मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, नेमकं काय घडलं?

Donald Trump Attack

Donald Trump Attack:अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प Donald Trump Attack यांच्या सभेत गोळीबाराची घटना घडली आहे. अमेरिकेतील पेन्सिलवेनिया राज्यातील वेळेनुसार ही घटना 13 जुलै रोजी सायंकाळी घडली. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी सोशल मिडियावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी म्हंटलंय की “आज पेन्सिलवेनियातिल बटलर मध्ये विनाकारण झालेल्या हिंसाचाराबद्दल माझे वडील आणि इतर पीडितांसाठी तुम्ही जे प्रेम दाखवलं, प्रार्थना केली त्याबद्दल धन्यवाद,”

इवांका यांनी आपल्या पोस्ट मध्ये पुढे लिहिलं आहे. सीक्रेट सर्व्हिस आणि कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनी जी कार्यतत्परता दाखवली त्याबद्दल मी आभारी आहे. मी आपल्या देशासाठी सतत प्रार्थना करत राहीन, डॅडी माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि सदैव राहीन.

रॅलीदरम्यान संबोधित करत असताना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प हे थोडक्यात बचावले. त्यानंतर त्यांच्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनि त्याला स्टेजवरून बाहेर नेले. ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेल्याने सुरक्षा दलाने वेढलेल्या मंचावरून त्यांना बाहेर नेले जात असताना त्यांच्या उजव्या कानाभोवती रक्त दिसत होते. डोनाल्ड ट्रम्प सध्या धोक्या बाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

Donald Trump Attack
Donald Trump Attack

तर डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरने वाडिलांवर झालेल्या हल्ल्यानंतर सोशल मिडियावर पोस्ट टाकून प्रतिक्रिया दिली आहे. हल्ल्यानंतर त्याने एक्स (ट्विटर) या सोशल मिडिया व्यासपीठावर रक फोटो टाकला आहे. या फोटोत डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ दिसत आहेत आणि आपल्या हाताची मूठ हवेत उंचावत आहेत. ट्रम्प ज्युनियरनं या फोटोला कॅप्शन् डेट लिहिलं आहे की, अमेरिकेला वाचवण्यासाठी ते नेहमीच लढत राहतील. याशिवाय ट्रम्प यांची मुलगी, टिफनी एरियानाने सुद्धा आपल्या वडिलांचा जीव वाचल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले.

टिफनी म्हणाली राजकीय हिंसाचारातूनं कधीही कोणत्याही समस्येवर तोडगा निघत नाही. तुम्ही आज पाहिलंत की माझे वडील लढवय्ये आहेत. आणि ते तुमच्यासाठी आणि अमेरिकेसाठी लढत राहतील.

Donald Trump Attack: नेमकं काय घडलं?

पेन्सिलवेनिया राज्यातील बटलर शहरात डोनाल्ड ट्रम्प एका प्रचारसभेत भाषण करत असताना गोळीबाराचा आवाज झाला. ट्रम्प गोळीबारानंतर कानाला हात लावत काहलि झुकतात दिसले आणि नंतरच काही क्षणातच सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी त्यांना स्टेजवरून खाली उतरवत, घटनास्थळी दूर नेलं. हल्लेखोराला सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी ठारकेलं असून डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना स्टेजवरून खाली उतरवलं जात असताना ते उपस्थित लोकांकडे बघून अभिवादन करताना दिसून आले. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या प्रचार यंत्रणेतिल लोकांनी दिली आहे. या सभेत उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की सभास्थळापासून जवळ असणाऱ्या एका इमारतीवर एका माणसाला रायफल घेऊन रांगत असताना त्यांनी पहिलं होतं. या घटनेनंतर जो व्हिडिओ समोर आला त्यात असं दिसत आहे की गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर ट्रम्प खाली झुकले आणि ते पुन्हा उभे राहिले तेव्हा त्यांच्या गालावर रक्त दिसून येत होतं.

Donald Trump Attack

ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेचे प्रवक्ते स्टीव्हन च्युंग म्हणाले की अध्यक्ष ट्रम्प यांनी या Donald Trump Attack हल्ल्यानंतर तात्काळ कारवाई करणाऱ्या अधिकारी आणि यंत्रणेचे आभार मानले. पोलिस यंत्रणेतील सूत्रांनी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार संशयित हल्लेखोराला सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी गोळ्या घालून थार केलं आहे. या सूत्रांनी हेही सांगितले की संशयित पुरुष हल्लेखोर हा रायफल घेऊन आला होता आणि त्याने मंचापासून काहिशे मीटर दूर असलेल्या एका उंच जागेवरून गोळीबार केला. सीक्रेट सर्व्हिसने दिलेल्या निवेदनात असं सांगितल आहे की डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.

ते पुढे म्हणाले की आता या घटनेचा तपास सुरू असून जी माहिती मिळेल ती लवकरच सांगितली जाईल. यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका आहेत. याच निवडणुकीच्या प्रचारासाठी डोनाल्ड ट्रम्प हे पेन्सिलवेनिया राज्यातील बटलर शहरात भाषण करत होते. पेन्सिलवेनिया हे अमेरिकेतील महत्वाचं स्विंग स्टेट (राजकीय दृष्ट्या स्पष्ट नसलेलं) राज्य आहे. या सभेत ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केल्यानंतर काही वेळाने गोळीबाराचा आवाज एकू आला. एकापाठोपाठ एक गोळ्या झाडल्याचे आवाज आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागे उभे असलेले समर्थक दचकून खाली झुकताना दिसून आले.

गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिस या सुरक्षा संस्थेकडून ट्रम्प यांच्यावर Donald Trump Attack झालेल्या हल्ल्याबाबत एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यात त्यांनी असं सांगितले आहे की, या हल्ल्यात प्रेक्षकांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी आहेत. 13 जुलै रोजी संध्याकाळी अंदाजे 6.15 वाजता (अमेरिकन वेळ) एका संशयित शूटरने सभेच्या ठिकाणाच्या बाहेर असलेल्या एका उच जागेवरून मंचाच्या दिशेने अनेक गोळ्या झाडल्या. या घटनेची सध्या चौकशी सुरू आहे आणि सीक्रेट सर्व्हिसने एफबीआयला सूचित केलं आहे.

Donald Trump Attack

सुरक्षा यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताने 200 फुट ते 300 फुट अंतरावरून एआर-शैलीतील रायफरने ट्रम्प यांच्या दिशेने गोळीबार केला. ट्रम्प सोमवारी मिलवॉकी येथील अधिवेशनात अध्यक्षपदासाठी त्यांच्या पक्षाचे नामांकन स्वीकारणार होते. काहीनी असा अंदाज लावला होता की बटरलच्या सभेत ते मोठी घोषणा करतील. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यामध्ये 2020 च्या निवडणुकी सारखाच चुरशीचा सामना पहायला मिळतो आहे.

मी या घटनेचा तीव्र निषेध करतो- पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर मध्ये (एक्स) म्हंटले आहे की, माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump Attack यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. त्यांनी लवकरात लवकर बारे व्हावे अशी माझी इच्छा आहे. आमचे विचार आणि प्रार्थना पीडित, जखमी आणि अमेरिकन लोकांच्या कुटुंबियांसोबत आहेत, ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!