महाराष्ट्रातून मोदींच्या मंत्रीमंडळात कोणाला संधी? ही 4 नावे आहेत चर्चेत!

2024 Lok Sabha Election

2024 Lok Sabha Election:नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून तिसऱ्या वेळी शपथ घेणार आहे. 9 जून रविवारी हा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी काही मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा होणार आहे. या महाराष्ट्रातल्या चार जणांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. ही चार नावं जवळपास निश्चित झाली आहे. त्यात भाजपकडून नितीन गडकरी, पियुष गोयल यांचा समावेश आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव हे शपथ घेण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल हे मंत्रीपदाची शपथ घेतली. या यादीत आरपीआयचे नेते खासदार रामदास आठवले यांचा समावेश नसल्याची माहिती समोर आली आहे.

2024 Lok Sabha Election
2024 Lok Sabha Election

निवडणूक निकाल जाहीर झाला आहे. अटीतटीच्या निवडणुकीत अखेर एनडीएने बाजी मारली. तर इंडिया आघाडी बहुमतापासून थोडक्यात दुर राहीली. अशा वेळी एनडीएने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यानुसार रविवारी हा शपथ सोहळा होणार आहे. यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. तर त्यांच्या बरोबर काही मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा होईल.

महाराष्ट्रातून या मंत्रीमंडळात(2024 Lok Sabha Election) कोणकोण असेल याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. शिवाय कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार याबाबतही तर्क लढवले जात आहेत. त्यात आता महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल हे मंत्री म्हणून शपथ घेणार हे जवळपास निश्चित समजले जात आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेत तेच सध्या जेष्ठ खासदार आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाची संधी मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही एक मंत्रीपद मिळणार आहे. ते कोणाला द्यायचे याबाबत सुरूवातीला दोन नावे होती. एक प्रफुल्ल पटेल आणि दुसरे आणि सुनिल तटकरे. पण राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ एकच मंत्रीपद आल्याने त्या जागेवर पटेल यांची वर्णी लागणार आहे हे जवळपास निश्चित झाले आहे.

पहिल्या मंत्रीमंडळाच्या शपथविधीत रिपाईच्या रामदास आठवलेंचा शपथविधी होणार नसल्याची माहित समोर येत आहे. शिवाय भाजपच्या राज्यातल्या काही विद्यमान मंत्र्यांचाही हिरमोड होण्याची शक्यता आहे. त्यांनाही संधी मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. विद्यमान मंत्री नारायण राणेहे ही दिल्लीत तळ ठोकून आहेत. पण त्यांच्या शपथविधी बाबतही अनिश्चितता आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीला मिळणाऱ्या मंत्रिपदाची संख्या ठरली?

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) नेते म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची निवड झालीय. मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्तास्थापनेसाठी दावा सादर केला आहे. नरेंद्र मोदी रविवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. पण, यंदा भाजपाला स्वबळावर बहुमत नाही. त्यामुळे भाजपाला एनडीएमधील घटकपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. नव्या समीकरणात घटक पक्षांना किती मंत्रिपदं मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष एनडीएमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचे 7 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 खासदार (2024 Lok Sabha Election) निवडून आला आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कारकिर्दीमध्ये (Modi 3.O) शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना सुरुवातीला 1 मंत्रिपद मिळेल, अशी माहिती ‘NDTV मराठी’ ला सुत्रांनी दिलीय. हे दोन्ही मंत्रिपद कॅबिनेट दर्जाची असतील अशी माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल यांचं नाव आघाडीवर आहे. अजित पवार यांनी शरद पवारांपासून बाजूला होत नवा गट स्थापन करण्यात पटेल यांची मोठी भूमिका आहे. दिल्लीतील राजकारणाचा त्यांना मोठा अनुभव आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारमध्येही पटेल मंत्री होते. आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

शिवसनेच्या खासदारांमध्ये प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे हे वरिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना संधी दिली जाईल अशी चर्चा आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं देखील नाव मंत्रिपदासाठी चर्चे आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्याने केंद्रात मुलाला पण मंत्रीपद देण्याचे ते टाळतील. शिंदे यांनी पक्षाच्या बैठकीत तसे संकेत दिल्याचीही माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेकडून प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांचं नाव आघाडीवर आहे. त्याचवेळी राज्यसभेवर असलेले मिलींद देवरा यांचे नावही पुढे येवू शकते. देवरा मुंबईचे असल्यानं आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करुन त्यांना संधी मिळू शकते.

मोदींच्या मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात कुणाला संधी मिळणार?

मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार?(2024 Lok Sabha Election)
एस जयशंकर
नितिन गडकरी
राजनाथ सिंह
स्मृति ईरानी
अमित शाह
पीयूष गोयल
चिराग पासवान
बांसुरी स्वराज
रामबीर सिंह बिधूडी
राजीव प्रताप रूडी
अनुराग ठाकुर
गजेंद्र सिंह शेखावत
ललन सिंह
भूपेंद्र यादव

जेडीयू आणि टीडीपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळातील वाटा आणि विभाग याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. पंतप्रधान याबाबत निर्णय घेतील अशीही माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शपथविधी सोहळ्यात, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू येऊ शकतात. त्यांना भारताचं निमंत्रण स्वीकारलं आहे. याशिवाय बांगालदेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकाचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि भूटाचे राजा जिगमे खेसर नामग्याल वांगयुक देखील येतील.

राष्ट्रवादीतून पटेल की तटकरे?

लोकसभा निवडणुकीत (2024 Lok Sabha Election) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरी निराशा आली. त्यांचा केवळ एक खासदार निवडून आला. केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांच्या वाट्याल एक मंत्रीपद येण्याची शक्यता आहे. त्यावर जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल किंवा सुनिल तटकरे यांची वर्णी लागणार आहे. सुनिल तटकरेंना मंत्री करावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. पण पटेल हे या आधीही केंद्रात मंत्री राहीले आहेत. शिवाय दिल्लीत त्यांची चांगली उटबस आहे. त्यामुळे त्यांनाच प्राधान्य मिळेल अशी चर्चा आहे. यावर अजित पवार निर्णय घेणार आहेत.

शिंदेंच्या सेनेतून कोणाचे नाव आघाडीवर?

एकनाथ शिंदे यांचे सात खासदार लोकसभेत पोहोचले आहेत. त्यांच्या वाट्याला दोन मंत्री पदे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे. मात्र या दोन ठिकाणी कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटातून निवडून आलेल्या खासदारात प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे हे वरिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना संधी दिली जाईल अशी चर्चा आहे. तर संदीपान भूमरे हे राज्यात मंत्री आहेत. त्यांना मंत्रीपदावर पाणी सोडावे लागेल.

त्यामुळे त्यांनाही मंत्रीपदाची संधी दिली जाते का ते पाहावे लागेल. नरेश म्हस्के आणि रविंद्र वायकर हे पहिल्यांदाच निवडून (2024 Lok Sabha Election) आले आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्याने केंद्रात मुलाला पण मंत्रीपद देण्याचे ते टाळतील. त्यात धैर्यशिव माने यांचाही विचार होवू शकतो. मात्र सात जणां पैकी कोणाची वर्णी मंत्रीमंडळात लागते हे पाहावे लागणार आहे. त्यात राज्यसभेवर असलेले मिलींद देवरा यांचे नावही अचानक पणे पुढे येवू शकते.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!