Realme 13 Pro Series 5G
Realme 13 Pro Series 5G: गेल्या काही वर्षांमध्ये, आपण स्मार्टफोनच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा झालेली पाहिली असेल. फोनच्या प्रत्येक पिढीने नावीन्य आणि यूजर्स अनुभवाच्या सीमांना पुढे ढकलले आहे. आजचे स्मार्टफोन पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि टिकाऊ झाले आहेत. सुरुवातीच्या दिवसांमध्ये, जेव्हा स्मार्टफोन लॉन्च केले गेले, तेव्हा त्यांची टेक्नोलॉजी आतासारखी नव्हती. पूर्वी, ब्लर फोटो आणि त्यांचा परफॉर्मन्स स्लो होता. तसेच डिस्प्ले ही कमकुवत आणि छोटी बॅटरी लाइफ होती. मात्र आता तसे नाही. तसेच वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या किंमतीत फोन सादर करीत आहेत. कोणत्याही वेगाने विकसित होणाऱ्या टेक्नोलॉजीमध्ये सुधारणेसाठी नेहमीच शक्यता असते. बेस्ट स्मार्टफोनचा शोध हा या उद्योगाला पुढे नेत आहे. 13 प्रो सिरिज 5G च्या आगामी लॉन्चसह रिअलमी उत्कृष्टतेची हमी देत आहे. ब्रॅंडचा प्रायमरी फोकस सर्व सेगमेंटमध्ये त्याच्या प्रॉडक्टची क्वालिटी सुधारणे आहे.
रियालमीची नवीन सिरिज Realme 13 Pro Series 5G भारतात लॉन्च करण्यात आला आहे. ज्यात Realme 13 Pro आणि Realme 13 Pro+ 5G चा समावेश करण्यात आला आहे. या फोन्समधील कॅमेरा एआय इंटीग्रेशन सह सादर करण्यात आले आहेत. नवीन रियलमी फोन्समध्ये 12 जिबी पर्यंत रॅम मिळत. 5200 mAh बॅटरी Realme 13 Pro+ मध्ये देण्यात आली आहे, जी 80 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Realme 13 Pro Series 5G लॉन्च करण्यापूर्वी कंपनीने अर्ली एक्सेस सेलची घोषणा केली, जी आज संध्याकाळी 06.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्ट वर उपलब्ध असेल. मिड-रेंज फोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी असेल. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफर दिली जाणार आहे. यातून ग्राहकांना 3000 रुपयांची बचत करता येऊ शकते. या व्यतिरिक्त ग्राहक 12 महीने नो कॉस्ट ईएमआयवर हा फोन खरेदी करू शकतात. ग्राहकांनी हा फोन 12 ऑगस्ट पासून खरेदी केल्यास त्यांना एक वर्षाची अतिरिक्त वॉरंटी आणि 30 दिवसांची मोफत रिप्लेसमेंट हमी देखील मिळेल.
Realme 13 Pro आणि Realme 13 Pro+ ची किंमत
Realme 13 Pro मोनेट गोल्ड, मोनेट पर्पल आणि एमरालड ग्रीन कलर्स मध्ये आला आहे. तसेच 8 GB/128 GB मॉडेलची किंमत 26,999 रुपये आहे. कंपनी 3 हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे, त्यामुळे फोनची किंमत 23,999 रुपये होते. Realme 13 Pro चा 8 GB/256 GB मॉडेल 28,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे, जॉ ऑफरनंतर 25,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच 12 GB/512 GB मॉडेल 31,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. आणि ऑफर नंतर 28,999 रुपयांना खरेदी करता येईल.
Realme 13 Pro+ मोनेट गोल्ड आणि एमरालड ग्रीन कलर्स मध्ये आला आहे. याच्या 8 GB/256 GB मॉडेल 28,999 रुपये आहे. कंपनी 3 हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे, त्यामुळे फोनची किंमत 29,999 रुपये होते. Realme 13 Pro+ चा 12 GB/256 GB मॉडेल 34,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. जो ऑफर नंतर 31,999 रुपयांना खरेदी करता येईल. अशाप्रकारे 12 GB/512 GB मॉडेल 36,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. आणि ऑफर नंतर 33,999 रुपयांना खरेदी करता येईल.
Realme 13 Pro Series 5G चे फीचर्स
Realme 13 Pro या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. पॉवरसाठी या फोनमध्ये 5200 mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 45W Super Vooc फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. मोनेट गोल्ड, मोनेट पर्पल आणि एमरालड ग्रीन कलर्स मध्ये आला आहे. Realme 13 Pro+ 5G या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD AMOLED डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. पॉवरसाठी या फोनमध्ये 5200 mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 80 W Super Vooc फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. मोनेट गोल्ड आणि एमरालड ग्रीन कलर्स मध्ये आला आहे.
Category | Specification |
---|---|
Display | 6.7 -inch AMOLED Screen |
Resolution: 1080 x 2400 pixels | |
Pixel Density: 391 ppi | |
3D Curved Screen, 1300 nits Local Peak Brightness | |
120 Hz Refresh Rate | |
Punch Hols Display | |
Camera | 50 MP + 50 MP + 8 MP |
4K @ 30 fps UHD Video Recording | |
Front Camera: 32 MP | |
Technical | |
Qualcomm Snapdragon 7 Gen 2 | |
Octa-core processor, 2.2GHz | |
12 GB/ 8 GB (LPDDR 5x) | |
storage 512 GB/ 256 GB/ 128 GB | |
Memory Card: Hybrid | |
Connectivity | |
4G, 5G, VoLTE | |
USB-C v2.0 | |
5200 mAh Battery | |
80 W/45 W Fast Charging |
Realme 13 Pro Series 5G Specification
- Realme 13 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फूल HD+ AMOLED डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120HZ पर्यंत आहे. तर Realme 13 Pro 5G फोन 6.7 इंच लांबीच्या OLED डिस्प्लेने सुसज्ज आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120HZ पर्यंत आहे.
- Realme 13 Pro+ 5G हँडसेट Snapdragon 7 Gen 2 प्रोसेसर ने सुसज्ज आहे, तर Realme 13 Pro 5G फोनमध्ये Snapdragon 7 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.
- फोटोग्राफीसाठी Realme 13 Pro+ 5G फोनच्या मागील बाजूस 50 MP मुख्य कॅमेरा, 50 MP पेरीस्कोप लेन्स आणि 8 MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी साठी फोनमध्ये 32 MP कॅमेरा आहे. तर, Realme 13 Pro 5G फोनमध्ये OIS स्पोर्टसह 50 MP आणि 8 MPचा दूसरा सेन्सर आहे. फोन 32 MP सेल्फी कॅमेराने सुसज्ज आहे.
- Realme 13 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये 5200 mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 80 W Super VOOC चार्जिंग स्पीड आहे. तर Realme 13 Pro 5G मध्ये 5200 mAh बॅटरी आहे. त्याची बॅटरी 45 W Super VOOC चार्जिंग सपोर्टसह येते.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!