4th Day of Navratri
4th Day of Navratri: शून्यातून विश्व उभे करण्याची शक्ति देणारी देवी म्हणजेच ‘कुष्मांडा’ आहे. आश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच घटाची चौथी माळ. या दिवशी कुष्मांडा या देवी शक्तीची साधना करतात. कुष्मांडा म्हणजेच कोहळा किंवा तत्सम फळ म्हणजेच भोपळा. त्यांच्यामध्ये निसर्ग दत्त प्राणशक्ती ही सर्वात अधिक आहे. कुष्मांडाआणखी एक अर्थ म्हणजे कुसुम + अण्डज म्हणजेच कुसुमासारख्या, फुलासारख्या सुंदर देवीने केलेली ब्रह्मांडाची निर्मिती. जेव्हा या चराचर विश्वाचे काहीच अस्तित्व नव्हते, तेव्हा परमेश्वर तत्वाला इच्छा झाली, सुजणाची एकोहम बहुर्यामी निर्माण करण्याची तेव्हा या शक्तीची उत्पत्ति झाली व या कुष्मांडाच्या स्मितहास्यातुन विश्वाचे अस्तित्व उदयास आले, म्हणूनच ही आरंभीक अशी आदिशक्ती रूप आहे.
नवरात्रीची चतुर्थ माळ कुष्मांडादेवीला समर्पित आहे. कुष्मांडा म्हणजे कोहळा कोहळ्यात असलेल्या असंख्य बियांमध्ये पुन्हा कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. म्हणजेच बीजनिर्मिती, पुनरुत्पादनासाठी तिची आराधना केल्याने नवनिर्मिती होण्यास मदत होते. उत्पती निर्मिती आणि अखंड अस्तित्व अशी या मातेची लीला आहे. देवीच्या या शक्तीने आणि तेजाने दाही दिशा प्रकाशमान झाल्या. दहा दिशा म्हणजेच पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, अग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व, अधर. या दशदिशांमधून ही शक्ति आपल्याला ज्ञान देते की पूर्व म्हणजे पुढे बघा. दूरदर्शी व्हा आणि ध्येयाकडे वाटचाल करा. कितीही संकटे आली तरी डगमगू नका. पश्चिम दिशा सांगते मागील चुकातून शहाणा हो. मागील सुंदर आठवणीतुन जीवनाचा सुंदर रस अनुभव. उत्तर दिशेकडून कार्यासाठी लागणारी संसाधने हे व धुरव ताऱ्यासारखे ध्येय व कार्यावर लक्ष अढळ राहू दे.

दक्षिण दिशेकडून कार्यासाठी लागणारी संसाधने हे व धुरव ताऱ्यासारखे ध्येय व कार्यावर लक्ष अढळ राहू दे. दक्षिण दिशेकडून वेळेचे भान ठेव. ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा सांगते कितीही यश मिळाले तरी पाय जमिनीवर राहू देत व अधर अर्थत खालची दिशा सांगते तुला आसमंत गाठायचा आहे मग घे भरारी आणि तुझ्या कार्याचा उपयोग खालील तळागाळातिल समाजासाठी होऊ देत. अशी ही वीश्वशक्ति कुष्मांडाहीच प्राण ऊर्जा आहे. सर्व वस्तूची निर्मिती हिच्यातून आहे. त्यामुळे त्याच्यामधले तेज आणि छाया म्हणजे सावली ही देवी शक्ति आहे. कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे अशी मान्यता सांगितली जाते. या देवीला आठ भुजा आहेत.
ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातांत क्रमश कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृतकलश, चक्र आणि गदा आहेत.देवीच्या या शक्तीने आणि तेजाने दाही दिशा प्रकाशमान झाल्या. दहा दिशा म्हणजेच पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, अग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व, अधर. या दशदिशांमधून ही शक्ति आपल्याला ज्ञान देते
4th Day of Navratri: कुष्मांडा देवीचे स्वरूप
कुष्मांडा देवीची प्रतिमा ही अतिशय तेजस्वी अष्टभुजाधारी आहे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मितहास्याने ब्रह्मांडाची रचना केली म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ति आहे. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ति केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे दैदीप्यमान आहे. तिच्या तेज तसेच प्रकाशामुळे ढा दिशा उजळून निघतात. ब्रम्हाडात असलेल्या सर्व वस्तु आणि प्राण्यामधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. कुष्मांडा म्हणजे सर्व प्रकारच्या पिडापासून रक्षण करणारी असंही म्हटल जात. कुष्मांडामातेचे ध्यान केल्यामुळे मं शुद्ध होते. मन निरोगी होऊन मनाचे वेश्विक ज्ञान वाढते. मं तेजस्वी होते. कुष्मांडा देवीच्या उपासनेमुळे भक्तांना आजार बरा होतो. या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ति आणि आरोग्यात वाढ होते. मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला, तर त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते.

कुष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे अशी मान्यता सांगितली जाते. या देवीला आठ भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातांत क्रमश कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृतकलश, चक्र आणि गदा आहेत. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. मनुष्य नेहमी स्वत: मध्येच गुंतलेला असतो. त्यामुळे कढई नकारात्मक विचार इषा, घृणा. मत्सर त्याच्या मनात सुरू राहतो. या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी हिमालयात जाऊन बसणं शक्य नसतं. त्यामुळेच या दिवसांत देवीची उपासना केल्यावर समाधान मिळत म्हणून ही पूजा करतात.
4th Day of Navratri: देवी कुष्मांडा पूजा विधी
- नवरात्रीच्या चौथ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेची तयारी करावी आणि उपवासाचा संकल्प करावा.
- सर्वप्रथम गंगाजलाने पूजास्थानाची शुद्धी करा. पाटावर पिवळे कापड पसरून मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. देवीचे स्मरण करा.
- पूजेमध्ये पिवळे वस्त्र, फुले, फळे, मिठाई, धूप, दिवा नैवेद्य, अक्षता इत्यादि अर्पण करा. सर्व साहित्य अर्पण केल्यानंतर देवीची आरती करून भोग अर्पण करावेत.
- दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालीसाचे पठन करा.
4th Day of Navratri: चौथा दिवस: 6 ऑक्टोबर 2024 -नारंगी रंग
नारंगी रंग उर्जेचे, शक्तीचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग नवरात्रीच्या उत्साहपूर्ण वातावरणात अधिक उत्साह आणतो. चौथ्या दिवशी देवी कुश्मांडाचे पूजन होते, आणि हा रंग तिच्या उर्जेला आदरपूर्वक समर्पित आहे. नारंगी रंग परिधान करून भक्त उत्सवाची ऊर्जा आणि देवीची कृपया अनुभवतात.

4th Day of Navratri: देवी कुष्मांडा च्या पूजेचे महत्व
देवी कुष्मांडा की पूजा करने से भक्ताचे सभी रोग, दुख आणि कष्ट संपून जातात. देवीच्या पूजेने आयुष्य, यश, ताकद आणि समृद्धी ची प्राप्ती होते. विशेष करून मानले जाते की देवीच्या कृपेने भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा चे संचार होते आणि मानसिक शांती प्राप्त होते. देवी कुष्मांडा रोगाच्या नाश करते आणि आयुष्य वाढवणारी मानली जाते. देवीच्या पूजेने आराध्य रोगांपासून मुक्ती मिळते आणि मनुष्याची आरोग्य योग्य असे राहते. देवी कुष्मांडा ची आराधना केल्याने सर्व प्रकारची समृद्धी आणि सुख शांती चा प्रवेश होतो. नवरात्री च्या चौथ्या दिवशी पूजा व आराधना केली जाते.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!