3rd Day of Navratri
3rd Day of Navratri: नवरात्रीत दुर्गामातेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी रूपाची पूजा तर तिसऱ्या दिवशी (3rd Day of Navratri) देवीच्या चंद्रघंटा या रूपात देवीची आराधना केल्यामुळे आपलं मन सजग होऊन भावनांवर नियंत्रण मिळवता येतं. खंबीरपणा वाढीस लागतो. आपले व्यक्तिमहत्व सुधारण्यात मदत होते. चंद्रघंटा नावाप्रमाणेच शांतचित्त आणि आत्मबळ प्रदान करणारी आहे. अशी भाविकांची श्रद्धा आहे.
दुर्गा देवीच्या हे तिसरे स्वरूप शांती देणारे आणि कल्याणकारी आहे. देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र कृपेमुळे साधकांना अनेक अमूल्य वस्तु मिळतात, अनेक पवित्र ध्वनि ऐकू येतात असं सांगितलं जातं. या देवीच्या पूजेने आपल्या अंगी आत्मविश्वास येतो, भीती नाहीशी होते आणि विनम्रता येते. जाणून घेऊयात चंद्रघंटा देवीची आख्यायिका..
शारदीय नवरात्रीमध्ये देखील प्रत्येक दिवसाच्या रंगाचे खास महत्व आहे. या रंगांना वापर केवळ धार्मिकते पुरता मर्यादित नसून हा सण साजरा करताना त्या रंगांचे दर्शनिक, आध्यात्मिक आणि मानसिक महत्व देखील आहे. या नऊ दिवसांत महिलांनी या रंगांची वस्त्रे धारण करून, त्यांचा आनंद घेत, त्या रंगाच्या शक्ति आणि सकारात्मकतेचा अनुभव घ्यावा अशी परंपरा आहे.
धार्मिक ग्रंथानुसार, प्राचीन काळी महिषासुर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता. त्यांनी ब्रम्हाजिंना त्यांच्या तपश्चर्याने प्रसन्न केले आणि अनेक वरदान प्राप्त केले, त्यामुळे ते खूप शक्तिशाली झाले आणि देवांना त्रास देऊ लागले. महिषासुराने आपल्या सामर्थ्याच्या गर्वाने देवराज इंद्राचा पराभव करून स्वर्गाचा ताबा घेतला. मग सर्व देव त्रिमूर्तिकडे (शिव, विष्णु आणि ब्रम्हा) गेले. त्रिमूर्ति म्हणाली, तुम्ही सर्व देवांनो, आदिशक्तीला आवाहन करा, ती या राक्षसाचा नाश करेल. देवतांनी देवी शक्तीचे आवाहन केले ज्यामधून माता दुर्गा प्रकट झाली. सर्व देवांनी आपली दैवी शस्त्रे देवीला दिली. देवीने महिषासुराला आव्हान दिले. देवी दुर्गा आणि महिषासुर यांच्यात 9 दिवस अखंड युद्ध झाले. दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. हे 9 दिवस देवीच्या पूजेसाठी तयार करण्यात आले होते. ज्याला नवरात्री म्हणतात. तेव्हापासून नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.
3rd Day of Navratri: चंद्रघंटा देवीचे स्वरूप
‘चंद्रघंटा’ देवीच्या दर्शनाने सर्व देवदेवता आणि भक्तगण पुलकित होऊन आनंदित झाले होते. त्या यंदाच्या उत्साहात त्यांनी श्री देवी मातेला अनेक अलंकारांनी सजवून शृंगारीत केले. नाना विधी, सुवर्ण अलंकारांनी सजवून शृंगारीत केले. नाना विधी, सुवर्ण अलंकाराने आणि गळ्यातील चंद्रहाराने श्री देवी मातेचा कंठ अगदी फुलून गेलेला असतो. देवीचे पूर्ण शरीर सुवर्ण रंगात असून ती दशभुज आहे. त्या दहाही भुजा शस्त्राने आणि विविध अलंकारांनी सुशोभित केलेल्या आपल्याला पहायला मिळतात. दशदिशांचे प्रतीक आहे. देवी आपल्या हातातील घंटा नादाने सर्वांना भयमुक्त करून निर्भय बनवते. भक्तांना नवजीवन, नवउत्साह, नवचैतन्य देऊन उत्साहित करते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकांच मं मणिपूर चक्रात प्रविष्ट होतं चंद्रघंटेच्या कृपेनं अलौकिक वस्तुचं दर्शन होत.
दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो, हे क्षण साधकांसाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात. देवीचं हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असं म्हंटल जातं चंद्रघंटा शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदि शस्त्र आहेत. तिचं वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते. देवी चंद्राघंटाच्या कृपेने भक्ताचं सर्व पाप आणि संकट दूर केलं जातं. देवी भक्ताच्या संकटाचं निवारण लगेच करते. तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तिच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्ताचं रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेच्या आवाज निनादतो. या देवीचं रूप अत्यंत सौम्य आणि शांतिपूर्ण आहे.
या देवीची आराधना केल्यास वीरता-निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणांची वाढ होते. आवाजात मधुरता येते. देवी चंद्राघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लॉक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात. आपण आपलं मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा. तिची उपासना केल्यामुळे सर्व सांसारिक संकटातुन मुक्त मिळते. आपण नेहमी तिची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावं. इहलोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तिचं लक्ष आहे.
चंद्रघंटा देवीला नैवेद्य
चंद्रघंटा देवीला केशर रंगाची खीर अर्पण करा. यासोबतच लवंग, वेलची, पंचमेवा आणि दुधापासून बनवलेल्या इतर मिठाईचा वापर करू शकता. तसेच देवीला नैवेद्यात साखरेची मिठाई ठेवा आणि पेढेही अर्पण करू शकता.
3rd Day of Navratri: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी ध्यान कसे करावे?
नाभिवर स्थित मणीपुर चक्राची अधिपति चंद्रघंटा देवी आहे. ती सूर्य ग्रहावर राज्य करते म्हणून ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य कमकुवत आहे, ते देवी चंद्रघंटाचि उपासना करू शकतात आणि विविध फायदे मिळवू शकतात. ती शांत, शांती प्रिय आणि भक्तांचे पालनपोषण करणारी देवी आहे. असेही मानले जाते की चंद्राचा आवाज, बेलच्या रूपात नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो.
- सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून, पूजा विधी सुरू करण्यासाठी घर स्वच्छ करा.
- देशी तुपाने दिवा पेटवावा, हळद कुंकू लावून देवीला प्रसाद अर्पण करावे.
- दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालीसा पाठ करावे.
- देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी विविध मंत्राचा जप करावा.
- संध्याकाळी देखील पूजा करावी आणि देवीची आरती करून घ्यावी.
(टीप: वरील सर्व बाबी MH टाइम्स 24 केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MH टाइम्स 24कोणताही दावा करत नाही.)
3rd Day of Navratri: तिसरा दिवस: 5 ऑक्टोबर 2024 -राखाडी रंग
राखाडी रंग शांतता आणि स्थेर्याचे प्रतीक आहे. तिसऱ्या दिवशी राखाडी रंग परिधान करून आपण देवी चंद्रघटनेची पूजा करतो. जीने आपल्या शौर्य आणि साहसाने जगाचा विनाश रोखला आहे. हा रंग स्थिर आणि समतोल जीवनशैलीचे प्रतीक आहे. ज्यामुळे मं शांती प्राप्त होते. राखाडी रंगाचे कपडे घालून पूजा केल्याने व्यक्ति व्यवहारीक होतो. त्याचा स्वभाव शांत होतो.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!