देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना थेट इशारा, ‘माझ्या नादी लागला तर मी सोडत नाही’

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आणि माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) गंभीर आरोप केले होते, मध्यमांशी बोलतअसताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले श्याम मानव हे मला बऱ्याच वर्षापासून ओळखतात. माझ्यावर इतके मोठे आरोप करण्यापूर्वी त्यांनी मला विचारायला हवे होते. पण दुर्दैवाने इकोसिस्टिममध्ये अलीकडे सुपारी घेऊन बोलणारे लॉक घुसलेले आहेत. दुर्दैवाने शीम मानव हे त्यांच्या नादी लागले आहेत का? असा प्रश्न मला पडतो.

अनिल देशमुख यांना प्रतिज्ञापत्राद्वारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर आरोप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सांनी दबाव टाकला होता, असं आरोप श्याम मानव यांनी केला होता.

मी कुणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी लागाल तर सोडत नाही असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना दिला. अनिल देशमुखांच्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांच्या विरोधातील पुरावे आपल्याकडे दिल्याचा गौप्यस्फोट ही त्यांनी केला. तसेच देशमुख आता बेलवर बाहेर आहेत असंही ते म्हणाले. त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चार ॲफेडेव्हिटवर स्वाक्षरी करण्यास सांगितलं होतं, त्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल म्हणून त्यांना 13 महीने तुरुंगात राहावं लागलं, असा धक्कादायक आरोप सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी केला होता. श्याम मानव यांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

Devendra Fadnavis: काय म्हणाले फडणवीस?

‘महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खोट्या केसेस टाकणे ही मोडस ऑपरेंडि होती. सीबीआयनं चार्टशिट दाखल केलीय, त्यात कशाप्रकारे गिरीश महाजनांवर मोक्का लागला पाहिजे यासाठी दबाव टाकला, याचा उल्लेख आहे, श्याम मानव मला आधीपासून ओळखतात. त्यांनी आरोप करण्यासाठी मला विचारायला हवं होतं. काही सुपरिबाज इकोसिस्टिममध्ये घुसलेत श्याम मानव त्यांच्या हाती लागले का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

फडणवीस (Devendra Fadnavis) पुढं म्हणाले की, मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी एफआयआर करायला लावला. हे बेलवर बाहेर आहेत. सुटलेले नाहीत. एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, ते आरोप करत आहेत. तरी मी शांत आहे. मी कोणाच्या नादी लागत नाही. लागलं तर सोडत नाही. त्यांच्याच पक्षातील लोकांनी मला काही ऑडिओ व्हीज्यूअल आणून दिले आहेत. फडणवीस पुराव्याशीवे कधीही बोलत नाही. फेक नॅरेटीव्ह करत असाल तर मला उघड करावं लागेल. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पुणे सत्र न्यायालयानं यांच्यावर अजमीनपात्र अटक वॉरंट निघालं त्यांनी ते कॅन्सल केलं. उपमुख्यमंत्री या आरोपांनाही उत्तर दिलं आहे. मनोज जरांगेची केस 2013 ची आहे. यापूर्वी नॉन बेलेवर वॉरंट निघाल त्यांनी कॅन्सल केला.

Devendra Fadnavis

आधीही नॉन बेलेवर वॉरंट निघालं त्यांनी ते कॅन्सल केलं. ते हजर राहिले नंतर रद्द झाला. आता पुन्हा तारखेवर गेले नाहीत पुन्हा वॉरंट निघालं आहे. या प्रकरणाच्या आमचा काहीही संबंध नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे यांचा उपोषणात संताप झाल्यानं ते रागात बोलले असं समजू या. देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केल्यानं कुणाला धोका आहे? हा प्रश्न मी तुम्हाला विचारले. त्यानंतर इको सिस्टिम कॉन चालवतोय हे तुम्हाला कळेल, असं फडणवीस यांनी सांगितले.

माझ्या नादी लागणाऱ्याला सोडत नाही….

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, अनिल देशमुखांनी या आधीही आपल्यावर आरोप केले होते. मी आधी यावर बोललो नव्हतो. मी अशा प्रकारचं राजकारण कधीही करत नाही. मी कुणाच्या नादी लागत नाही अनि कुणी नादी लागलं तर सोडत नाही. मला देशमुखांना एकाच सांगायच आहे. त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी माझ्याकडे काही ऑडियो व्हीज्यूअल्स दिलेत. त्यामद्धे अनिल देशमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, सचिन वाझे यांच्याबद्दल काय म्हणत आहेत हे दिसतंय. रोज कुणी माझ्यावर आरोप करत असेल तर मी शंत बसणार नाही. वेळ आली तर त्या गोष्टी मला पब्लिक कराव्या लागतील. देवेंद्र फडणवीस पुराव्या शिवाय काही बोलत नाही.

श्याम मानव यांनी कोणते आरोप केले?

अनिल देशमुख गृहमंत्री असताना काही लोकांकडून सांगण्यात आलं होतं की, तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून स्वत: ची सोडवणूक करून घ्याची असेल, तर तुम्ही 100 कोटी रुपयांच्या वसूली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं नव घ्याव. आदित्य ठाकरे यांचं नव दिशा सालीयन बलात्कार आणि हत्या प्रकरणात घ्याव, अनिल परब यांचंही नव त्यांच्याशी संबंधित बेकायदेशीर व्यवहाराच्या प्रकरणात घ्याव मात्र अनिल देशमुख यांनी तसं केलं नाही असा आरोप श्याम मानव यांनी केला.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!