BSNL New Recharge Plan
BSNL New Recharge Plan: रीचार्ज प्लॅनच्या वाढत्या किंमतीनंतर आता खासगी टेलिकॉम आणि सरकारी टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. चढया भावामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. रिलायन्स जिओ, एयरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या अनेक ग्राहकांची बीएसएनएल कंपनी स्वीकारली आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांना मोठा झटका बसला. मात्र या दरवाढीचा फायदा या सरकारी टेलिकॉम कंपनीच्या स्वस्त रीचार्ज प्लॅनने मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आकर्षित केले आहे. कारण जिओ, एयरटेल दरवाढीनंतर ग्राहकांनी आपली पावलं बीएसएनएल कडे वळवल्याच दिसत आहे. बीएसएनएलचा रीचार्ज प्लॅन इतर कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त मानला जातो त्याची व्हॅलीडिटी 28 दिवसांपासून टे 365 दिवसांपर्यंत असते.
सर्वसामान्य नागरिकांना आता बीएसएनएलला प्राधान्य देत सीमकार्ड खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या जून महिन्यापासून बीएसएनएल कडे ग्राहकांचा कल वाढला आहे. यासोबत बीएसएनएल BSNL New Recharge Plan ने जूनपासून 4G बेस ट्रान्सीव्हर स्टेशन बसवण्याचा स्पीड सुद्धा वाढवला आहे. पूर्व उत्तरप्रदेशात आणखी 5500 बीटीएस बसवले जात आहेत. जिओ, एयरटेल आणि व्हीआय यांचे रीचार्ज प्लॅन महाग झाल्याचा थेट फायदा बीएसएनएल ला मिळत आहे.
उत्तरप्रदेश पूर्व मंडळात जून आणि जुलै या दोन महिन्यात तब्बल 2 लाख 12 हजार नवीन ग्राहकांनी बीएसएनएल निवड केली आहे. यापैकी 1.97 लाख ग्राहकांनी नवीन सिम कार्ड खरेदी केले तर 15 हजार ग्राहकांनी आपला नंबर पोर्ट करून बीएसएनएलची सेवा घेण्यास सुरुवात केली आहे. बीएसएनएल 4G सेवेच्या अपेक्षा वाढल्याने ग्राहकांनी आता सरकारी टेलिकॉम कंपनीची सेवा घेण्यास सुरुवात केली आहे. 28 जून रोजी खासगी क्षेत्रातील जिओ, एयरटेल आणि व्हीआय या प्रमुख कंपन्यांनी आपल्या रीचार्ज प्लॅनच्या दरात मोठी वाढ केली. त्यापाठोपाठ वोडाफोन आइडिया या टेलिकॉम कंपनीने सुद्धा आपल्या प्लॅनच्या किंमतीत वाढ केली. यामुळे ग्राहकांनी बीएसएनएलला पसंती देण्यास सुरुवात केली आहे.
मिडिया रिपोर्टसनुसार देशभरात दररोज 8 ते 10 हजार बीएसएनएल चे नवीन सिमकार्ड खरेदी केले जात आहेत. जुलै महिन्यातील 11 दिवसांतच उत्तरप्रदेश पूर्व सर्कलमध्ये 1 लाख 30 हजार नवीन बीएसएनएल सिम कार्ड खरेदी करण्यात आले आहेत. ज्या ग्राहकांना बीएसएनएलचे नवीन सीमकार्ड मिळत नाहीयेत असे ग्राहक आपला जुना नंबरच बीएसएनएल BSNL New Recharge Plan मध्ये पोर्ट करत आहेत. एकूणच जिओ, एयरटेल आणि वोडाफोन या खासगी कंपन्यांच्या दरवाढीच्या निर्णयामुळे सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलला मोठा फायदा होताना दिसत आहे. इतकेच नाही तर सोशल मिडियात सुद्धा बीएसएनएल ट्रेंड होताना दिसून येत आहे.
BSNL चे 4Gमहिन्यात सुरू होत आहे
BSNL ची 4G (BSNL New Recharge Plan) सेवा पुढील महिन्यात देशाच्या सर्व भागात सुरू होत आहे. सुरुवातीला ग्राहकांना मोफत 4G सिम कार्ड मिळतील. याशिवाय विद्यमान ग्राहकांचे सिमकार्ड सुद्धा मोफत 4G वर अपग्रेड केले जातील. BSNL ने नुकतेच तमिळनाडूच्या तिरुवल्लूवर जिल्ह्यात 4G लॉन्च केले आहे. BSNL 4G च्या या लॉन्चमुळे नोचीली, कोलाथुर, पल्लीपेट, थिरुवेल्लावोयल आणि पोनेरी यांसारख्या भागांना फायदा होईल. यानंतर तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये 4G रोलआउट केले जाईल.
जिल्ह्यांमध्ये दररोज नवीन 500 सीमकार्डची विक्री होत आहे.
अनेक अहवालानुसार, जेव्हापासून खासगी टेलिकॉम कंपन्यांचे रीचार्ज प्लॅन महाग झाले आहेत. तेव्हापासून बीएसएनएल BSNL New Recharge Plan सिमची विक्री तीन पटीने वाढली आहे. याशिवाय बीएसएनएल मधील पोर्टेबिलिटीही अडीच पटीने वाढली आहे. अहवालानुसार, बिहार झारखंड सर्कलच्या धनबादमध्ये दररोज 500 बीएसएनएल सिम विकले जात आहेत. गेल्या महिन्यात हा आकडा दररोज 150 होता. याशिवाय अवघ्या 6 दिवसात बीएसएनएलचे 2500 नवीन ग्राहक तयार झाले आहेत. दुसऱ्या अहवालानुसार, राजस्थानमध्ये अवघ्या एका महिन्यात 1,61,083 लोक बीएसएनएलशी जोडले गेले आहेत. याच कालावधीत, 68,412 ग्राहकांनी airtel आणि 6,01,508 ग्राहकांनी jio ला निरोप दिला.
BSNL 107 रुपयांचा रीचार्ज प्लॅन ऑफर करत आहे
जर आपण BSNL च्या रु. 107 च्या रीचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झालं तर हा एक अतिशय चांगला पर्याय आहे. कारण इतर कंपन्यां बद्दल बोलायचे झालं तर बहुतेक मासिक योजनांची वैधता 28 दिवस असते. यामध्ये 200 मिनिटे व्हाईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली असून या सोबतच 3 जिबीपर्यंत डेटाही दिला जात आहे. या प्लॅनची वैधता 35 दिवसांची आहे. तर एसएमएसचे फायदे त्यात उपलब्ध नाहीत ज्यांना कमी खर्चात आपले सिम सक्रिय ठेवायचे आहे. त्यांच्यासाठी ही एक चांगली योजना ठरणार आहे.
तुम्ही तुमच्या jio,एयरटेल आणि व्हीआय सिमला BSNL मध्ये कसे पोर्ट कराल
jio आणि airtel च्या रीचार्ज प्लॅनमध्ये वाढ झाली आहे. त्यानंतर लोक स्वस्त रीचार्जसाठी BSNL (BSNL New Recharge Plan) चा पर्याय म्हणून विचार करत आहेत. महागड्या रीचार्ज दरम्यान, लोकांना मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) म्हणजेच BSNL मध्ये नंबर पोर्ट करण्याबद्दल माहिती देणार आहोत. जर तुम्ही jio आणि airtel यूजर्स असाल आणि तुमचे सिम BSNL मध्ये ट्रान्सफर करायचे असेल, तर हे करण्याची प्रोसेस जाणून घेऊया.
- सर्वप्रथम तुम्हाला 1900 वर एसएमएस पाठवून मोबाइल नंबर पोर्ट करण्याची रिक्वेस्ट करावी लागेल.
- यासाठी तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये PORT लिहून तुमचा 10 अंकी मोबाइल नंबर टाकावा लागेल आणि त्यानंतर स्पेस द्यावे लागेल.
- जर तुम्ही जम्मू-काश्मीरचे युजर असाल तर तुम्हाला 1900 वर कॉल करावा लागेल.
- त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर पोर्ट करण्यासाठी तुम्हाला बीएसएनएलच्या सर्विस सेंटरमध्ये जावे लागेल. जिथ आधार कार्ड जकिनव इतर आयडी डिटेलस, फोटो आणि बायोमेट्रिक डिटेल्स तुमच्याकडून घेतले जातील.
- यानंतर तुम्हाला नवीन बीएसएनएल सिम दिले जाईल. त्या बदल्यात तुमच्याकडून काही पैसे आकरले जाऊ शकतात.
- त्यानंतर तुम्हाला एक विशेष नंबर पाठवला जाईल, त्याच्या मदतीने तुम्ही मोबाइल नंबर सुरू करू शकाल.
MNP नियम
- jioआणि airtel यूजर्सना BSNL ला पोर्ट करण्याची प्रक्रिया सारखीच आहे.
- भारतीय टेलिकॉम ऑथॉरिटीच्या नवीन नियमानुसार, नवीन टेलिकॉम ऑपरेटरकडे जाण्यासाठी प्रतीक्षा कालावधी 7 दिवसांचा झाला आहे. म्हणजे सीमकार्डसाठी पोर्टमध्ये 7 दिवस थांबावे लागेल.
- तुमची शिल्लक थकबाकी नसल्यास, तुमचा मोबाइल नंबर 15 ते 30 दिवसात सुरू केला जाईल.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!