युवा भारतीय टीमने झिम्बाब्वेची धुळदाण, 23 धावांनी टीम इंडियाचा विजय मालिकेत 2-1 ने आघाडी

IND vs ZIM 3rd T20I

IND vs ZIM 3rd T20I: तिसऱ्या टि-20 सामन्यात भारताने झिम्बाब्वे विरोधात निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स च्या मोबदल्यात 182 धावांचा डोंगर उभारलाय. भारताकडून कर्णधार शुभमन गिल यानं शानदार अर्धशतक ठोकले. तर ऋतुराज गायकवाड चे अर्धशतक अवघ्या एका धावेने राहिले. यशस्वी जैस्वाल यानेही निर्णायक 36 धावांची खेळी केली. झिम्बाब्वे विजयासाठी 183 धावांचे आव्हान मिळाले आहे. पाच सामन्याची टि-20 (IND vs ZIM 3rd T20I) मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिला सामना झिम्बाब्वे जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली होती.

शुभमन गिलच्या नेतृत्वातिल युवा टीम इंडियाने झिम्बाब्वेची धुळदाण उडवली. तिसऱ्या टि-20 IND vs ZIM 3rd T20I सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 23 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने पाच IND vs ZIM 3rd T20I सामन्याच्या मालिकेत 2-1 आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 182 धावांचा डोंगर उभरला होता. प्रत्युत्तर दाखल भारतीय गोलंदाजी समोर झिम्बाब्वे संघ 159 धावांपर्यंत मजल मारू शकला. भेदक मारा करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सुंदरने 15 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या.

IND vs ZIM 3rd T20I
IND vs ZIM 3rd T20I

प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 182 धावा केल्या होत्या. भारतीय संघासाठी कर्णधार शुभमन गिळणे 66 धावांची अर्धशतक खेळी खेळली. झिम्बाब्वे ची सुरुवात अतिशय खराब झाली, त्यानुसार यजमान सवरलेच नाहीत. यजमान झिम्बाब्वे ने 39 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. चांगल्या फॉर्म मध्ये असलेल्या वेस्ली माधवेरे केवळ 1 धावा काढून बॅड झाला. कर्णधार सिकंदर रझा पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्याला चांगली सुरुवात मिळाली पण विजय मिळवून देऊ शकला नाही. रझा फक्त 15 धावा काढून बाद झाला.

टीम इंडियासाठी कर्णधार शुभमन गिळणे सर्वाधिक धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले. झिम्बाब्वे च्या खेळाडूनी फिल्डिंग अतिशय अतिशय खराब केली. त्यामुळे टीम इंडियाला 20-25 धावा अतिरिक्त काढत आल्या. यजमान झिम्बाब्वे संघाकडून कर्णधार सिकंदर रझा आणि ब्लेसिंग मुजराबानी यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या मालिकेतिल पहिलं सामना खेळत होता. त्याने 27 चेंडूत 36 धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्याचा शतकविर अभिषेक शर्मा आज काही विशेष करू शकला नाही. त्याने 9 चेंडूत केवळ 10 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड ने 28 चेंडूत 49 धावा केल्या. गायकवाडचे आपल्या टि-20 कारकिर्दीतिल 5 वे अर्धशतक हुलकवले पण संघाला 182 धावांपर्यंत नेण्यात महत्वाचे योगदान दिले.

IND vs ZIM 3rd T20I

12 षटकांपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या फक्त 127 इतकी होती. त्यात 16 व्या षटकात फक्त तीन धावांच आल्या. पण अखेरच्या चार षटकात टीम इंडियाच्या शिलेदारांनी वादळी फलंदाजी करत 52 धावा वसूल केल्या. सिकंदर रझा च्या अखेरच्या चार षटकात भारतीय खेळाडूंनी तीन षटकात आणि चार चौकार ठोकले. अखेरच्या चार षटकात भारताकडून ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी धावांचा पाऊस पडला. झिम्बाब्वे कडून कर्णधार सिकंदर रझा आणि ब्लेसिंग मुजराबानी यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. इतर सर्व गोलंदाजांची विकेतची पाटी कोरिच राहिली.

IND vs ZIM 3rd T20I: खलील अहमदने सामना फिरवला

अखेरच्या 5 षटकात झिम्बाब्वेला विजयासाठी 73 धावांची गरज होती. मायर्स आणि मदडे यांचा जम बसला होता. ते ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते, त्यामुळे हे लक्ष्य सहज गाठता येईल असेच वाटत होते. पण 16 व्या षटकात खलील अहमदने फक्त दोन धावा दिल्या. त्यामुळे झिम्बाब्वेच्या फलंदाजावर दबाव निर्माण झाला. उर्वरित काम आवेश खानने 18 व्या षटकात पूर्ण केले. आवेश खान याने त्या षटकात फक्त 6 धावा दिल्या. त्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला. वॉशिंग्टन सुंदरने भारतीय सांगाकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या. सुंदरने 4 षटकांमध्ये तीन बळी घेतल्या. आवेश खानने 2 तर खलील अहमदने 1 विकेट घेतली.

रझा-मुजरबानीच्या प्रत्येकी 2-2 विकेट

झिम्बाब्वे कडून कर्णधार सिकंदर रझाने 24 तर ब्लेसिंग मुजरबानीने 25 धावा डेट प्रत्येकी दोन बळी घेतले. गिळणे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अनि जैस्वालच्या साथीने पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न् गमावता 55 धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करून दिली. जैस्वालने ऑफस्पिनर ब्रायन बेनेटच्या पहिल्याच षटकात दोन चौकार आणि एक षटकार मारला, तर पुढच्या षटकात गिलने डावखुरा वेगवान गोलंदाजी रिचर्ड नागरवावर दोन चौकार आणि एक षटकार ठोकला.

जयस्वालला धावांवर जीवदान

जयस्वालने आपल्या आक्रमक शैलीत वेगवान गोलंदाज तेडई चताराच्या लागोपाठ चेंडूवर चौकार आणि षटकार ठोकले. 29 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर चताराच्या चेंडूवर स्वीपर कव्हरच्या ताडीवनाशे मारूमणीने जयस्वालला जीवदान दिले. मात्र त्याचा फायदा उठवता आला नाही. पुढच्याच षटकात तो रझाच्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटवर बेनेटकरवी झेलबाद झाला. 27 चेंडूचा सामना करताना त्याने चार चौकार आणि दोन षटकार मारले.

IND vs ZIM 3rd T20I: गिलची कॅप्टनी खेळी

प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 182 धावा केल्या होत्या. भारतीय संघासाठी कर्णधार शुभमन गिळणे 66 धावांची अर्धशतक खेळी खेळली. झिम्बाब्वे ची सुरुवात अतिशय खराब झाली, त्यानुसार यजमान सवरलेच नाहीत. यजमान झिम्बाब्वे ने 39 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. चांगल्या फॉर्म मध्ये असलेल्या वेस्ली माधवेरे केवळ 1 धावा काढून बॅड झाला. कर्णधार सिकंदर रझा पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. त्याला चांगली सुरुवात मिळाली पण विजय मिळवून देऊ शकला नाही. रझा फक्त 15 धावा काढून बाद झाला.टीम इंडियासाठी कर्णधार शुभमन गिळणे सर्वाधिक धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले.

झिम्बाब्वे च्या खेळाडूनी फिल्डिंग अतिशय अतिशय खराब केली. त्यामुळे टीम इंडियाला 20-25 धावा अतिरिक्त काढत आल्या. यजमान झिम्बाब्वे संघाकडून कर्णधार सिकंदर रझा आणि ब्लेसिंग मुजराबानी यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!