Ladka Bhau Yojna 2024
Ladka Bhau Yojna 2024: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आयोजित ‘कृषि पंढरी’ या कृषि प्रदर्शनाचं उद्घाटन केलं, दरम्यान, शिंदे यांनी पंढरपुरातून लाडकी बहीण या योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठी जी खास योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी या योजनेअंतर्गत 12 वि उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना 10 हजार रुपये स्टायपंड देण्याची घोषणा केली. त्यामुळे तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप (Apprenticeship) करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. हे अप्रेंटिसशिपचे पैसे सरकार भरणार आहे.
आषाढी एकादशी च्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, यावेळी त्यांनी पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार अमितीच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषि पांढरी महोत्सवाचं उद्घाटन केलं. मुख्यमंत्र्यांबरोबर यावेळी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी तरुणांसाठी योजनेची घोषणा केली.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही सुरू केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एका योजनेची घोषणा केली होती. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असं या योजनेच नाव आहे. मुळात बेरोजगार तरुणांसाठीचि ही अप्रेंटिस योजना आहे. या योजनेसाठी 5 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, आपण लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा काही लोक म्हणाले लाडक्या बहिणीसाठी तर योजना आणली, पण आता लाडक्या भावांच काय? त्यामुळे आपण लाडक्या भावांच पण केलंय. “राज्यात शेतकऱ्यांच, कष्टकऱ्यांच, वारकऱ्यांच, कामगारांच सरकार आहे. हे सरकार सर्वांच भलं कसं होईल ते पाहतय. आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना एका महिन्याला 1,500 रुपये म्हणजेच 18,000 रुपये दिले जटिल. तसेच त्यांना दर वर्षी तीन गॅस सिलेंडर दिले जटिल. या योजनेचे पैसे लवकरच महिलांच्या खात्यात वळवले जातील.
Ladka Bhau Yojna 2024: काय आहे ही योजना?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजना लागू केल्यावर अनेकांनी टीका केली की, लाडक्या भावांच काय? मला सांगायचे आहे की, लाडक्या भवांकडेही आमचं लक्ष आहे. आम्ही त्यांच्यासाठी एक योजना आणली आहे. या योजनेत 12 वि पास तरूणांपासून ते पदवीधर तरूणांपर्यंत प्रत्येक महिन्याला स्टायपेंड दिले जातील. जो तरुण 12 वि उत्तीर्ण झाला आहे. त्यांना डर महिन्याला सहा हजार रुपये मिळतील. डिप्लोमा पास तरुणाला 8 हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षात राज्यातील तरुणांना या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण काळात विद्यावेतन मिळणार आहे.
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तरुणाने एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करावी लागेल. त्या अप्रेंटिसशिपचा तरुणाला अनुभव मिळेल आणि त्याच्याच आधारावर त्याला नोकरी सुद्धा मिळेल. अप्रेंटिसशिप करणाऱ्या तरुणांना सरकारकडून पैसे मिळणार आहेत. मात्र एखादा तरुण एका महिन्यात 10 दिवस किंवा त्याहून अधिक दिवस गैरहजर राहिल्यास किंवा प्रशिक्षणार्थी तरुण पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यावर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेच्या संदर्भात लवकरच राज्य सरकारकडून शासन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
योजनेसाठी नोंदणी कुठे करायची
योजनेच्या शासन निर्णयानुसार, या योजनेसाठी रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक ऑनलाइन पद्धतीनं नोंदणी करतील. योजनेचे कामकाज उदा. उमेदवारांची नोंदणी, अस्थापनांची नोंदणी कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती, विद्यावेतन, प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल, अनुभव प्रमाणपत्र इ. बाबी ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील.
बारावी, आय.टी.आय., पदाविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in/ या वेबसाइट वर ऑनलाइन नोंदणी करतील. विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, शासकीय, निमशासकीय आस्थापना/महामंडळ, सामाजिक संस्था त्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी सुद्धा या दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नोंदवतील.
Ladka Bhau Yojna 2024: अर्जदारांसाठी पात्रता काय?
योजनेच्या शासन निर्णयात इच्छुक उमेदवार आणि उद्योगांसाठी पात्रतेसाठी काय अटी असणार आहे. उमेदवाराचे निकष पुढीलप्रमाणे-
- उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्ष असावं
- उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता 12 वि पास/ आयटीआय/ पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
- उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावं.
- उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
आस्थापना किंवा उद्योगासाठीची पात्रता पुढीलप्रमाणे.
- आस्थापना/ उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.
- आस्थापना/ उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
- आस्थापना/ उद्योगाची स्थापना किमान 3 वर्ष पूर्वीची असावी.
- आस्थापना/ उद्योगांनी EPF, ESIC, GST, Certificate of Incorporation, DPIT व उद्योग आधार ची नोंदणी केलेली असावी.
Ladka Bhau Yojna 2024: प्रशिक्षणानंतर पुढे काय?
Ladka Bhau Yojna 2024 या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवारानं कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली की, आस्थपणा, उद्योग किंवा महामंडळा मार्फत उमेदवारांना कुशल व अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणचा कळवधी 6 महीने असेल. सदरच्या सहा महिन्याच्या कालावधी साठी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित अस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्यापूर्ण केल्याचे विहित नामुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल.
या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग किंवा आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!