विधानपरिषेद निवडणुकीत अखेर पंकजा मुंडे आमदार बनल्या, 10 वर्षानी उधळला विजयाचा गुलाल

Vidhan Parishad Election Result 2024

Vidhan Parishad Election Result 2024:विधान परिषेदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक पार पडली या निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टीळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. शिंदे गटाच्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांचाही विजय झाला आहे. तर अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर यांचाही विजय झाला आहे. आता ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, भाजपचे सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील यांच्यात पुढच्या फेरीत चुरस पहायला मिळणार आहे.

विधान परिषेदेच्या (Vidhan Parishad Election Result 2024) या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे पराभवाचा धक्का नेमका कुणाला बसणार याचीच चर्चा होती. विधान भवनात सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया झाली, असून सव्वा 12 वाजेपर्यंत 222 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकसभेच्या निकालानंतर आणि महाराष्ट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक होत असल्यानेही टि महत्वाची ठरली. आमदार फुटण्याची भीती असल्याने गेल्या दोन दिवसांपासून खबरदारी म्हणून सत्ताधारी आणि विरोधात दोन्ही गटातील आमदारांना पक्ष नेतृत्वाकडून पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

Vidhan Parishad Election Result 2024
Vidhan Parishad Election Result 2024

वडील आणि दिवंगत गोपीनाथ मुंडेचा बालेकिल्ला असलेल्या परळी मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेचा पराभव झाला. या पराभवानंतर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडेना तब्बल 5 वर्षाची वाट पहावी लागली. तत्पूर्वी. 2014 विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेनी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेचा तब्बल 24 हजार मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला होता. त्याचवेळी, गावकी भावकीप्रमाणे अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसह पंकजा मुंडेनी आनंदोत्सव साजरा करत विजयाचा गुलाल उधळला. मात्र, त्या गुलालानंतर संसदीय राजकारणातील विजयाचा गुलाल उधळण्यासाठी तब्बल 10 वर्षाची वाट पहावी लागली. त्यात, 2019 च्या प्रभावानंतर जवळपास 5 वर्षाचा राजकीय वनवास त्यांच्या नशिबी आला होता. त्यामुळे आता विधानपरिषेद निवडणुकीच्या निमित्ताने 10 वर्षानंतर पंकजा मुंडेनी कुटुंबीयांसह विजयाचा गुलाल उधळला.

विधान परिषद निवडणुकीचा Vidhan Parishad Election Result 2024 निकाल हाथि आला असून भाजप नेत्या पंकजा मुंडेचा विजय झाला आहे. पंकजा यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्यांच कुटुंब विधानभवनात दाखल झाल्याचं पहायला मिळालं. विधानपरिषेद निवडणुकीत पंकजा मुंडेना 26 मत मिळाली आहेत. त्यामुळे, या विजयानंतर पंकजा मुंडेच्या समर्थकांनी जल्लोष केला असून विधिमंडळ परिसरात मुंडे कुटुंबीयांनी आनंदी असल्याचं दिसून आलं.

धनंजय मुंडे अन् पंकजा मधील राजकीय संघर्ष

भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा राजकीय संघर्ष सुरू झाला. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत Vidhan Parishad Election Result 2024 परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली, त्यामध्ये पंकजानी बाजी मारली. मात्र या विजयानंतर पंकजाना विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मोठी वाट पहावी लागली. गोपीनाथ मुंडेच्या निधनानंतर डिसेंबर 2016 मध्ये परळी नगरपालिकेची निवडणूक झाली. मुंडे कुटुंबियांसाठी ही नगरपालिका नेहमीच महत्वाची ठरली आहे. यावेळेस पंकज विरुद्ध धनंजय अस पुन्हा चित्र होत.

Vidhan Parishad Election Result 2024

तेव्हा धनंजय मुंडे यांनी 33 पैकी तब्बल 27 उमेदवार निवडून आणत त्यांनी नगरपालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीनंतर भावा बहिणीतली चुरस वाढली 2017 च्या सुरुवातीला लगेचच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा सर्वाधिक जागा मिळवल्या तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. या जिल्हा परिषद निवडणुकीतच परळी तालुक्यामध्ये भाजपला मोयहा फटका बसला. मे 2017 मध्ये परळी कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. 18 जगासाठी 42 उमेदवार रिंगणात होते. अनेक वर्ष गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात बाजार समिति होती. या बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजय पुन्हा एकदा समोरसमोर उभे होते. दोघांनी आपापल्या दिवंगत वडिलांच्या नावावर पॅनल उभे केले होते. त्याचवेळी पंकज यांच्या बहीण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी प्रचार केला होता.

पहिल्या पसंतीत मिळालेली मते

Vidhan Parishad Election Result 2024 निवडणुकीत पहिल्या पसंतीत मते मिळून आठ उमेदवार विजयी झाले आहेत. तर उर्वरित मते मिळणाऱ्या दुसऱ्या पसंतीच्या मतावर अवलंबून राहाव लागणार आहे. पहिल्या पसंतीची किमान 23 मते विजयासाठी आवश्यक होती. तेवढी किंवा अधिक मते मिळालेले उमेदवार विजयी ठरले आहेत. उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे आहेत.

विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ- 288

विधानसभेत विद्यमान आमदारांची संख्या- 274

आता विधानपरिषेदेच्या 11 जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या 12 उमेदवारांना निवडून येणीसाठी प्रत्येकी 23 आमदारांच्या मतांची गरज होती.

पक्ष उमेदवार मिळालेली मते
भाजप पंकजा मुंडे 26
परिणय फुके 26
अमित गोरखे 26
योगेश टीळेकर 26
सदाभाऊ खोत 14
राष्ट्रवादी कॉँग्रेस
(अजित पवार गट)
शिवाजीराव गर्जे 24
राजेश विटेकर 23
शिवसेना
(एकनाथ शिंदे गट)
कृपाल तुमाने 24
भावना गवळी 24
कॉँग्रेस प्रज्ञा सातव 25
शिवसेना
(उद्धव ठाकरे गट)
मिलिंद नार्वेकर 22
शेकाप
(शरद पवार गटाचं समर्थन)
जयंत पाटील 12
Vidhan Parishad Election Result 2024

या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत भाजपकडे स्वतचे 103 तर अपक्ष आणि इतर 8 असे 111 आमदार आहेत. त्यामुळे 23 कोटा असल्याने 4 आमदार सहज निवडणून येतील पण पाचव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपला चार मताची गरज असल्याने लहान घटक पक्षातील नेत्यांच्या मताला मोठी किंमत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील हे विधानभवनात दाखल झाले आहेत. तर त्यांच मत नेमक कुणाला मिळणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे.

राजू पाटील हे महायुतीला पाठिंबा देणार यात शंका नाही पण महायुतीतील कोणत्या उमेदवाराकडे राजू पाटील यांचा कौल असणार यावर राजकीय वर्तुळात तर्फ वितर्क लावले जात आहे. आज सकाळी 9 वाजेपासून विधानपरिषेदेचं मतदान सुरू झालं असून सव्वा असून सव्वा 12 वाजेपर्यंत 222 आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!