शेख हासिना कशा ठरल्या वादग्रस्त पंतप्रधान? 25 वर्षापासून सत्तेवर, आर्थिक क्रांतीही घडवली; तडकाफडकी राजीनामा का?

Bangladesh PM Sheikh Hasina

Bangladesh PM Sheikh Hasina: गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ बांग्लादेशचं नेतृत्व करणाऱ्या शेख हसीना यांनी आज तडकाफडकी बांग्लादेशमध्ये उफाळलेल्या आरक्षणाच्या मुद्यावरील हिंसाचारानंतर शेख हसीना यांनी हेलिकॉप्टरणे पळ काढला. शेख हासिना या बांग्लादेशच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ होत्या. 20 वर्षाहून अधिक काळापासून बांग्लादेशचा धुरा त्यांच्या हाती आहे. त्यामुळे त्यांच्या पळून जाण्याने बांग्लादेश मध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाच्या पाश्वभूमीवर देशभरात होत असलेला हिंसाचार पाहता त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Bangladesh PM Sheikh Hasina

दक्षिण आशियातील या देशाच्या आर्थिक प्रगती बाबचं श्रेय हसीना यांना दिलं जातं. पण गेल्या काही वर्षामध्ये त्यांना चंगली कामगिरी करता आली नसल्याचा आणि मनमानी कारभाराचा आरोप त्यांच्यावर होत आहे. बांग्लादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर अखेर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. हासिना यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची मुख्य मागणी होती. शेख हसीना यांच्या पंतप्रधान पदाची दुसरी कारकीर्द 2009 साली सुरू झाली होती. त्या राजधानी ढाकामधून लष्कराच्या हेलिकॉप्टरनं भारतामधील सुरक्षित स्थळी झाल्या असल्याची शक्यता आहे. अशी माहिती रॉयटर या न्यूज एजन्सीनं दिली आहे.

Bangladesh PM Sheikh Hasina: शेख हसिना कोण?

1947 मध्ये पूर्व बंगालमधील एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या शेख हसिना यांच्या रक्तातच राजकारण होतं. त्यांचे वडील राष्ट्रवादी नेते मूजीबूर रहमान हे बांग्लादेशचे राष्ट्रपिता होते. 1971 मध्ये पाकिस्तानपासून बांग्लादेश वेगळा झाल्यानंतर त्यांनी देशांच नेतृत्व स्वीकारलं. त्या काळात शेख हसीना यांच्या नेतृत्वाला ढाका विद्यापीठातून उभारी मिळत होती. ढाका विद्यापीठातील विद्यार्थी नेता म्हणून त्या उदयाला आल्या होत्या. इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. दरम्यान 1975 मध्ये लष्करी उठावात त्यांचे वडील शेख मूजीबूर रहमान यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी शेख हासिना आणि धाकटी बहीण परदेशात असल्याने त्या युरोपात होत्या वाचल्या. परंतु कुटुंबाची हत्या झाल्यानंतर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शेख हसीना यांना भारतात आश्रय दिला.

भारतात दीर्घकाळ राहिल्यानंतर त्या 1981 मध्ये बांग्लादेश मध्ये पुन्हा परतल्या अन् वडिलांचा अवामी लीग असलेल्या पक्षाचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं. अवामी लीगची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी अनेक उठाव केले. जनरल हुसेन मोहम्मद एरशाद यांच्या लष्करी राजवटी विरोधात त्यांनी रस्त्यावर निदर्शने केली. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे त्या राष्ट्रीय आयकॉन बनत गेल्या. एकीकडेपक्षाचा धुरा सांभाळत असताना देशभरात त्यांच्या नेतृत्वाचंही कौतुक होत होतं. परिणामी 1996 मध्ये त्या पहिल्या सत्तेवर निवडून आल्या. निवडून आल्यानंतर देशांतर्गत करारांनाही त्यांनी महत्व दिलं. या काळात भारताबरोबर झालेले पाणी वाटप करार आणि देशांच्या ढीन पूर्वेकडील आदिवासी बंडखोरांशी झालेल्या शांतता करारामुळे त्यांची निर्णय क्षमता आणि दुरदुष्टिचं कौतुक होऊ लागलं. परंतु, त्यावेळी त्यांच्या सरकारवर मोठ्या प्रमाणात टीकाही होऊ लागली. अनेक भ्रष्ट व्यावसायिक सौदयांसाठी आणि भारतावर अवलंबून असल्याबद्दल त्यांना लक्ष्य केलं गेलं.

Bangladesh PM Sheikh Hasina: राजकारणात कसे रोवले पाय?

काही वर्ष भारतामध्ये आश्रित म्हणून राहिल्यानंतर हसीना 1981 मध्ये बांग्लादेशात परतल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांचा राजकीय पक्ष आवामी लीगचं नेतृत्व हाती घेतलं. बांग्लादेशात जनरल हुसेन मोहम्मद इरशाद यांच्या नेतृत्वात लष्कराची सत्ता असताना त्यांनी इतर राजकीय पक्षांच्या साथीनं रस्त्यांवर उतरत तीव्र विरोध आंदोलनं केली. बंडखोर स्वभाव आणि नेतृत्व गुणच्या जोरावर हसीना यांनी अगदी कमी वेळात राष्ट्रीय स्तरावर नेत्या म्हणून ओळख मिळवली. पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांनी भारताबरोबर पाणी वाटप करार आणि देशातील दक्षिण पूर्व भागातील आदिवासी बंडखोरांबरोबर शांतता करार करण्याचं श्रेय शेख हसीना यांना मिळालं.

पण त्याचवेळी शेख हसीना यांच्या सरकारवर अनेक व्यापारी कररांमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणी टीकाही झाली. तसंच भारताकडे असलेला ओढा आणि भूमिकेबाबतही त्यांच्यावर टीका झाली.

Bangladesh PM Sheikh Hasina

Bangladesh PM Sheikh Hasina: शेख हसीना वादग्रस्त का आहेत?

बांग्लादेशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शेख हसीना यांचा चौथ्यादा विजय झाला. परंतु, हा विजय अत्यंत वादग्रस्त होता. बांग्लादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना शेख हसीना यांनी दहशतवाड्यांविरोधात लढण्यासाठी पाठिंबा देण्यात आवाहन त्यांनी केलं होतं. देशांच्या आरक्षण प्रणालीमध्ये मूलभूत बदल करण्याची मागणी करत गेल्या तीन आठवड्यांपासून ढाक्यासह विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपासून आंदोलन अधिकाधिक हिंसक होत असून गुरुवारी राजधानीच्या अनेक भागांत जाळपोळ आणि तोंडफोडीला उधाण आले. आंदोलकांनी सरकारी इमारती तसेच विद्यापीठांना लक्ष्य केले. दूरचित्रवाणी केंद्राच्या फटकांची मोडतोड करण्यात आली. तर परिसरातील वाहनेही जमावाने पेटवून दिली.

Bangladesh PM Sheikh Hasina: आंदोलकांची मागणी काय?

बांग्लादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये 56 टक्के आरक्षण आहे. यातील सर्वाधिक 30 टक्के आरक्षण हे 1971 च्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या ‘मुक्तीवाहिनी’ आंदोलकांच्या वारसदारांना देण्यात आले आहे. नोकऱ्यांमधील आरक्षण हटविण्याची आंदोलक मागणी करीत आहेत. तर सध्या हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने तेथील निकालाची प्रतीक्षा करावी, असे शेख हासिना यांच्या सरकारचे म्हणणे होते.

Bangladesh PM Sheikh Hasina: खालिदा झियांनी केला पराभव

2001 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या जुन्या सहकारी आणि प्रतिस्पर्धी असलेल्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (BNP) बेगम खालिदा झिया यांनी शेख हसीना यांचा पराभव केला. राजकीय वारसा पुढं नेत या दोन्ही महिला नेत्यांनी बांग्लादेशच्या राजकारणावर जवळपास 30 वर्षाहून अधिक काळ त्यांचा दबदबा कायम ठेवला आहे. या दोघींना ‘बॅटलिंग बेगम’ म्हणूनही जातं. बेगम शब्दाचा वापर मुस्लिम समाजातील उच्च पदस्थ महिलांसाठी केला जातो.

अभ्यासकांच्या मते, त्याच्या या वैरामुळं बस बॉम्ब स्फोट, लोक बेपत्ता होणं. हत्या अशा घटना बांग्लादेशात नेहमीच्याच बनल्या. त्यानंतर अखेर 2009 मध्ये शेख हासिना पुन्हा एकदा सत्तेत आल्या. आधी काळजीवाहू सरकारची जबाबदारी त्यांनी पार पाडली. कडव्या राजकारणी अशी ओळख मिळवत त्यांनी विरोधी पक्षात असताना प्रदीर्घ संघर्ष केला. अनेकदा त्यांना अटक झाली. त्यांच्या हत्येचा प्रयत्नही करण्यात आला. पण त्या मागे हटल्या नाहीत. 2004 मध्ये एका हल्यात त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला होता. त्यांना निर्वासनात पाठवण्यासाठी चेही अनेक प्रयत्न झाले. पण त्या अडून राहिल्या. त्यांच्यावर भ्रष्टाचारासंबंधी अनेक आरोप झाले. अनेक खटल्यांचाही त्यांनी सामना केला.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!