतोय, तो पाहून या दोघांचे चाहते नक्कीच खुश होतील. घटस्फोटांच्या चर्चादरम्यान अभिषेक बच्चन व ऐश्वर्या आपल्या मुलीबरोबर विदेशात फिरायला गेले आहेत.

अभिषेक बच्चनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिषेक असं बोलताना दिसत आहे की, जुलै महिन्यात मी आणि ऐश्वर्या आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे, दरम्यान अभिषेक बच्चनच्या या व्हिडिओमध्ये मुलगी आराध्या बच्चनचाही उल्लेख आला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ डिपफेक असल्याचं समोर आलं आहे.

Aishwarya Abhishek Divorce Viral Video: ऐश्वर्या-अभिषेक बच्चनचा व्हिडिओ व्हायरल

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन विभक्त होणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत असताना आता अभिषेकचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अभिषेक ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेत असल्याची घोषणा करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेत आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हे जोडपं खरंच घटस्फोट घेणार आहे का? या व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? असा प्रश्न सर्वाना पडला आहे.

रॉयल ब्लॅक लिमॉसचे सीईओ देव कुमार यांनी इन्स्टाग्रामवर या जोडप्याबरोबरचे काही फोटो व्हिडिओ बनवून शेअर केले आहेत. यामध्ये अभिषेक ऐश्वर्या त्यांची लेक आराध्याबरोबर दिसत आहेत. दोघांना एकत्र पाहून चाहते खूप खुश आहेत. अनेक महिन्यांपासून ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबांबरोबर राहत नाही आणि टि तिच्या आईबरोबर राहायला गेली आहे. ऐश्वर्या व तिची नणंद श्वेता बच्चनची लेक नव्या नावेळी नंदा दोघीही लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाल्या होत्या. श्वेता बच्चन आणि जया नव्यासाठी चीअर करताना दिसल्या, पण ऐश्वर्यासाठी त्यांनी कोणतीही पोस्ट केली नव्हती. यानंतर बच्चन कुटुंबात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा होऊ लागल्या. ऐश्वर्या व अभिषेक दोघांनी बऱ्याच काळापासून सोशल मिडियावर एकमेकांसोबत एकही फोटो शेअर केलेला नाही किंवा त्यांच्या विभक्त होण्याच्या वृत्तावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

Aishwarya Abhishek Divorce Viral Video

याच दरम्यान त्यांचा हा व्हिडिओ आला असून यांची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान 2007 मध्ये ऐश्वर्या व अभिषेकचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले होते. या दोघांच्या लग्नाला बऱ्याच काळ लोटला असून आता त्यांच्यात मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. यासाठी ट्रोलर्स सोशल मिडियावर पोस्ट करून जया बच्चन व श्वेता नंदा यांना जबाबदार धरतात.

Aishwarya Abhishek Divorce Viral Video: ऐश्वर्याचा या व्यक्तिसोबत 36 चा आकडा

मिडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्या राय हीला तिची नणंद श्वेता बच्चन हिच्यासोबत पटत नाही. गेल्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा प्रतीक्षा बंगला मुलगी श्वेता बच्चन हिच्या नावे केला होता. ज्यानंतर ऐश्वर्याला ही गोष्ट आवडली नाही, त्यामुळे टी बच्चन कुटुंबावर नाराज झाली, असं बोललं जात आहे. ऐश्वर्या बच्चन कुटुंबातील अभिषेक बच्चन वगळता इतर कोणाशीही बोलत नाही आणि ती सासर सोडून तिच्या माहेरच्या घरी राहते. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हीला खूप सपोर्ट करत आहेत. बिग बिंनी त्यांच्या एका पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगितले होते की, त्यांची संपत्ती त्यांची दोन मुले अभिषेक आणि श्वेता यांच्यामध्ये समान प्रमाणात विभागली जाईल. मिडिया रिपोर्टनुसार, श्वेता तिचा पती निखिल नंदापासून वेगळी आणि अनेक वर्षापासून अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्यात राहते.

Aishwarya Abhishek Divorce Viral Video: व्हिडिओमध्ये घटस्फोट गोष्ट

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ डिपफेक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामध्ये एआय टूल्सच्या माध्यमातून अभिषेकच्या व्हिडिओसोबत त्याचा आवाज सिंक करण्यात आला आहे. या व्हिडिओत मी आणि ऐश्वर्या यांनी जुलै महिन्यात घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही आरध्यासाठी आहे, असं अभिषेक कथितपणे सांगत आहे. हा व्हिडिओ पाहून तो फेक असल्यांचं स्पष्ट समजतंय. व्हिडिओ आणि व्हाईस यामध्ये समन्वय नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मिडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अफवा पसरवणाऱ्यांना यूजर्सणी चांगलंच सुनावलं आहे. काही जणांनी या व्हिडिओवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Aishwarya Abhishek Divorce Viral Video: नेमकं सत्य काय?

घटस्फोट घोषणा करणाऱ्या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चनचा आवाज काहीसा वेगळा असल्याचं जाणवत आहे. याशिवाय अभिषेकचा हा व्हिडिओ लिप-सिंक होत नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. यामुळेच या व्हिडिओच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच हा व्हिडिओ मधे-मधे कट होत असल्याचंही जाणवत आहे, यावरूनचा हा व्हिडिओ एडिटेड असल्याचं स्पष्ट होत आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!