Sachin Waze
Sachin Waze: अँटेलिया बंगल्यासमोर धमकीचे पत्र आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सचिन वाझे यांनी आज 3 ऑगस्ट गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असा गंभीर आरोप वाझेनी केला आहे. विशेष म्हणजे याबाबतचे पत्र देखील त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. वाझे याच्या या दाव्यानंतर राज्याच्या राजकारणात एकाच खळबळ उडाली आहे. वाझे यांच्या याच दाव्यावर आता फडणवीस यांनी पाहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपुरात माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
शिवाय आपण नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहोत असेही सचिन वाझे याने म्हंटले आहे. यावर अनिल देशमुख यांनी ही पलटवार करत ही फडणविसांची नवी चाल असल्याचे म्हंटले आहे. या आरोपानंतर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख म्हणाले की, सचिन वाझेमार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे.

अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरी 100 कोटींचं खंडणी प्रकरण, 2021 चं अँटिलीया बॉम्ब प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातील आरोपी सचिन वाझे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तुरुंगवास भोगत असलेल्या सचिन वाझेना उपचारांसाठी रुग्णालयात आणलेलं असताना वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत.
Sachin Waze: सचिन वाझे नेमकं काय म्हणाले?
सचिन वाझे (Sachin Waze) यांनी आरोप केला जी जे काही घडलं त्याचे पुरावे आहेत. पैसे त्याच्या (अनिल देशमुख) पीएमार्फत गेले, सीबीआय कडे पुरावे आहेत आणि देवेंद्र फडणविसांना (Devendra Fadnavis) एक पत्रही लिहिलं आहे. मी सगळे पुरावे सादर केले आहेत. मी त्या चाचणीसाठी (नार्को चाचणी) तयार आहे. मी लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव आहे. जयंत पाटील यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आली नाहीय. जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिल्यास इथे अपडेट केलं जाईल. उद्योगपति मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या निवसस्थाना बाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवल्याच्या आणि धमकीच्या आरोपाखाली सचिन वाझे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगवास भोगत आहेत. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील ते आरोपी आहेत. 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणात ते आरोपी आहेत. या प्रकरणात देखील ते आरोपी आहेत.
या प्रकरणात ते गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. 100 कोटींच्या कथित खंडणी प्रकरणात ते माफीचा साक्षीदार बनले आहेत. त्यानंतर तुरुंगामधून सुटका करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली होती.
Sachin Waze: आरोपाने वातावरण तापलं
दरम्यान वाझेच्या आरोपानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. वाझेची कसली नार्को करताय. भाजपच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा. त्यानंतर त्यांनी काय कांड गेल्या दहा वर्षात केले आहेत. ते समजले. सत्ता जाणार आहे म्हणून असे आरोप वाढे कडून करून घेतले जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. तर हे पत्र आत्ताच आणि फडणवीसांनाच का लिहिले गेले असा प्रश्न शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
Sachin Waze: देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळले
दरम्यान सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपनंतर अनिल देशमुख यांच्यावर भाजप तसेच सत्ताधारी पक्षातील नेते टीका करत आहेत. अनिल देशमुख यांचा जामीन रद्द करावा आणि त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. तर खुद्द देशमुख यांनी केलेले फेटाळून लावले आहेत. मी गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांच्यावर आरोप केले. त्यामुळेच अशा प्रकारचा कट रचला जातोय, असा दावा देशमुख यांनी केला.
Sachin Waze: उद्धव ठाकरे यांच्या तोंडावरचा ताबा सुटला
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यात भाजपाचे वरिष्ट नेते अमित शाह हे अहमदशाह अब्दालीचे वंशज आहेत. असा घणाघाती हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे याच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते फार फ्रस्टेट झाले आहेत. या अवस्थेतेत ते असे शब्द वापरला आहेत. यावर आपण काय उत्तर द्यायला हवं. नैराश्यत एखादी व्यक्ति डोकं बिघडल्यासारखं बोलत असेल तर त्याला उत्तर ध्यायचं, असे फडणवीस म्हणाले. तसेच, अमित शाह यांनी औरंगजेब फॅन क्लब असा शब्द वापरला होता. उद्धव ठाकरे यांनी हे भाषण कारण आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत, हे दाखवून दिलं आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावलाय.
Sachin Waze: अनिल देशमुख काय म्हणाले?
सचिन वाझेच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, मी चार-पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप केले होते. जी वस्तुस्थिति मी समोर आणली होती. कक्ष प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी मी प्रतिज्ञापत्र करून द्यावं, यासाठी माझ्यासमोर जो प्रस्ताव आणला होता. देशमुख म्हणाले की, ही गोष्ट ज्यावेळी मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी ही नवीन चाल आहे. सचिन वाझेनी माझ्यावर जे आरोप केले, ती देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे.
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना अनिल देशमुख म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने सचिन वाझेंबद्दल हे स्पष्ट केलं होतं की गुन्हेगारी पाश्वभूमीचा व्यक्ति आहे. आतापर्यंत दोन खुनाच्या गुन्ह्यात सचिन वाझेंना अटक करण्यात आली. आताही एका खुनाच्या गुन्हात ते तुरुंगात आहे. सचिन वाझे हे विश्वास ठेवण्यालायक व्यक्ति नाहीत, असं उच्च न्यायालयाने म्हंटलेलं आहे. मग अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला हाताखाली धरून देवेंद्र फडणवीस हे माझ्यावर आरोप करायला लावल आहेत. त्यामुळे मी जनतेला हे सांगू इच्छितो की मी जे आरोप फडणविसांवर केले होते, त्यामुळे त्यांनी सचिन वाझेला माझ्यावर आरोप करायला सांगितले आहेत.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!