शिवस्वराज्य यात्रेमध्ये अपघात; क्रेन हवेत असतानाच ट्रॉलीसह कलंडले अमोल कोल्हे आणि जयंत पाटील

Shiv Swarajya Yatra

Shiv Swarajya Yatra: आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. सर्वच पक्ष आपल्या आपल्या मतदार संघासह इतर मतदारसंघाचे दौरे करत आहेत. अनेक आमदारांनी देखील या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. अशातच मनसेकडून काही उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे. तर आज शरद पवार गटाच्या शिव स्वराज्य (Shiv Swarajya Yatra) यात्रेवेळीजमलेल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबंधित करताना राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार)पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी जुन्नर विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा केली आहे.

दरम्यान रोहित पवार, रोहित पाटील या शिवस्वराज्य यात्रेला उपस्थित नसल्यामुळे अनेक सवाल उपस्थित केल जात आहेत. अजित दादांच्या यात्रेनंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही यात्रेची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाच्या यात्रेचे नाव शिवस्वराज्य असे आहे. हा यात्रेचा दूसरा टप्पा असल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हंटले. आजपासून यात्रेला शिवनेरी किल्यावरून सुरुवात होत आहे. यात्रेच्या माध्यमातून राज्यातील महायुती सरकारचे काळे कारनामे जनतेसमोर आणणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. 2019 मध्येही राष्ट्रवादी कॉँग्रेसने शिवस्वराज्य यात्रा काढली होती. तेव्हा राज्याच्या आर्थिक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रायतेच्या हाताला काहीच लागलेले नाही. विजदरवाढ, टोलमुक्त महाराष्ट्र या घोषणाच राहिल्या आहेत. असा आरोप त्यांनी केला होता. अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचे भाषण हे यात्रेचे त्व्ह प्रमुख आकर्षक ठरले होते.

Shiv Swarajya Yatra
Shiv Swarajya Yatra

यावेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, लोकसभा निवडणुक पार पडली आणि आता त्यानंतर जुन्नर विधानसभेचा उमेदवार कॉन असणार? तुतारी फुंकणारा तो उमेदवार कॉन? असं म्हणत आत्ताच्या आत्ता मि त्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करू का? यावेळी मंचाच्या खाली बसलेल्या कार्यकऱ्यांनी मोठा जल्लोष केला. आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंचावर असताना अमोल कोल्हे नेमक्या कोणाच नाव जाहीर करणार अशी उत्सुकता शिगेला पोहचली. मात्र, तितक्यात कोल्हे मागे वळाले, जयंत पाटलांच्या शेजारी जाऊन, मोबाइल घेऊन परत माईक समोर आले, ऐकायचं आहे का ते नाव? मग ऐका, हे नाव आहे, फक्त अन् फक्त शरद पवार साहेब अन् त्यांचे विचार त्यांच्या या बोलण्यानंतर कार्यकर्ते अनि पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला.

पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले अहरड पवार हे फक्त व्यक्ति माहीत तर ते विचार आहेत. शरद पवार हे तरुणांचा विचार आहेत, सर्वसामान्यांचा विचार आहेत, शेतकऱ्यांचा विचार आहेत. एक गोष्ट डोक्यात ठेऊन आपल्याला पुढं जावं लागेल. नाहीतर दोन बोकयाच्या भांडणात माकडाचा लाभ होतोय असं काही होऊ देऊ नका असंही त्यांनी आज म्हंटलं आहे.

Shiv Swarajya Yatra: शिवस्वराज्य यात्रा

  • 9-10-11 ऑगस्ट- पुणे जिल्हा
  • 12-13 उस्मानाबाद- सोलापूर
  • 15-16 बीड
  • 17-18 परभणी- जालना

आज 8 ऑगस्टपासून शिवाजी महाराज जन्मस्थळ शिवनेरी येथून शिवस्वराज्य यात्रा निघणार आहे. आदिवासी दिवसांचं औचित्य साधत जुन्नर तालुक्यात हा मेळावा घेतला जाईल.

Shiv Swarajya Yatra: जयंत पाटील काय म्हणाले?

आमची (Shiv Swarajya Yatra) यात्रा ही साधी आहे, आमचा कोणता ही इव्हेंट नाही. जनतेचा मनातील प्रश्न आम्ही मांडतोय, त्यासाठी कोणता विशिष्ट रंग देण्याची गरज नाही. त्यामुळं आमच्या यात्रेला जनसमान्यांचा पाठिंबा असल्याची भावना जयंत पवार यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन आले, ही बाब मविआच्या दृष्टीने चांगली एकसंघ होऊन आम्ही निवडणुका लढणार, सगळे एकत्रित निर्णय घेतील. अतुल बेनके आमच्या यात्रेत आले तर त्यांचं स्वागतच, पण मी जुन्नरमध्ये आल्यानंतर ते मला अद्याप भेटले नाहीत. ते आमच्या पक्षात येऊ इच्छितात, असं मी ऐकलेलं आहे. सत्ता आणून देतो. असं देवेंद्र फडणवीस म्हणतात हा एक दर्प आहे, जो महाराष्ट्राची जनता दूर करेल. मविआच्या विधानसभा निवडणुकीचा चेहरा कोण? हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा महायुतीला त्यांचा चेहरा कोण, हा प्रश्न त्यांना विचारा, असंही जयंत पवार यावेळी म्हणाले.

Shiv Swarajya Yatra 2024

जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले

शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. क्रेनच्या सहाय्याने पुतळ्याला पुष्पहार घालून खाली येत असताना क्रेनची ट्रॉलीमध्ये बिघाड झाला. यामुळे जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबूब शेख थोडक्यात बचावलेत, सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नसून सर्व जण थोडक्यात बचावले आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. पुष्पहार घालून खाली उतरताना अर्ध्यावर पोहचल्यावर क्रेन तुटली. जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबूब शेख पडण्याची शक्यता होती. सुदैवाने, कुणालाही दुखापत झाली नाही पण यात्रेच्या सुरुवातीला ही घटना घडल्याने उपस्थितामध्ये खळबळ उडाली.

Shiv Swarajya Yatra: सुरक्षितता आणि दक्षता

शिवस्वराज्य यात्रेच्या आयोजकांनी या घटनेची दखल घेतली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक सुरक्षितता आणि दक्षता घेतली जाणार आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरि उपाययोजना करण्यात येणार आहेत. शिवस्वराज्य यात्रेद्वारे राज्यातील विद्यार्थी, शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्यांवर लोकांशी चर्चा केली जाईल. त्यांनी सांगितले की, या यात्रेद्वारे महाराष्ट्राचे हरवलेले आत्मसन्मान परत मिळवण्यासाठी आणि महायुतीला पराभूत करण्यासाठी लोकांना एकत्र आणले. जाईल पक्षाचे खासदार आणि वरिष्ट नेते विविध ठिकाणी या यात्रेत सहभागी होतील, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात 7 जिल्ह्यात यात्रा, दुसऱ्या टप्प्याची लवकरच घोषणा

पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांतुन फिरणार असून लवकरच दुसऱ्या टप्प्यांची घोषणा केली जाणार आहे. तसेच 9 ऑगस्ट हा दिवस निवडण्याचा उद्देश म्हणजे महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली चले जाओ चळवळीचा नर या दिवशी ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला होता. तसेच त्या दिवशी जागतिक आदिवासी दिवस असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रामध्ये रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या पायवाटेनं आणि आदर्शाने महाराष्ट्र राज्य चालवण्यासाठी राज्यातील जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही जनतेपर्यंत जाणार आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

Shiv Swarajya Yatra: राज्यातील 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाडी विजय

लोकसभा निवडणुकीत जनतेने केंद्र व राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला. आता महाराष्ट्रातील बहाद्दर जनतेने महायुती सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार घाबरून, वेगवेगळ्या योजनांचा भडिमार करत आहे. तसेच सरकारी तिजोरी मोकळी करत आहे. सरकार ज्या घोषणा करत आहे ते जनतेलाही पटत नाही, असे ते म्हणाले

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!