Ashadhi Ekadashi 2024
Ashadhi Ekadashi 2024: नमस्कार मित्रांनो, आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे. यंदाच्या एकादशी तिथीपासून चातुर्मास सुरू होत आहे, जो देवउठणी एकादशी पर्यंत असणार आहे. आषाढी एकादशीला विठूरायासह भगवान विष्णूचीही पूजा केली जाते. यंदा आषाढी एकादशी कधी आहे? शुभ मुहूर्त काय आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हणतात. या दिवसांपासून चतुर्मास म्हणजेच ४ महिन्यांचा कालावधी सुरू होतो, म्हणजेच देव ४ महीने निद्रा घेतात. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. यावेळी देवशयनी एकादशी बुधवार, १७ जुलै २०२४ रोजी असेल.
देवशयनी एकादशी तिथी आणि मुहूर्त
पंचांगानुसार, आषाढ Ashadhi Ekadashi 2024 महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी १६ जुलै रोजी रात्री ८ वाजून ३३ मिनिटांनी सुरू होईल. तर १७ जुलै रोजी रात्री ९ वाजून ०२ मिनिटांनी समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला महत्व आहे. त्यानुसार १७ जुलै रोजी देवशयनी एकादशी व्रत केले जाईल. दरम्यान, देवशयनी एकादशीच्या दिवशी सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांपर्यंत शुभ योग तयार होत आहे. यानंतर शुक्ल योग तयार होत १८ जुलै रोजी सकाळी ६ वाजून १३ मिनिटांनी हा योग समाप्त होईल. देवशयनी एकादशीला सर्वार्थ सिद्धी योगही जुळून येत आहे.
पंचांगानुसार, १७ जुलैपासून चातुर्मास सुरू होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, देवशयनी एकादशी ते देवउठवनी एकादशी पर्यंत म्हणजेच १२ नोव्हेंबर पर्यंत चतुर्मास असेल. या दरम्यान देव निद्रावस्थेत जातात. त्यामुळे ही चार महीने सोहळा, साखरपुडा, मुलांचे नामकरण आणि गृहप्रवेशा सारखे शुभ कार्य करणे वज्रय मानले जाते. देवउठवनी एकादशी नंतर शुभ कार्याला सुरुवात होते.
आषाढी एकादशीचे विधी:
आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2024) दिवशी व्रतकर्त्याने उपास करावयाचा असतो. विष्णूच्या अथवा विठ्ठलाच्या मूर्तीची मनोभावे षोडशोपचारे पूजा करावी. पांडुरंगाची मूर्ती असल्यास पितांबरी नेसवून शुभ्र वस्त्र अंथरलेल्या शय्येवर त्या मूर्तीला झोपवावे, असा विधी आहे.
आषाढी एकादशीचे व्रत:
या दिवसापासून चार महिन्यांसाठी आपल्या आवडत्या पदार्थाचे सेवन करणे त्यागले जाते. काही मंडळी हे चार महीने परान्न सेवन करत नाहीत. काही मंडळी एकभुक्त राहतात. काही जण नक्तव्रत म्हणजे केवळ रात्रीचे भोजन करतात. या साऱ्या व्रतांना ‘गोविंदशयन व्रत’ असे एकच नव आहे. या एकादशीला पद्मा एकादशी असेही एक नव आहे.
उपवास हा प्रकार जगभरातून आढळून येतो मात्र त्यामागील करणे आणि श्रद्धा वेगवेगळ्या आहेत. उपवास हा श्रद्धेतूनच केला जात असल्याचं दिसून येतं पण उपवसाकडे रोगांविरुद्ध प्रभावी शस्त्र म्हणूनही पहिलं जातं. उपवास म्हणजेच अन्नपणी आणि सर्व भोग वज्री करून राहणे, परंतु सर्वसाधारणपणे उपवासाचा अर्थ ‘हलका आणि कमी आहार घेणे’ असं गृहीत धरला जातो. वेदवचनाचा आधार घेऊन यज्ञ, दान, तप आणि उपवास हे परमेश्वर प्राप्तीचे चार मार्ग असे सांगितले गेले आहेत. तपाच्या निरनिराळ्या प्रकारात उपवास मुख्य आणि श्रेष्ठ आहे असे महाभारतात सांगितले आहे.
उपवासाचा परिणाम हा शारीरिक आरोग्यावर होतो असं नाही तर त्याचा मानसिक आणि भावनात्मक आरोग्यावर चंगळ परिणाम होत असतो. उपवास करण्यासाठी तुम्हाला एकाग्रता लागते. तुमच्या एकाग्रतेवर चांगला परिणाम होऊन कामात अधिक लक्षही लागतं. सुस्ती कमी होते. कामाकडे लक्ष केंद्रित करता येते. तसंच सतत चिंता आणि तणाव असेल, ज्यामुळे झोप येत नसेल तर उपवासाने आणि उपवासात योग्य खाण्याने तुम्हाला चांगली झोपही येते. त्यामुळे किमान आठवड्यातून एकदा तरी जर झेपत असेल तर शारीरिक स्वास्थ्यासाठी उपवास करणं चांगल आहे.
Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीला पूजा करताना या गोष्टी ठेवा लक्षात
- पहाटे उठून स्नान करावे. सूर्यदेवतेला जल अर्पण करावे.
- आषाढी (Ashadhi Ekadashi 2024) एकादशीचे व्रत करावे.
- विठ्ठलाच्या मूर्तीला स्नान घालावे. दुधाचा अभिषेक करावा. यानंतर प्रतिमेस पिवळ्या रंगाचे वस्त्र, तुळशीची माल, पिवळी फुले आणि चंदन अर्पण करा.
- यानंतर हळद-कुंकू, चंदन, अबीर, गुलाल, विडा, धूप, अगरबत्ती, फुले अर्पण करून देवाची आरती करावी.
- देवाला उपवासाचा नैवैद्य अर्पण करावे.
- विठ्ठलाचे नामस्मरण करावे. आरती संपन्न झाल्यानंतर तीर्थ- प्रसादाचे वाटप करावे.
या दिवशी या विशेष मंत्राचा उच्चार करून भगवान श्री विष्णुंना झोपवले जाते.
हरीशयन मंत्र- ‘सुप्ते त्वयि जगन्नाथ जमत्सुप्तं भवेदीदम् । विबुद्दे त्वयि बुद्ध च जगत्सर्व चराचरम्।’
-अर्थात हे परमेश्वरा, तुझ्या जागे होण्याने संपूर्ण सुष्टी जागृत होते आणि तुझ्या झोपेने सर्व सुष्टी, गतिमान आणि अचल, झोपी जाते. तुझ्या कृपेनेच ही सुष्टी झोपते आणि जागते, तुझ्या कृपेने आमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव कर.
तसेच देवशयनी म्हणजेच हरीशयनी दिवशी भगवान विष्णुची पूजा विधीनुसार करावी, जेणेकरून चार महीने भगवान विष्णूचा आशीर्वाद कायम राहतो. यासाठी देवशयनी एकादशीच्या दिवशी ताटावर लाल कापड पसरून श्री विष्णुची मूर्ती किंवा चित्र ठेवून दिवा लावावा. त्यांना पिवळे कपडे अर्पण करा. पिवळ्या वस्तु अर्पण करा. भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करा. जर कोणताही मंत्र आला नाही तर फक्त हरी नामाचा सतत जप करा. जर तुम्ही मंत्र जपत असाल तर तुळशी किंवा चंदनाच्या जपमाळाने जप करा. नंतर आरती करावी.
पौराणिक कथा:
फार पूर्वी सूर्यवंशात राजा मांधाता होऊन गेला. तो अतिशय न्यायी, गुणी, प्रजेची काळजी गेनार होता. सुख समृद्धी पूर्ण अशा त्याच्या राज्यात एकदा तीन वर्ष सातत्याने अनावृष्टि झाली. परिणामी या दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाले. त्यावेळी मांधात्याने अंगिरस ऋषिना त्यावर उपाय सुचवण्याची विनंती केली. त्यावेळी ऋषिनी त्याला पद्मा एकादशी व्रत करण्यास सांगितले. राजाने हे व्रत मनोभावे केले. त्यायोगे वरुण राजाने कृपा केली. योगयावेळी हवी तशीय पर्जन्य वृष्टि झाली. मांधात्याच्या राज्याला पुन्हा सुख समृद्धी, आनंदाचे दिवस प्राप्त झाले. मांधाता राजावर जशी कृपादुष्टि झाली. ताशी आपल्यावरही कृपादृष्टी करून पांडुरंगाने आपल्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आनंदाने, समाधानाने न्हाऊन टाकावे अशी प्रार्थना करूया.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!