Team India
Team India: टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय टीम Team India चे गुरुवारी सकाळी विशेष विमानाने दाखल झाली. भारतीय संघाने 29 जून ला वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस येथे रंगलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले होते. त्यानंतर भारतीय चाहत्यांच्या आनंदाला भरते आले आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यापासून टीम इंडिया भारतात कधी दाखल होणार. याची उत्सुकता सर्वाना लागली होती. अखेर भारतीय संघाने गुरुवारी सकाळी सात वाजता दिल्ली विमानतळावर आगमन झाले.
दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर एक-एक करून भारतीय संघाचे खेळाडू बाहेर आले. त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचे डोळे जी गोष्ट पाहण्यासाठी आसुसले होते. तो वर्ल्डकप दाखवला. दिल्ली विमानतळावरून टीम इंडियाच्या Team India स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी विमानतळावरून बाहेर पडताना रोहित शर्मा याने चाहत्यांच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावून दाखवला. याशिवाय, चाहत्यांच्या गराड्यातून दिल्ली विमानतळावरून बाहेर पडताना रोहित शर्मा याने पुन्हा एकदा वर्ल्डकप ट्रॉफी उंचावली. वर्ल्डकप पाहून विमानतळावरील क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला.
यानंतर टीम इंडियाच्या Team India खेळाडूंनी दिल्लीतील 7 जनकल्याण मार्ग येथे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय खेळाडूंमध्ये नेमका काय संवाद झाला होता. याचा तपशील आता समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहित शर्मा, विराट कोहली, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांना काही प्रश्न विचारल्यावर समजते. भारतीय संघाचे खेळाडू तब्बल दीड तस पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सर्व खेळाडूंशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला मातीची चव कशी लागते. असा प्रश्न विचारला. रोहित शर्मा याने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर थरारक विजय मिळवल्यानंतर बार्बाडोसच्या मैदानावरची माती तोंडात टाकली होती. त्यामुळे मोदीनी रोहित शर्माला हा प्रश्न विचारला.
टीम इंडियाचे खेळाडू आता दिल्लीतिल आयटीसी मौर्य या हॉटेलमध्ये काहीवेळ विश्रांती घेतील. त्यानंतर भारतीय टीम दुपारी 2 ते 3 च्या सुमारास टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. मुंबईत टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात येणार आहे. टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवरही जाईल. याठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सूर्यकुमार आणि हार्दिक यांच्याशीही मोदींचा संवाद
आता झालेल्या विश्वचषकाच्या सामन्यात शेवटच्या षटकात भारताच्या सूर्यकुमार यादव याने सीमारेषेवर दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरचा अफलातून कॅच पकडला होता. तो जादुई कॅच, सात सेकंदाचा थरार कसा होता. कॅच पकडला तेव्हा तुझ्या काय अनुभव होता, कॅच पकडला तेव्हा तुझा काय अनुभव होता, असे नरेंद्र मोदी यांनी सूर्यकुमारला विचारले. तर विश्वचषक स्पर्धेनंतर संपूर्ण वेगळ्या दृष्टिकोनातून पहिल्या जाणाऱ्या हार्दिक पांड्या यांच्याशीही मोदींनी गप्पा मारल्या. मोदींनी त्याला विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी विषयी विचारले. तसेच शेवटच्या षटकात 16 धावा हव्या असताना तुला गोलंदाजी करायची होती. तेव्हा तुझ्या मनात काय सुरू होते. तर नक्की काय योजना आखली होतीस, असे मोदींनी हार्दिक पांड्याला विचारले.
ज्या मैदानावर छपरी-छपरीच्या घोषणा
भारताने 17 वर्षानंतर विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतीय फलंदाजांसोबतच गोलंदाजांच मोलाचं योगदान आहे. शेवटच्या चार षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचं कंबरड मोडत विश्वचषक हिसकावून आणला. भारतीय संघाच्या या विजयी कामगिरीत हार्दिक पांड्याच्या मोलाचा वाटा होता. विश्वचषकतील शेवटची ओव्हर हार्दिकने टाकली होती. या षटकात दक्षिण आफ्रिकेला 16 धावांची गरज होती. पण संघाला आठ धावाच काढता आल्या आणि भारताने विश्वचषक जिंकला.
त्याच वानखेडेवर हार्दिक पांड्याचा जयघोष
आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्यावर खूप टक झाली. मात्र, त्याच हार्दिक पांड्याला आता सर्वानी डोक्यावर घेतलं आहे. वानखेडे स्टेडियमवर मोठ्या संख्येने क्रिकेटचे चाहते दाखल झाले आहेट. टीम इंडियाला पाहण्यासाठी आलेले चाहते जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत. वानखेडे स्टेडियमवर हार्दिक पांड्याच्या नावाचाही जोरदार जयघोष सुरू आहे. आयपीएलमध्ये याच वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्यासाठी छपरी-छपरी अशी घोषणा बाजी करत त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. त्याच मैदानावर आता चाहते, त्याचा जायघोह करत आहेत.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!