Mumbai Rain News
Mumbai Rain News: हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम मुसळधार ते अटी मुसळधार पावसाची शयकीटा वर्तवण्यात आली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईतपुन्हा सततधारी सुरू झाली असून आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढलेला पहायला मिळाला. त्यामुळे सखल भागांत पाणी साचलं आहे. गुरुवारी दिवसभर शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळू शकतो. असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शहरात आज कमाल तापमान 30 अंश सेल्सियस तर किमान 25 अंश सेल्सियस इतकं राहील. उद्याही मुंबईत जोरदार पाऊस कोसळण्यात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे. आज ही मुंबईत मुसळधार पावसाची संततधार कायम राहणार असल्याची माहिती देखील हवामान विभागणं दिली आहे. हवामान विभागांकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आज कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि जिल्ह्यातील काही ठिकाणी अती मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दक्षिण कोकण-गोवा या भागात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची हकीटा आहे. पुढील 24 तस मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे कमाल आणि किमान तापमान 31 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस कोकणासह घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
गुरुवारी 18 जुलै रोजी संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. विदर्भात गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यात सतर्कतेच इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातील नागपूरसह वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा गोंदिया या जिल्ह्यात सर्वत्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात अकोला येथे काही ठिकाणी एक दोन सरी तर अन्यत्र नागपूरसह विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात दिवसभरात काही वेळेच्या अंतराने अधून मधून पावसाची शक्यता आहे. गुरुवारी 18 जुलै रोजी विदर्भातील कमाल तापमान 28 ते 32 डिग्री दरम्यान राहणार असल्याचं अपेक्षित आहे. किमान तापमान 22 ते 25 डिग्री दरम्यान राहण्याची शक्यता असून यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान 19 डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान,आज आणि उद्या मुंबईत (Mumbai Rain News) जोरदार पाऊस कोसळ्यानंतर 20 जुलै आणि 21 जुलै रोजी पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून 22 जुलै आणि 23 जुलै रोजी पुन्हा शहराला पाऊस झोडपून काढेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
Mumbai Rain News: मुंबईकरांसाठी पुढील 24 तास महत्वाचे
तर, पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दरम्यान, मुंबईत काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे. त्याशिवाय ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, परभणी, वर्धा, अमरावती, आणि सातारा, या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने दिला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांलाही हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
Mumbai Rain News: मुंबईला पावसाचा येलो अलर्ट
हवामान विभागाणं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत काल सायंकाळ पासून पाऊस सुरू आहे. काल हवामान विभागाणं मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. मुंबईला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 3-4 तस पावसाची सततधार कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मध्यरात्री पासून मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस बरसतो आहे. सकाळी 5.30 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत 51.8 मिमी पावसाची नोंद तर पश्चिम उपनगरात 27 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर मध्येही पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे.
रस्त्यावर पाणी भरले, वाहतूक संथ गतीनं सुरू
दरम्यान जोरदार पावसांमुळे रस्त्यांवर काही ठिकाणी पानी साचलं आहे. दादर पूर्वे रेल्वे स्थानक परिसरात पानी साचल्याच पहायला मिळत आहे. तर माटुंगा-सायन किंग्ज सर्कल गांधी मार्केट परिसरात पाणी साचायला सुरुवात झालीय. दरम्यान, रस्त्यावर पानी साचायला सुरुवात केल्यानं वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे, वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी ट्राफिक जाम होत असल्याचही पहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागाणं दिलेल्या माहितीनुसार सध्या दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. रस्त्यावर पाणी सचायला सुरुवात देखील झाली आहे. तसेच ठाण्यात देखील पावसाळा सुरुवात झाली आहे. दरम्यान, या पावसाच्या पाश्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आव्हान प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
Mumbai Rain News: रेल्वे स्टेशनवर चाकरमानी आणि प्रवाशांची गर्दी
दरम्यान, सध्या मुंबईत (Mumbai Rain News) जारी पावसाचा जोर वाढला असला तरी देखील कोणत्याही रेल्वे स्थानकात रुळावर पानी साचलेल नाही. त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरू आहे. फक्त काही मिनिटे उशिराने लोकल रेल्वे सुरू आहेत. कल्याण वरुण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनला जाणाऱ्या गद्य दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत असल्याने कल्याण स्थानकात चाकरमानी आणि प्रवाशांची गर्दी पहायला मिळत आहे. पहाटे छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणाऱ्या लांब पल्याच्या गाड्यांमुळे सिग्नल मिळत नसल्यास लोकल ट्रेन ही उशिरानं धावत आहेत.
रायगड-रत्नागिरीला रेड अलर्ट
रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून आजही पावसाचा रेड अलर्ट आला आहे. सततच्या पावसामुळे रायगडमध्ये पुरस्थिति निर्माण झाली असून प्रशासन अलर्ट मोडवर काम करत आहे. तर रत्नागिरीलाही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याशिवाय, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रालाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातही पावसाचा जोर वाढेल.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!