Tripura Students HIV News
Tripura Students HIV News: त्रिपुरा मध्ये 828 विद्यार्थी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी 47 जणांचा मृत्यू झाला आहे. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी (TSACS) च्या वरिष्ट अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. मिडिया रिपोर्टसनुसार त्रिपुरा मध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आलेले विद्यार्थी देशभरातील विविध संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी निघून गेले आहेत. या प्रकरणाची माहिती देताना वरिष्ट अधिकारी म्हणाले, आतापर्यंत 828 विद्यार्थी एचआयव्ही Tripura Students HIV News पॉझिटिव्हसापडले आहेत. त्यापैकी 47 विद्यार्थ्यांना धोकादायक संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. अनेक विद्यार्थी त्रिपुरातुन देशभरातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले आहेत.
पूर्वोत्तर भारतातील त्रिपुरा मधील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये एड्स चा फैलाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्रिपुरा राज्य एड्स नियंत्र सोसायटीच्या एका वरिष्ट अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा मध्ये एचआयव्ही मुळे 47 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 828 विद्यार्थ्यांना एचआयव्ही चा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. TSSES संयुक्त संचालिकांनी सांगितले की, राज्यातील शाळांमधील विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचे सेवन करत आहेत.
एचआयव्ही या आकड्यांबाबत TSSES च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही आतापर्यंत 828 विद्यार्थ्यांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणून नोंदली केली आहे. त्यामधील 572 विद्यार्थी अजूनही संसर्गग्रस्त आहेत. तर संसर्गामुळे 47 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक विद्यार्थी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी त्रिपुराच्या बाहेर गेले आहेत. त्रिपुरा एड्स नियंत्रण सोसायटीने 220 शाळा आणि 24 कॉलेज आणि विश्वविद्यालयांमधील इंजेक्शन मधून औषधे घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटवली आहे. यामधील एखाद्या एचआयव्हीग्रस्त विद्यार्थ्याने वापरलेल इंजेक्शन अन्य विद्यार्थ्याने वापरल्यास त्यालाही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धक्कादायक बाब म्हणजे दररोज एचआयव्हीचे पाच ते सात रुग्ण सापडत आहेत. आकडेवारीनुसार त्रिपुरामध्ये एचआयव्ही पीडित लोकांची संख्या 5 हजार 674 एवढी आहे. त्यामध्ये 4 हजार 570 पुरुष आणि 1103 महिला आहेत. त्यामधील केवळ एक रुग्ण ट्रान्स जेंडर आहे.
HIV आणि AIDS मधील फरक
HIV | AIDS |
---|---|
एचआयव्हीला ह्युमन इम्युनोडेफीशीयन्सी व्हायरस म्हणतात. | एड्स ही एक वैद्यकीय स्थिति आहे, जी एचआयव्ही मुळे होते. |
जो शरीराच्या WBC (पांढऱ्या रक्त पेशी) वर हल्ला करतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ति इतकी कमकुवत होते की, शरीराला किरकोळ दुखापती किंवा आजारातूनही ठीक करता येत नाही. | प्रत्येकी एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला एड्स होतोच असे नाही, परंतु एड्स फक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकानांच होतो. |
एचआयव्ही संसर्गाची लक्षणे
- दोन ते चार आठवड्यात लक्षणे दिसू लागतात.
- ताप, डोकेदुखी, पुरळ किंवा घसा खवखवणे यांसारख्या सुरुवातीच्या समस्या.
- वजन कमी होणे, अतिसार, खोकला, लिम्फ नोडस सुजणे.
एड्स हा किती धोकादायक आहे?
डब्ल्यूएचओच्या मते, एड्स हा आजार नाही, परंतु जेव्हा तो होतो. तेव्हा रोगप्रतिकारक शक्ति इतकी कमकुवत होते की, शरीर सहजपणे रोगांना बळी पडते आणि त्यातून बारे होणे अशक्य होते. एड्स हा एचआयव्ही विषाणू मुले होतो. जो असुरक्षित लैंगिक संबंधातून, संक्रमित व्यक्तीच्या रक्ताद्वारे किंवा गर्भधारणे दरम्यान किंवा संक्रमित मातेकडून प्रसूती दरम्यान तिच्या बाळामध्ये पसरू शकतो.
Tripura Students HIV News: एचआयव्ही उपचार आणि प्रतिबंध
एचआयव्ही विषाणूवर अद्याप कोणताही इलाज नाही. पण अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत ते टाळण्यासाठी इंजेक्शनची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. यावर अजूनही काम सुरू आहे. काही औषधांच्या मदतीने एचआयव्ही वर नियंत्रण ठेवता येते आणि धोकादायक अवस्थेत जाण्यापासून रोखता येते. एचआयव्ही वरील औषधांना अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) म्हणतात. एचआयव्ही टाळण्यासाठी शारीरिक संबंध ठेवताना काळजी घेणे आवश्यक आहे. रोगांची लक्षणे तात्काळ डॉक्टरांना दाखवावे.
Tripura Students HIV News: एचआयव्ही कसा पसरला?
त्रिपुरा एड्स कंट्रोल सोसायटीने 220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थाची तपासणी केली. जे इंजेक्शनद्वारे ड्र्ग्ज घेतात. त्यामुळे एचआयव्ही चा प्रसार एकमेकांना होतो. TSACS चे संयुक्त संचालक एएनआयशी बोलतांना म्हणाले, आतापर्यंत 220 शाळा आणि 24 महाविद्यालये आणि विद्यापीठे ओळखली गेली आहेत जिथे विद्यार्थी ड्र्ग्ज घेत आहेत. आम्ही राज्यभरातील एकूण 164 आरोग्य सुविधांमधून डेटा गोळा केला आहे.
एचआयव्ही म्हणजे काय?
एचआयव्ही म्हणजेच ह्युमन इम्युनोडेफीशीयन्सी व्हायरस हा एक विषाणू आहे. जो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तिवर हल्ला करतो आणि तो इतका कमकुवत करतो की आपले शरीर इतर कोणत्याही संसर्ग किंवा रोगांचा सामना करू शकत नाही. त्याचबरोबर या विषाणू वेळीच ओळखणे आणि योग्य उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.
एचआयव्ही पॉझिटिव्हला एड्स कधी होतो?
एड्स हा एचआयव्हीचा पुढचा टप्पा आहे. एखाद्या व्यक्तिला एचआयव्हीची लागण झाली की, बारे होणे यापुढे शक्य नसते. परंतु औषधांच्या मदतीने धोकादायक टप्प्यापर्यंत पोहोचणे टाळता येते. एचआयव्हीवर विळीवर उपचार न् केल्यास तो गंभीर स्टेज 3 पर्यंत पोहोचतो आणि मग एड्स होतो. असे बरेच लॉक आहेत जे एचआयव्ही पॉझिटिव्ह असूनही, त्यांना एड्स नाही.
Tripura Students HIV News: एचआयव्हीवरील उपचार आणि प्रतिबंध
एचआयव्ही विषाणूवर अद्याप कोणताही इलाज नाही. पण अलीकडील दक्षिण आफ्रिकेत ते टाळण्यासाठी इंजेक्शनची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. यावर अजूनही काम सुरू आहे. काही औषधांच्या मदतीने एचआयव्हीवर नियंत्रण ठेवता येते आणि धोकादायक अवस्थेत जाण्यापासून रोखता येते. एचआयव्ही वरील औषधांना अँटिरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) म्हणतात. एचआयव्ही टाळण्यासाठी शारीरिक संबंध ठेवताना काळजी घेणे आवश्यक आहे. रोगांची लक्षणे तात्काळ डॉक्टरांना दाखवावे.
नशा करण्याच्या नादात संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत
अहवालानुसार, अँटिरेटरोव्हायरल थेरपी सेंटरच्या आकडेवारीनुसार, त्रिपुरामध्ये मे 2024 पर्यंत एचआयव्ही संसर्गाच्या सक्रिय प्रकरणाची संख्या 8,729 आहे. यापैकी 5,674 लोक जीवंत असल्याची नोंद आहे. ज्यात 4,570 पुरुष, 1,103 महिला आणि एक ट्ररान्सजेंडर आहे.
आता त्रिपुरा मध्ये एचआयव्ही मुळे 47 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 828 विद्यार्थ्यांना एचआयव्ही चा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. TSSES संयुक्त संचालिकांनी सांगितले की, राज्यातील शाळांमधील विद्यार्थी हे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचे सेवन करत आहेत.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!