मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन का झाले? याचा परिणाम जगभरातील विमाने, बँका यांच्यावर वाचा सविस्तर

Microsoft Windows Outage

Microsoft Windows Outage: मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील यांत्रिकी समस्येमुळे, आज म्हणजेच शुक्रवारी 19 जुलै भारतासह जगभरातील उड्डाणे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. तर काही उड्डाण सेवा रद्द कराव्या लागल्या तर काही उड्डाणे उशिरा झाली आहेत. मायक्रोसॉफ्टच्या Azure क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट 365 सेवांमध्ये समस्या आल्या आहेत. मायक्रोसॉफ्टने म्हंटले आहे की, आम्हाला या समस्येची जाणीव आहे. आणि आम्ही याचे निराकरण करण्यासाठी अनेक टीमला सामील केले आहे. आम्ही कारण निश्चित केले आहे.

या व्यापक समस्येमुळे सिस्टिम अचानक बंद किंवा रिस्टार्ट झाल्या आहेत. ज्यामुळे जगभरातील असंख्य व्यवसाय आणि वैयक्तिक वापरकर्ते चिंतित झाले आहे. या आउटेजमुळे भारत यूएस आणि ऑस्ट्रेलिया या देशांमधील एअरलाइन्स, बँकिंग आणि सरकारी सेवांवर विशेषत परिणाम होत असल्याने अनेक क्षेत्रांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. Frontier, Allegiant आणि Sun Country सारख्या कमी किंमतीच्या वापरकर्त्यानी व्यत्यय नोंदवला, परंतु ऑपरेशन्स हळूहळू सामान्य होत आहेत. भारतात, स्पाईसजेट आणि अकासा एअर सारख्या विमान कंपन्यांना तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला ज्यामुळे बुकिंग, चेक इन आणि फ्लाइट अपडेट्स मध्ये व्यत्यय आला. अकासा ने X वर पोस्टकरत समस्या मान्य केली, प्रवाशांना आश्वासन दिले जी त्यांची टीम सक्रियपणे निराकरणावर काम करत आहे.

Microsoft Windows Outage
Microsoft Windows Outage

मायक्रोसॉफ्ट यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील यूजर्सनं अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे. यामुळे जगभरातील बँका आणि विमानतळांच काम देखील खोळंबल आहे. महत्वाचे म्हणजे मायक्रोसॉफ्टनेही या घटनेची दखल घेतली असून याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचे कंपनीने म्हंटले आहे. दिल्ली विमानतळावरही यांमुळे गोंधळ उडाल्याची माहिती आहे. दिल्ली एयरपोर्टनं जागतिक आयटी संकटामुळे काही सेवांवर परिणाम झाल्याचे ट्विट केलं. सिडनीतील अनेक विमानांची उड्डाण थांबली. तसंच युनायटेड एयरलाइन्सनंही उड्डाण थांबवल्याचं पहायला मिळालं, लंडन स्टॉक एक्स्चेंज च्या प्लॅटफॉर्मलाही याचा फटका बसला. अमेरिकेच्या युनायटेड, डेल्टा आणि अमेरिकन एअरलाइन्स जगभरातील उड्डाण स्थगित केली आहेत. कोणतीही नवी उड्डाण न् करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिकी समस्येमुळे स्काय न्यूज चॅनलने ब्रिटनमध्ये प्रसारण बंद केले आहे. आज सकाळपासून वाहिनीचे थेट प्रक्षेपण होऊ शकले नाही, असे कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष सांगतात. क्राऊडस्ट्राइकने यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. आम्ही या तक्रारीची माहिती घेत असून जोपर्यंत पुढील सूचना येत नाही, तोपर्यंत वाट यूजर्सनी वाट बघावि, असे त्यांनी या निवेदनात म्हंटल आहे.

Microsoft Windows Outage

Microsoft Windows Outage: पोस्ट शेअर करत यूजर्सनि केली तक्रार

एक्स या समाज माध्यमावर पोस्ट शेअर करत अनेक यूजर्सने याबाबत तक्रार केली आहे. काम करत असताना अचानक त्यांचे लॅपटॉप बंद पडत असल्याचे त्यांनी म्हंटल आहे. तसेच तुमचा संगणक अडचणीत असून रिस्टार्ट करणे आवश्यक आहे, असे संदेश स्क्रीनवर येत असल्याचेही या यूजर्सने सांगितले आहे. क्राऊड स्क्राइक अपडेट्सनंतर येत आहे. ही समस्या येत असल्याची तक्रार ही काही यूजर्सद्वारे करण्यात आली आहे.

बुकिंग, चेक इन आणि इतर ऑनलाइन सेवा प्रभावित

अकासा एयरलाइन्सने संगितले की त्याच्या काही ऑनलाइन सेवा मुंबई आणि दिल्ली विमानतळांवर तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध असतील. बुकिंग आणि चेक इंन सेवांसह आमच्या काही ऑनलाइन सेवा तात्पुरत्या अनुपलब्ध असतील. स्पाईस जेटने सांगितले की, आम्हाला सध्या उड्डाण व्यत्ययांवर अपडेट प्रदान करण्यात तांत्रिक समस्या येत आहेत. हे सोडवण्यासाठी आमची टीम सक्रियपणे काम करत आहे. कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी आहोत आणि समस्येचे निराकरण झाल्यावर तुमहल कळवू. अमेरिकेच्या अल्ट्रा लो कॉस्ट एअरलाइन फ्रंटियरने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले जी, आमच्या सिस्टम सध्या मायक्रोसॉफ्टमुळे प्रभावित आहेत.

ज्यामुळे इतर कंपन्यांवर देखील परिणाम होत आहे. या वेळी बुकिंग, चेक इन, तुमच्या बोर्डिंग पासवर प्रवेश आणि काही फ्लाइट प्रभावित होऊ शकतात. आम्ही तुमच्या संयमाची प्रशंसा करतो. एअर एक्सप्रेसने सांगितले जी डिजिटल इन्फ्रास्ट्ररक्चर च्या समस्येमुळे जागतिक स्तरावर अनेक विमान कंपन्या तुमच्या संयमाची आणि समजूतदार पणाची प्रशंसा करतो.

Microsoft Windows Outage

Microsoft Windows Outage: विमान व बँकिंग सेवा प्रभावित

मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft Windows Outage) यंत्रणेत झालेल्या या बिघाडाचा फटका भारतासह जगभरातील बँका आणि विमान सेवेलाही बसला आहे. मुंबईसह देशभरातील अन्य काही महत्वाच्या विमानतळांवर सर्व्हर ठप्प झाल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रवाशांनाही अनेक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. स्पाईसजेटनेही विमानसेवा ठप्प झाल्याचे म्हंटले आहे. विमानसेवे बरोबरच बँकाचे व्यवहार देखील ठप्प झाले आहेत.

Microsoft Windows Outage: युकेतिल रेल्वेलाही फटका

युकेतिल एका मोठ्या रेल्वे कंपनीनंही त्यांना समस्यांचा सामना करावा लागणार असल्यानं, सेवांवर परिणाम होण्याचा इशारा दिला आहे. ब्रिटनमध्ये स्काय न्यूज चॅनललाही याचा फटका बसला आहे. सकाळी लाईव्ह ब्रॉडकास्ट करता आलं नसल्याची तक्रार कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षांनी म्हटलं. गोविया थेम्सलिंक रेल्वेच्या सडर्न, थेम्सलिंग, गॅटवीक एक्सप्रेस आणि ग्रेट नॉर्दर्न या चारही रेल्वे ब्रॅंडनं सोशल मिडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

आमच्या संपूर्ण नेटवर्क मध्ये व्यापक आयटी समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचं मुल कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. असं त्यांनी म्हंटल. बर्लिन विमानतळानंही तांत्रिक अडचणींमुळे चेक इनमध्ये उशीर होत असल्याची पोस्ट केली. स्पेनमध्येही विमानतळांना अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला. अमेरिकेच्या अलास्काच्या पोलिसांनी फेसबुकवर याबाबत पोस्ट केली. संपूर्ण राज्यात या फोनसेवेशी संबंधित कॉल सेंटरचं काम बंद झालं आहे.

Microsoft Windows Outage

मायक्रोसॉफ्टनेही घेतली दखल

दरम्यान, मायक्रोसॉफ्टने या तक्रारीची दखल घेतली आहे. एक्स या समाज माध्यमांवर पोस्ट करत मायक्रोसॉफ्टने या संदर्भात प्रतिक्रिया सिली आहे. मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील संगणक आणि लॅपटॉप प्रभावित झाले आहेत. आम्ही याची दखल घेतली असून याबाबत माहिती घेत आहोत. लवकरच ही सेवा पूर्ववत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे कंपनीने म्हंटल आहे.

ऑस्ट्रेलियन टेलिकॉम कंपनी टेलस्टरा ग्रुपवर परिणाम

ऑस्ट्रेलियन टेलिकॉम कंपनी टेलस्टरा ग्रुपने म्हंटले आहे की ते देखील व्यत्ययाचा सामना करत आहे. कंपनीने म्हंटले आहे की, आमच्या काही प्रणाली मायक्रोसॉफ्टच्या तांत्रिक समस्येमुळे प्रभावित झाल्या आहेत. या समस्येमुळे आमच्या काही ग्राहकांसाठी काही व्यत्यय येत आहे आणि तुमच्या संयमाबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!